Category Archives: Uncategorized

अवतार कल्पना

पृथ्वीवर जीवनाची उत्पत्ती पाण्यात झाल्याचा सिद्धांत चार्ल्स डार्विनने मांडला [संदर्भ: Darwin, Francis ed (1887), Vol. 3, “The Life & Letters Of Charles Darwin, Including An Autobiographical Chapter”, London : John Murray, Pg. 18]. आजही काही वर्ग सोडल्यास बहुतांशी शास्त्रज्ञ हाच सिद्धांत मानतात. यातूनच पुढे डार्विनचा उत्क्रांतिवाद जन्मास आला. मीही आज उत्क्रांतिवादच समजावून सांगणार आहे, पण जरा वेगळ्या प्रकारे! मला आकळला तसा. पहा पटतोय का! जीवनाची उत्पत्ती पाण्यात झाल्याचे ऋषींनी शोधले. जीवन निर्माण करणं परमेश्वराच्याच हातात, त्यामुळे त्यांनी या प्राथमिक जीवनास परमेश्वराचा, पालनकर्ती देवता श्रीविष्णूचा अवतार मानले. नाव दिले, “मत्स्यावतार”! पुढे आणखी उत्क्रांती झाली. आता जीव पाण्यासोबतच जमिनीवरही राहू शकत होता. …Read more »

अस्वस्थ मनाचे चिंतन

आज सकाळी सकाळी जाग आली तीच मुळी जिया खानने आत्महत्या केल्याच्या बातमीने. ती काही माझी आवडती अभिनेत्री अथवा आवडती सौंदर्यवती नव्हती. आमच्यात समान म्हणावी अशी एकच गोष्ट म्हणजे, वय! अवघ्या पंचविशीच्या कुणाही तरुण जीवाचे जाणे जितके चटका लावणारे असते, तितकाच तिच्या जाण्याचा त्रास झाला मला. प्रत्येकासाठी आपापली दु:खे मोठी असतात हे खरे, पण कोणते दु:ख आणि कोणता त्रास इतका मोठा असतो की, परमेश्वराने दिलेली सगळ्यात मोठी भेटवस्तू – हे आयुष्यच संपवावेसे वाटावे? मी हिंदू संस्कृतीला, अध्यात्माला मानणारा माणूस आहे, त्यामुळे आजच्या भौतिक जगात तुम्हाला माझे म्हणणे खुळे वाटेल, पण आपल्यापैकी प्रत्येकाला परमेश्वराने काही ना काही उद्देश देऊन या पृथ्वीवर पाठवलेले असते …Read more »

आपल्या इतिहासाचे प्रदूषण

हिंदुत्वाचा दृष्टीकोन काही काळ बाजूला जरी ठेवला, तरीही आपल्याकडे अक्षरशः निस्तेज इतिहास शिकविला जातो, ही बाब खरोखर अक्षम्य आहे. आपण भारतीय मुळात अतिशय निकृष्ट दर्जाचे जिणे जगत होतो आणि सुरुवातीला मुघल व नंतर इंग्रजांनी आपल्याला सभ्यता, संस्कृती शिकवून आपल्यावर न भूतो न भविष्यति असे उपकार केले; अश्याच थाटात आपल्याकडे इतिहास – विशेषतः शालेय इतिहास मांडला जातो. “मुघलांनी या देशाच्या बहुसांस्कृतिकतेत भर घातली”, हे सांगताना “मुघलांच्या आगमनापूर्वी हा देश अतिशय शांततेने नांदत होता” हे सत्य का सांगितले जात नाही? बहुसांस्कृतिकता ही काही आपली गरज नव्हे! “इथे आलेले सगळेच तुर्की राजे हे एकजात रानटी, धर्मांध आणि विकृत वासनांनी पछाडलेले होते” हे सत्य का …Read more »

क्रांतिकारकांचे मेरुमणी

वीर सावरकर : धगधगते स्फुल्लिंग

भारतीयांची गुलामगिरी ची मानसिकता

स्वातंत्र्यवीरांचे सागरासुक्त

 

ब्रिटिशांचा कर्दनकाळ : मदनलाल धिंग्रा

17 ऑगस्ट 1909 हा दिवस कुणीही सच्चा देशभक्त कधीही विसरणार नाही. कारण याच दिवशी सर विल्यम हट कर्झन वायली या इंग्रज अधिकार्‍याचा वध करणारे हुतात्मा मदनलाल दित्तमल धिंग्रा हसत हसत फासावर चढले. 1 जुलै 1909 रोजी पिस्तुलाच्या चार गोळ्या झाडून धिंग्राजींनी कर्झन वायलीचा वध केला होता. ‘एका इंग्रज अधिकार्‍याचा भारतीय क्रांतियोद्धय़ाने केलेला वध’ एवढेच केवळ या घटनेचे महत्त्व नाही, तर हा होता अजिंक्यतेचा तोरा मिरवणार्‍या ब्रिटिशांच्या भूमीवर राहून त्यांच्याच एका अधिकार्‍याचा केलेला वध! अभूतपूर्व अशीच घटना होती ही. याआधी आम्ही भारतीयांनी कुणी गोरा अधिकारी कधी मारलाच नव्हता, असे नाही. दु:शासनी कारवाया करणार्‍या रँडला चापेकर बंधूंनी घातलेले कंठस्नान इंग्रज विसरलेले नव्हते; …Read more »