Category Archives: Politics

दक्षिणपंथी – यातिसई

तमिळकम् ची तीन घराणी. पांड्य, चोळ आणि चेर. यांच्यापैकी पांड्य घराण्यातील सुप्रसिद्ध राजा म्हणजे कोचडय्यान रणधीरन्! सुप्रसिद्ध असं मी म्हणतो, प्रत्यक्षात या लोकांना आपल्याकडच्या विचारवंत म्हणवणाऱ्यांनी एकेका परिच्छेदात गुंडाळून आपल्या आवडीच्या आक्रमकांचा उदोउदो केल्याचं आपल्याला ठाऊकच आहे. तर हा कोचडय्यान रणधीरन्. रणधीरन् त्याचं नाव. को म्हणजे राजा. चडय्यान म्हणजे आयाळ. आयाळ असलेला राजा तो कोचडय्यान! या रणधीरनने चेर, चोळ वगैरे अनेकांचा पराभव केला व स्वतः सार्वभौम झाला. त्यामुळे अर्थातच त्याच्याबद्दल इतर अनेकांना प्रचंड राग होता. त्या अनेकांपैकी एक म्हणजे काल्पनिक ऐनार जमातीतला तरुण योद्धा कोदी! कोदीची महत्त्वाकांक्षा आणि त्यातून उद्भवणारं नाट्य मांडणारी कथा म्हणजे धरणी रासेन्द्रनचा चित्रपट ‘यातिसई’! ऐतिहासिक चित्रपट …Read more »

गेमसारखाच – टेट्रिस!

एखाद्या ऐतिहासिक कलाकृतीत निर्मात्यांना कल्पनाविलासाचं कितपत स्वातंत्र्य असायला हवं, हा एक मोठा प्रश्नच म्हटला पाहिजे. पराकोटीचे मुक्तीवादी म्हणतील की, संपूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे. पराकोटीचे कर्मठ म्हणतील की, अजिबातच नको. सत्य दोन्हीही टोकांना नाहीये. ते एक तर काही वेळा या बाजूला तरी असतं नाही तर त्या बाजूला तरी असतं आणि बहुतांशी वेळा दोन्हींच्या मध्येच कुठेतरी असतं. मुळात कल्पनाविलासाचं स्वातंत्र्य आणि त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया ही गोष्टच सापेक्ष आहे. ‘आरआरआर’चंच (२०२२) उदाहरण घ्या. रामराजू आणि भीम या खऱ्या व्यक्तिरेखा होत्या का? हो, होत्या. चित्रपटाची कथा खरी आहे का? बिलकुल नाही! अशा वेळी आपल्याला बॉलिवूडच्या अशाच धाटणीच्या चित्रपटांना होणारा जो टोकाचा विरोध पाहायची सवय …Read more »

रावणाचं फर्स्ट इम्प्रेशन!

वाल्मिकी रामायणात रावणाचा उल्लेख अगदी बालकांडापासूनच असला तरीही रावणाचं पहिलं वर्णन येतं ते थेट अरण्यकांडात स्वतः रावणाच्याच तोंडून. सर्ग ३१ मध्ये अकम्पन नावाचा राक्षस लंकेला जातो आणि रामाने जनस्थानातून राक्षसांचे उच्चाटन केल्याची बित्तंबातमी तो रावणाला सांगतो. तेव्हा क्रोधाने फुत्कारणारा रावण श्लोक क्र. ५ ते ७ येथे त्याला म्हणतो, “माझा अपराध करून इंद्र, यम, कुबेर आणि विष्णूही सुखाने नाही जगू शकणार. मी काळाचाही काळ आहे. मी आगीलाही जाळून टाकू शकतो. आणि मृत्यूलाही मृत्यूमुखी पाडू शकतो मी. मी जर चिडलो तर वाऱ्यालाही रोखू शकतो आणि सूर्यालाही भस्म करू शकतो”. रावण हे जे काही बोलतो यात आलंकारिकता आहे, परंतु अतिशयोक्ती अजिबातच नाही. त्याने …Read more »

मर्यादांमध्ये अडकून पडलेला – पोन्नियिन सेल्वन: १

दहाव्या शतकाच्या मध्यात चोळ साम्राज्याच्या सीमा इतर राज्यांच्या सीमांना धक्के देऊ लागल्या होत्या. ‘कडारम कोण्डान’ राजेन्द्र चोळाचं सर्वंकष साम्राज्य अद्याप अवतरायचं आहे, परंतु दुसरा परान्तक तथा सुन्दर चोळाचं (प्रकाश राज) साम्राज्य मात्र डौलाने उभं होतं. आणि त्या डौलाला पेलून धरणारे दोन समर्थ खांदे होते, ते म्हणजे आदित्य करिकालन् (चियान विक्रम) आणि अरुळमोळीवर्मन् (जयम् रवी). परंतु सुन्दर चोळाचं राज्य अवैध मानणारेही काही लोक होतेच की! काय कारण होतं त्यापाठी? त्याचं झालं असं की, मुळात सम्राट होता गण्डरादित्य चोळा. त्याच्यानंतर राज्य त्याचा मुलगा मदुरान्तकाला मिळायला हवं होतं. पण तो पडला खूपच लहान. त्यामुळे राज्य गेलं सुन्दर चोळाकडे. तेव्हा राज्य हे खरा वारस …Read more »

टबू – असंतांची गोष्ट

१८१४ साल आहे. इंग्लंडचं अमेरीकेशी तुंबळ युद्ध सुरू आहे. ईस्ट इंडिया कंपनी ही जणू प्रतिपरमेश्वरच असावी इतकी ताकदवान आहे. इंग्लंडचा राजा तिसरा जॉर्ज हा शब्दशः वेडा आहे आणि सारा कारभार हा त्याचा अहंमन्य, दारुडा पोरगा चौथा जॉर्ज (मार्क गॅटिस) सांभाळतो आहे. अशा भयाण वातावरणात एक छोटीशी घटना घडते. डेलनी शिपिंग कंपनीचा मालक होरेस डेलनीचा (एडवर्ड फॉक्स) मृत्यू होतो. आणि साऱ्या इंग्लंडचेच नव्हे तर अमेरीकेचेही राजकारण ढवळून निघते. का? अशी कोणती मालमत्ता होती होरेस डेलनीकडे की जिच्यासाठी सगळ्यांनीच झुरावं? त्याहून धक्कादायक गोष्ट घडते ती वेगळीच. डेलनीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्याचा आफ्रिकेत बेपत्ता झालेला मुलगा जेम्स (टॉम हार्डी) अचानक अवतरतो. होरेसच्या मालमत्तेचा तो …Read more »

मार्मिक भाष्याने समृद्ध – बिफॉरेनर्स

नॉर्वेतील पुढारलेल्या, शहरी ओस्लोमध्ये एके दिवशी अचानकपणे अश्मयुगीन लोक, प्राचीन व्हायकिंग्स आणि एकोणिसाव्या शतकातील मंडळी झुंडीच्या झुंडीने प्रकट होऊ लागतात. सुरुवातीचा बावरलेपणा ओसरल्यावर आजचे जगही त्यांना सामावून घेते, किमान प्रयत्न तरी करते. पण ते आजच्या लोकांचे पूर्वज असले तरीही त्यांच्या संस्कृतींमध्ये भूमी-आकाशाएवढे अंतर आहे. काही बाबतीत ते बरोबर आहेत तर काही बाबतीत आजचे लोक. यातून साहजिकपणे संघर्ष उद्भवतो. या पार्श्वभूमीवर ओस्लोच्या पोलिस दलातील अधिकारी लार्स हालंडला (निकोलाई क्लीव्ह ब्रोश) एका अश्मयुगीन महिलेच्या खुनाच्या तपासासाठी काहीशा अनिच्छेनेच इन्क्लुझिव्हनेसच्या हट्टापायी भरती केलेली, व्हायकिंग काळातून आलेली तरुण अधिकारी आल्फ्हिद्र एंगिन्स्दोत्तिरसोबत (क्रीस्टा कोसोनेन) काम करावं लागतं. कथानकाचा एक एक पापुद्रा उलगडू लागतो तसतसं आपल्याला …Read more »

आरआरआर — भारताची कथा भारताच्या भाषेत जगाला सप्रेम!

एक आहे जो वरिष्ठ अधिकाऱ्याच्या केवळ एका आज्ञेसाठी सहस्रोंच्या प्रक्षुब्ध जमावात फक्त एक लाठी घेऊन एकटाच घुसतो. जबर जखमी होतो पण आरोपीला पकडून आणतोच आणतो. त्याचं नाव आहे अल्लुरी रामराजू! दुसरा आहे तो जो पूर्ण वाढ झालेल्या जंगली वाघाला जाऊन बिनधास्त भिडतो. वाघ त्याच्या चेहऱ्यावर डरकाळी फोडतो तर हा पठ्ठ्या त्या वाघालाच घाम फोडणारी शतपट डरकाळी फोडतो. त्याचं नाव आहे कोमारम भीम! राम अग्नि आहे तर भीम जल. जलतत्त्व प्राण आणि उदानवायूत विभागले गेले तर अग्निशी अतूट मैत्री करते आणि तीच तत्त्वे जर एकमेकांच्या विरोधात उभी ठाकली तर देवासुरांनाही लाजवेल असा संग्राम होतो! याच अतूट मैत्रीची आणि दुर्लभ शत्रुत्त्वाची कथा …Read more »

The Kashmir Files

There’s a great scene in #TheKashmirFiles. When Krishna (Darshan Kumar) gives his speech in ANU (an obvious wordplay!), Radhika Menon (Pallavi Joshi) who plays a brilliant amalgamation of several real life characters, asks him to stop. And a student sitting right beside her says, “No, let him speak. We want to listen”. This sums up the mood of the nation, especially the youth, who genuinely wanted to listen to the horrendous genocide of the Kashmiri Hindus for decades but our film industries were so tied with peddling the goody goody and romantic side of the Kashmir – often with the …Read more »

अय्यप्पनुम कोशियुम – उपवास सुटल्याची तृप्ती

उदगमंडलमच्या मार्गावर आट्टप्पाडीच्या जंगलासमीप एक कार थांबवली जाते. ट्रॅफिक पोलिस, अबकारी खाते आणि पोलिस दल यांचं नेहमीचंच जॉईंट ऑपरेशन असतं ते. तो सबंध भाग दारुमुक्त म्हणून घोषित केलाय. नेमकं याच कारमध्ये दारुच्या एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल बारा बाटल्या सापडतात. कारचा दरवाजा उघडताना आत दारू पिऊन लास झालेला माजी सैनिक कोशी कुरियन (पृथ्वीराज सुकुमारन) खाली पडतो. आधीच गरम डोक्याचा त्यात दारू प्यायलेला कोशी त्या तिन्ही सुरक्षादलाच्या लोकांसोबत भांडू लागतो. पोलिसांच्या गाडीचा हेडलाईट फोडतो तो. कोशीच्या अंगात रग आहे. सगळ्यांना मिळून एकत्रितपणेसुद्धा आवरत नाही तो. ते पाहून पीआय अय्यप्पन नायर (बिजू मेनन) गाडीतून खाली उतरतो आणि कोशीच्या खाडकन मुस्काडात लावतो. …Read more »

अखंडा – यतो धर्मस्ततो जय:

कर्नाटकच्या सीमेवर सैनिकांची एक तुकडी मोहिमेवर असते. त्यांचं लक्ष्य असतं नक्षलवादी गजेंद्र साहू. कर्मधर्मसंयोगाने साहू पळून जाण्यात यशस्वी होतो व एका हिंदू साधूच्या आश्रमात शरण घेतो. आश्रम, तेथील महंत आणि त्यांचा समाजावरील प्रभाव यांच्या प्रचंड ताकदीची जाणीव साहूला होते व ती ताकद हस्तगत करण्यासाठी तो महंतांचा खून करतो आणि त्यांची जागा घेतो. त्याच आसपास एका कुटूंबात प्रसुती होते. जुळी मुलं. पण एक जिवंत आणि दुसरा मृत. गावात वास्तव्यास असलेला अघोरी अनपेक्षितरित्या त्या घरी येतो आणि मृत बालकाची मागणी करतो. मुलाची आई अद्याप मूर्च्छेत असते. वडील तिच्या नकळत ते बाळ अघोरीला देऊन टाकतात. हस्ते परहस्ते त्या मृत बालकाचा प्रवास होऊ लागतो. …Read more »