ईसईज्ञानी

सिम्फनी लिहायला किती वेळ लागतो? मोठमोठे संगीतकार त्यासाठी ६ महिने ते १ वर्षसुद्धा घेतात. पण एक भारतीय कलाकार आहे ज्याने आजपासून पाव शतकापूर्वी सिम्फनी लिहिलीये. सिम्फनी लिहिणारा तो भारतातलाच नव्हे, तर आशिया खंडातला पहिलाच संगीतकार आहे. त्याला किती काळ लागला माहितीये? ६ महिने? एखादं वर्षं? १९९३ साली लंडनच्या रॉयल फिलहार्मनिक ऑर्केस्ट्राला घेऊन त्याने ही सिम्फनी अवघ्या १३ दिवसांत लिहिलीये! आणि तिचा दर्जा ऐकून इंग्लंडमधील त्या प्राचीन वाद्यवृंदाने आश्चर्याने तोंडात बोटे घातली होती. सांगायची गरजच नाही की, हा पराक्रम करण्याची ताकद असलेला केवळ एकच संगीतकार सबंध जगात आहे, ‘ईसईज्ञानी’ इलयराजा!! राजा प्रसंग ऐकतो. जागच्या जागी चाल लिहितो. आणि अवघ्या ५ मिनिटांत …Read more »

लढ मित्रा

डरतो कश्याला तू लढ मित्रा लढत्याची दासी धरणी मित्रा दु:ख तितुके माया हो सूर्य गिळतो छाया हो टाकीच्या घावांमधुनी देव बनते काया हो वेदना रे वीराला लिहिली असे जन्माला वेणांची करुनि गीते गा तू आपुल्या कर्माला तुझिया रे कष्टांनी हो अवनिला आधारा तू बांध माथ्यावरती जखमांचा हा भारा व्रण हे जरी भीषण रे युद्ध वीरा भूषण रे तू पार्थ तुझा तू कृष्ण तुझा तू तुझी गीता रे होतील कविता ह्या तलवारी देतील अंधारा त्या ललकारी डरतो कश्याला तू लढ मित्रा लढत्याची दासी धरणी मित्रा गंध मातीचा येण्या चार महिने ताप हो तपाचे फळ मिळण्या पाहावी लागते वाट हो शंभरवेळा पडताना …Read more »

आठवणींच्या गल्लीबोळांतून

नव्वदचं दशक हे अनेक अर्थांनी नॉस्टॅल्जियाचं दशक आहे. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या अनेकांसाठी ते नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद, जतिन-ललित अश्या जोड्यांनी, अन्नू मलिक वगैरेंसारख्या सफाईदार “बाजीगरां”नी व विजू शाहसारख्या अनेकानेक अंडररेटेड माणकांनी बनवलेल्या आणि कुमार, अलका, उदित वगैरेंनी बेभान होऊन गायलेल्या दिलतोड गीतांचं दशक आहे; तर नव्वदच्याच दशकात जन्मलेल्या आजच्या तरुणांसाठी ते इंडीपॉप गाण्यांमधील नव्या प्रवाहांत केलेल्या सचैल स्नानांचं दशक आहे. दोन्हीही प्रकारच्या मंडळींसाठी ते एकत्रितपणे समीरचंदेखील दशक आहे. आणि दोन्हीही प्रकारची मंडळी त्या दिवसांबद्दल बोलताना जरादेखील थकत नाहीत. याच दशकाने सोनू निगम, शान, केके, शंकर असे हिरेसुद्धा दिले! याच दशकाने शंकर-अहसान-लॉय दिले आणि याच दिवसांनी रहमान दिला!! त्यामुळे “आशिकी” (१९९०) …Read more »

कधी कधी

कधी कधी रात्र विरताना, दिवस उगवायाचा असतो अजून, सूर्य उमलायाचा असतो अजून! चंद्राचं इंधन पुरतं संपलेलं नसतं आणि लुकलुकत असतात ताऱ्यांचे लाखो पलिते, क्षितिजचुंबी गगनाच्या लाक्षागृहात! कुणीतरी साखरझोपेत कूस बदलतो, कुणाची मिठी घट्ट होते कुठे कुरकुरत असतो पंखा तर कुठे स्वप्नांची होडी पैल होते! अश्या एकाकी अंधारवेळी मी टक्क जागा असतो, कधी सुटलेले हात आठवत, तर कधी मिटलेली दारे साठवत! तू विचारलं होतंस, ‘विसरणार तर नाहीस ना मला’ आणि ‘मला विसर, माझं लग्न ठरलंय’, हेदेखील तूच म्हणाली होतीस! मला तेव्हाही उत्तर सुचलं नव्हतं, मला तेव्हाही उत्तर सुचलं नाही! त्या एकांत प्रहरी मात्र, सुचत राहातात सारीच न दिलेली उत्तरे, आणि त्यावरच्या …Read more »

गुलज़ार

नज़्म पूरे जोबन पे थीनूर के कोहरे बहते थेइश्क़ तो तब भी था मगरवह और जगह रहते थे चलते-बहते एक रातसय्यार टकराया चाँद सेनूर मिला नज़्म को जा करअब्रों की दिवार फाँद के सागर डोल गया था उस दमतारे सारे उफनने लगे थेदूर कहीं कोहसारों मेंख़्वाब पकने बनने लगे थे वक़्त थम गया था उस वक़्तनज़्म-ओ-नूर का दीदार हुआइक हलचल सी हुई उजालों मेंइक नाम उठा ‘गुलज़ार’ हुआ — © विक्रम श्रीराम एडकेGulzar #HBDGulzarSaab

मनोव्यापारांचा गूढ खेळ – जेराल्ड्स गेम

जेसी (कार्ला गुगिनो) आणि जेराल्ड (ब्रुस ग्रीनवूड) सप्ताहांत साजरा करण्यासाठी त्यांच्या अलाबामातील नदीकाठच्या घरी जातात. एकत्र वेळ घालवणं, मजा करणं आणि त्यायोगे आपलं रुक्ष होत चाललेलं वैवाहिक जीवन वाचवणं, हा त्यांचा हेतू असतो. परंतु जेराल्डची मजेची कल्पना जरा वेगळीच असते. प्रवासाला निघतानाच त्याने सोबत खरोखरीच्या हातकड्या घेतलेल्या असतात. तो जेसीला त्या हातकड्यांनी पलंगाला जखडून ठेवतो. आणि त्याची रेप फँटसी पूर्ण करण्यात तिला भाग घ्यायला लावतो. जेसीला ही कल्पना मनापासून आवडलेली नाहीये. परंतु ती तरीही प्रयत्न करते. तिला त्या प्रकाराची क्षणोक्षणी शिसारी येऊ लागते. ती जेराल्डला सोड म्हणते. आणि मी नाही सोडलं तर, जेराल्ड उत्तरतो. जेसी घाबरते. जेसी आणि जेराल्डच्या वयात …Read more »

खेळ

“Boom Beach मध्ये ना आपल्याला एक आयलंड दिलेलं असतं. त्यावर आपला बेस बनवायचा, रिसोर्सेस प्रोड्युस करायचे. तसेच दुसरे बीचेस शोधून त्यांच्यावर अटॅक करायचा. आणि ते जिंकून घ्यायचे”! पाच वर्षांचा अर्णव बाबांना उत्साहाने सांगत होता. त्याचे बाबा, विख्यात अॅस्ट्रोफिजिसिस्ट डॉ. ज्ञानेश्वर लॅपटॉपवर काम करता करता नुसतेच “हं” म्हणाले! “मी आत्ता लेव्हल 47 ला आहे, माहितीये. हे तर काहीच नाही, पार्थिव तर लेव्हल 61 वर आहे पार!”, बाबा ऐकताहेत म्हणून अर्णवने माहिती पुरवणे चालूच ठेवले. “पण काय रे, ज्या आयलंडवर तुम्ही हल्ला करता, त्यांचेसुद्धा डिफेन्सेस असतीलच ना?”, लॅपटॉपच्या टकटकाटाच्या पार्श्वभूमीवर डॉ. ज्ञानेश्वरांनी विचारले. “असतात ना”, अर्णव सांगू लागला, “आपण अटॅक करायला नेमकं …Read more »

इन नोलान वुई ट्रस्ट

अवघा ८ वर्षांचा होता तो, जेव्हा ‘नासा’त काम करणाऱ्या एका नातेवाईकाने त्याला ‘अपोलो’ मोहिमेच्या प्रक्षेपणाचे फुटेज पाठवले होते. पठ्ठ्याने ते आपल्या पद्धतीने संपादित केले आणि ‘स्टॉप मोशन अॅनिमेशन’ तंत्रज्ञान वापरुन आपली पहिलीवहिली फिल्म बनवली, “स्पेस वॉर्स” (१९७८)! त्याचे नाव ख्रिस्तोफर नोलान!! पुढे भविष्यात तो बनवणार असलेल्या “इंटरस्टेलर”सारख्या (२०१४) महागाथेची चुणूक ही अशी होती. पुढे ९०च्या दशकात त्याने खूप साऱ्या कॉर्पोरेट फिल्म्स आणि शॉर्टफिल्म्स बनवल्या. यातल्या बहुतांश त्याची तेव्हाची प्रेयसी व सध्याची पत्नी एमा थॉमसने प्रोड्युस केल्या होत्या. सिनेमा बनवण्याचे त्याचे प्रयत्न मात्र काडीमात्रही यशस्वी होत नव्हते. मोठाच निराशाजनक काळ होता तो. परंतु याच काळात त्याने आता जिला लोक शोधून शोधून …Read more »

इंटेलिजंट, मनोरंजक, परिपूर्ण — विक्रम-वेधा

सम्राट विक्रमावर एक अवघड जबाबदारी येऊन पडते. दूर जंगलातल्या झाडावरून वेताळाला घेऊन येण्याची. तो पराक्रमी राजा जरादेखील न कचरता जंगलात शिरतो. वेताळाशी दोन हात करून त्याला पकडतो व खांद्यावर टाकतो. तो जायला निघतो तेवढ्यात खांद्यावर लादलेला वेताळ विचारतो, “ओरऽ कधा सोल्टऽ”? (एक गोष्ट सांगू?)!! ही सुरुवात आहे पुष्कर-गायत्री यांच्या “विक्रम-वेधा”ची. अॅनिमेटेड सिक्वेन्समध्ये दिसणारा हा दृश्यक्रम त्या वाक्यासोबतच लाईव्ह-अॅक्शनमध्ये परिवर्तित होतो आणि काही समजायच्या आतच प्रेक्षकांना एका भरीव कथानकात शोषून घेतो. चित्रपट संपल्यावरही तुम्ही त्यातून बाहेर पडू शकत नाहीत. एन्काऊंटर स्पेशालिस्ट विक्रम (आर. माधवन) हा उत्तर मद्रासमधील डॉन वेधाला (विजय सेतुपती) शोधतोय. वेधा, ज्याच्या भयकारितेच्या नुसत्या कथाच सांगितल्या जातात, जो अपराध …Read more »

जीओटी आणि भारतीय प्रतिभा

“गेम ऑफ थ्रोन्स” ही जगभरात पाहिली जाणारी, कदाचित जगातली आजघडीची सर्वाधिक प्रसिद्ध मालिका आहे. पण या मालिकेच्या न भूतो न भविष्यति यशात भारताचा सिंहाचा वाटा आहे, हे आपणापैकी किती जणांना ठाऊक आहे? या मालिकेच्या एकूणएक सूक्ष्मातिसूक्ष्म तपशीलांवर बारीकसारीक काम केलेले दिसते. अगदी प्रत्येक संस्कृतीच्या पोषाखांमध्ये आणि विविध ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या वस्त्रप्रावरणांमध्येदेखील अनेक अर्थ लपलेले आहेत. हे कपडे, तंबू वगैरे कुठे तयार होतात माहितीये? आपल्या दिल्लीतल्या लाजपतनगरमध्ये! अगदी पहिल्या पर्वापासून लाजपतनगरमधील “रंगारसन्स” ही कंपनी मालिकेतील सर्व वस्त्रप्रावरणे पुरवते. आणि सांगतो! ड्रॅगन्स!! अतिशय तपशीलवार तयार केलेले हे घातक परंतु आपल्या लाडक्या आईसाठी जीवाची बाजी लावणारे प्राणी कुठे तयार होतात माहितीये? आपल्या मुंबईतल्या …Read more »

Vikram Edke’s Lyrics in ‘Rotaract CHANGE Anthem’

"खलाओंको छाना हैं, हमने सुरजको थामा हैं!

हैं पता के जल जायेंगे, लेकिन सवेरा लाना हैं!!

खुदपे पूरा भरोसा करके, पावोंपे खड़े हम डटके,

अब भले चाहे तूफाँ आये, हम हैं तैय्यार!

हम तो हैं 'नचिकेता'की तरहा, हर 'प्रेयस'को आग लगाते,

और 'श्रेयस'की राहपे चलके, देते फूल लेते हैं कांटे!!

खलाओंको छाना हैं, हमने सुरजको थामा हैं!

हैं पता के जल जायेंगे, लेकिन सवेरा लाना हैं!!"

- विक्रम एडके ( हिंदी गीतांकन )