Category Archives: Reviews

मुकम्मल ग़ज़ल : ९६

रात्रीचे जवळजवळ साडेअकरा वाजलेयत आणि मी एका पंक्चरवाल्याच्या दुकानात बसून हे लिहितोय. घरी जायला अजून एखादा तास लागेल. एखादा तास मी थांबू शकत नाही का? मी थांबू शकतो. अंतर्मनात उसळणारा समुद्र नाही थांबू शकत. अर्ध्या तासापूर्वी सी. प्रेमकुमारचा “९६” बघून बाहेर पडलोय. तेव्हापासून सैरभैर झालोय मी. बऱ्याच वर्षांनंतर पडद्यावरच्या प्रेमकहाणीसाठी, त्या पात्रांसाठी, ते कुणीतरी जवळचे, सगे-सोयरे असल्यासारखी काळजी वाटली मला. आणि आता मी इथे डोकं खाजवत बसलोय की, मी या चित्रपटाबद्दल निष्पक्ष लिहू शकेन का? की पुरात वाहावत जाईन मी? कधीकधी बाजू घेणंच खरी निष्पक्षता असते! प्रेमाची स्वतःची एक भाषा असते, भावनेची! आणि या भावनेला जेव्हा शब्दांचा स्पर्श होतो, तेव्हा …Read more »

गॉडफादरचे महाभारत : चेक्का चिवंता वानम

रामायण-महाभारत यांची आजवर जगात इतक्या वेगवेगळ्या चित्रपटकारांनी वेगवेगळ्या पद्धतींनी मांडणी केलीये की विचारता सोय नाही. पण एखाद्या चित्रपटाच्या बाबतीत मात्र हा मान जर कुणाला मिळाला असेल तर तो फक्त आणि फक्त फ्रान्सिस फोर्ड कपोलाच्या “गॉडफादर”लाच (१९७२)! मुळचीच सशक्त कथा आणि तिची पडद्यावरील तितकीच ताकदवान मांडणी. “गॉडफादर”ने सिनेमाच्या मांडणीच्या क्षेत्रात इतकी वेगवेगळी दालने खुली केली की, तेव्हापासून आत्तापर्यंत माफियांवर जेवढे म्हणून काही सिनेमे बनले असतील त्यांच्यावर कुठे ना कुठे “गॉडफादर”चा प्रभाव हा दिसतोच. कधी अजाणतेपणी तर कधी जाणून-बुजून. वर मी रामायण आणि महाभारताचं उदाहरण दिलं ना, अगदी तसंच वेगवेगळ्या चित्रपटकारांनी आपापल्या दृष्टिकोनांप्रमाणे आणि अर्थातच वकूबांप्रमाणे “गॉडफादर”ची पुनर्मांडणी करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. …Read more »

कॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण

कलियुग हे आसुरी शक्तींचं युग आहे. त्रेता आणि द्वापारातच आसुरी शक्तींनी प्रचंड उच्छाद मांडलेला असताना, कलीत त्या शक्ती चरमसीमेवर नसतील तरच नवल! अशीच एक प्राचीन कृष्णशक्ती पृथ्वीवर आलीये. मागच्या अनेक युगांतरी तिचा ब्रह्मांडावर नियंत्रण मिळवण्याचा डाव फसला होता. परंतु हे युग काळीम्याला पोषक आहे. यावेळी चूक होणेच शक्य नाही. सबंध विश्वावरच नव्हे तर सगळ्यांच मितींमध्ये आपलं काळं साम्राज्य पसरायचं असेल, तर एका चेहऱ्याची गरज आहे. कुठे मिळणार तो चेहरा? दुसरीकडे नागराजचा काका असलेला सैतानी नागपाशा अमृतप्राशन केल्यामुळे अमर आहे, परंतु तरीदेखील तो नागराजपुढे वारंवार हरतच आलाय. तो का प्रत्येकवेळी हरतो, याचे कारण शोधून त्याच्या कुटील गुरूंनी एक आगळाच प्रयोग आखलाय …Read more »

मनोव्यापारांचा गूढ खेळ – जेराल्ड्स गेम

जेसी (कार्ला गुगिनो) आणि जेराल्ड (ब्रुस ग्रीनवूड) सप्ताहांत साजरा करण्यासाठी त्यांच्या अलाबामातील नदीकाठच्या घरी जातात. एकत्र वेळ घालवणं, मजा करणं आणि त्यायोगे आपलं रुक्ष होत चाललेलं वैवाहिक जीवन वाचवणं, हा त्यांचा हेतू असतो. परंतु जेराल्डची मजेची कल्पना जरा वेगळीच असते. प्रवासाला निघतानाच त्याने सोबत खरोखरीच्या हातकड्या घेतलेल्या असतात. तो जेसीला त्या हातकड्यांनी पलंगाला जखडून ठेवतो. आणि त्याची रेप फँटसी पूर्ण करण्यात तिला भाग घ्यायला लावतो. जेसीला ही कल्पना मनापासून आवडलेली नाहीये. परंतु ती तरीही प्रयत्न करते. तिला त्या प्रकाराची क्षणोक्षणी शिसारी येऊ लागते. ती जेराल्डला सोड म्हणते. आणि मी नाही सोडलं तर, जेराल्ड उत्तरतो. जेसी घाबरते. जेसी आणि जेराल्डच्या वयात …Read more »

इंटेलिजंट, मनोरंजक, परिपूर्ण — विक्रम-वेधा

सम्राट विक्रमावर एक अवघड जबाबदारी येऊन पडते. दूर जंगलातल्या झाडावरून वेताळाला घेऊन येण्याची. तो पराक्रमी राजा जरादेखील न कचरता जंगलात शिरतो. वेताळाशी दोन हात करून त्याला पकडतो व खांद्यावर टाकतो. तो जायला निघतो तेवढ्यात खांद्यावर लादलेला वेताळ विचारतो, “ओरऽ कधा सोल्टऽ”? (एक गोष्ट सांगू?)!! ही सुरुवात आहे पुष्कर-गायत्री यांच्या “विक्रम-वेधा”ची. अॅनिमेटेड सिक्वेन्समध्ये दिसणारा हा दृश्यक्रम त्या वाक्यासोबतच लाईव्ह-अॅक्शनमध्ये परिवर्तित होतो आणि काही समजायच्या आतच प्रेक्षकांना एका भरीव कथानकात शोषून घेतो. चित्रपट संपल्यावरही तुम्ही त्यातून बाहेर पडू शकत नाहीत. एन्काऊंटर स्पेशालिस्ट विक्रम (आर. माधवन) हा उत्तर मद्रासमधील डॉन वेधाला (विजय सेतुपती) शोधतोय. वेधा, ज्याच्या भयकारितेच्या नुसत्या कथाच सांगितल्या जातात, जो अपराध …Read more »

‘आय’ — अदक्कम मेलऽ

ஜ या तमिळ भाषेतील अक्षराचा उच्चार होतो ‘आय’ अथवा ‘ऐ’. एकच अक्षर, पण त्याचे अर्थ मात्र खूप सारे होतात. ‘आय’ म्हणजे सौंदर्य, मी, राग, बाण, सूड, प्रेम, गुरू, राजा, मालक, दुर्बल, आश्चर्य आणि अजून बरंच काही! परंतु जेव्हा शंकर हे सगळेच्या सगळे अर्थ एकाच कथेत बांधतो, तेव्हा बनतो ३ तास ८ मिनिटे चालणारा चमत्कार ‘आय’!! अविश्वसनीय, अद्भुत, अकल्प्य आणि तरीही तपशीलांचा पाया पक्का असलेले चित्रपट बनवण्यासाठी शंकर प्रसिद्ध आहे. त्याचा प्रत्येक अन् प्रत्येक चित्रपट हा तमिळच नव्हे, तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीला नवीन दिशा देत असतो. परंतु २०० कोटींच्या भयावह किमतीत बनवलेला ‘आय’सारखा चित्रपट शंकरनेही आजवर कधीच बनवला नव्हता, हे निश्चित!! …Read more »

विरलेल्या काठाचे सुंदर रेशमी वस्त्र : लोकमान्य – एक युगपुरुष

ज्यावेळी कुणी एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वावर कादंबरी लिहायला घेतो, त्यावेळी लेखकाला पृष्ठसंख्येचं जराही बंधन नसतं. त्यामुळे लेखक त्याला हवी तितकी पाने लिहू शकतो. मग त्या कादंबरीत कधी चरित्रनायकाचं संपूर्ण आयुष्य चितारलं जातं, तर कधी त्याचा काही भाग तेवढा रंगवला जातो. परंतु चित्रपटाची तशी परिस्थिती नसते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, चित्रपटाला वेळेचं बंधन असतं. एका विविक्षित वेळेतच, प्रेक्षकांना सलगपणे पाहाताना कंटाळा येणार नाही; अश्या बेताने चरित्रपट बनवायचा असतो. मग त्यात नायकाचं संपूर्ण आयुष्य दाखवायचं म्हटलं तरी दाखवता येत नाही. काही विशिष्ट घटनांवरच तेवढा भर द्यावा लागतो व दृक्माध्यमाच्या दृष्टीने अनावश्यक असलेले तपशील हे टाळावेच लागतात. माझ्या मते, चरित्रपटांचं खरं कार्य हे निवडलेलं …Read more »

स्वत:च्याच सापळ्यात अडकलेला : आजोबा

एखाद्या कादंबरीवर चित्रपट बनवणे ही अतिशय अवघड गोष्ट असते. अवघड अश्या अर्थाने की, ती एकप्रकारची तारेवरची कसरतच असते! काय ठेवायचं, काय कापायचं यासोबतच मूळ लेखकाची दृष्टी आणि आपला दिग्दर्शक या नात्याने असलेला दृष्टीकोन या सगळ्याचा समन्वय साधणे अतिशय जोखमीचे काम असते. या तराजूत तोलल्यास ‘शाळा’ हा अजिबात वेगळा प्रयोग नव्हता. एका चांगल्या पुस्तकाचे पडद्यावर केलेले माध्यमांतर, एवढेच ‘शाळा’बद्दल सांगता येईल. पण मग तरीही ‘शाळा’ का वेगळा वाटतो? काही जण त्याला मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक मैलाचा दगड का समजतात? याचे उत्तर आहे त्याच्या सादरीकरणात. कथा जरी जशीच्या तशी ठेवलेली असली, तरीही त्यातील पात्रे अचूक निभावणारे कलाकार शोधणे, त्यांच्याकडून चोख काम करवून …Read more »

अंतरात्म्यात कळ उठवणारा — हायवे

आज पहिल्यांदाच असं होतंय की मी एखाद्या चित्रपटाबद्दल लिहायला बसलोय, डोक्यात खूप वाक्यंही फिरतायत — हे सांगावं, ते सांगावं.. पण नेमकी सुरुवातच सुचत नाहीये. जिथे म्हणून कुठे सुरुवात करावीशी वाटतेय, तो प्रत्येकच मुद्दा शून्यवत् वाटतोय; मी जो अनुभव शब्दबद्ध करू पाहातोय, त्यापुढे साधा वाटतोय. एखादी कलाकृती पाहिली की कधीकधी काळजात सण्णकन् कळ उठते आणि तोंडातून आपसूकच ‘वाह..’ बाहेर पडते, परंतू क्वचितच असं होतं की, उठणारी कळ काळजातून न येता थेट आत्म्यातून येते आणि मग नकळतच त्या वेदनेला आवाज देणं ही गरज होऊन बसते. अशीच काहीशी विचित्र अवस्था “हायवे” पाहून झालीये माझी. एका प्रथितयश व्यावसायिकाच्या पोरीचे अपहरण होते आणि काही दिवसांतच …Read more »

सौंदर्यदृष्टीची सद्गुणविकृती: राम-लीला

स्वा. सावरकरांनी मानवी स्वभाव स्पष्ट करणारी एक जबरदस्त संकल्पना मांडलीय – सद्गुणविकृती! अर्थात सद्गुणांचाही जर एका मर्यादेपलिकडे अतिरेक झाला तर ते वाईटच. त्यातून विकृतताच उभी राहाते. सिनेमा क्षेत्रात या संकल्पनेचे चपखल उदाहरण आहे – संजय लीला भन्साळी! कमालीच्या सौंदर्यदृष्टीने चित्रीकरण करणारा हा माणूस केव्हा त्या सौंदर्यदृष्टीच्या अतिरेकात आणि अट्टाहासात हरवून जातो, त्याचे त्यालाही कळत नाही. एरव्ही व्यवस्थित ठिकाणी घडणारी कथा त्याला भव्यातिभव्य सेट्सवरच (तेही चित्रविचित्र रंगांच्या!) का घडायला हवी असते तेच कळत नाही. मोठमोठे सेट्स आणि पात्रांच्या साध्यासाध्या प्रसंगांतही प्रमाणबद्ध हालचाली कथेला मारून टाकतात आणि उरतो फक्त एक मोठ्ठा डोलारा! सद्गुणविकृती, दुसरं काय! अगदी हेच “राम-लीला”च्याही बाबतीत घडलंय. मुळात “रोमिओ-ज्युलिएट” …Read more »