Category Archives: Bajirao

यह तो पूरा शैतान है..!

जेम्स ग्रँट डफ History of Mahrattas च्या पहिल्या खंडात लिहितो की, निज़ामने जेव्हा बाजीरावांना पूर्वी कधीच पाहिले नव्हते, तेव्हा त्याने आपल्या पदरचा एक चित्रकार बाजीरावांकडे धाडला. चित्रकाराला स्पष्ट सूचना होत्या की, तुला बाजीरावांचे जे काही पहिले दर्शन होईल, तसेच्या तसे चित्र काढून मला दाखव. चित्रकार परत आल्यावर त्याने जे चित्र काढले त्याचे वर्णन डफ करतो – “The painter executed his task, and on his return exhibited the Peishwa mounted, with the head and heel ropes of his horse in his feeding bag, like that of a common Mahratta, his spear resting on his shoulder, whilst he was rubbing with both …Read more »

दोन भेटी

बाजीराव ८ ऑक्टोबर १७३५ ला (Bajirao I – An Outstanding Cavalry General. Author Col. R. D. Palsokar. Pp 183) उदयपूरकडे निघाले. त्यांच्यासोबत सुमारे ८ ते १० सहस्र सैन्य होते. त्याशिवाय इतर मराठी फौजा मेवाड ते बुंदेलखंडदरम्यान (Palsokar. Pp 183) पसरलेल्या होत्या. जानेवारी १७३६ च्या अखेरीस त्यांनी तापी ओलांडली (Selections of Peshwa Daftar. Author G. S. Sardesai. Vol. 14.42 quoted at The Era of Bajirao. Author Uday S. Kulkarni. Pp 205). पुढे उदय कुलकर्णी (Pp 206-07) वंशभास्करच्या (Vol. 6) हवाल्याने एक घटना देतात. अशीच घटना ई. जयवंत पॉल (Bajirao The Warrior Peshwa. Pp 145) सर जदुनाथ सरकारांच्या हवाल्याने देतात. घडले असे …Read more »

सोशल मिडिया हाताळताना

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. मला माहितीये, फारच वापरून वापरून गुळगुळीत झालेलं वाक्य आहे हे, पण खरं आहे. आणि या समाजप्रियतेतूनच संपर्काची वेगवेगळी साधने विकसित झाली. कालौघात या साधनांचे स्वरूपही बदलत गेले. हा वेग इतका प्रचंड आहे की पत्रे, फोन आणि मोबाईल एकत्र पाहिलेली पिढी अजूनही अस्तित्वात आहे. परंतु गेल्या दशकभरात या संपर्काच्या क्षेत्राने त्याच्या मूळच्याच अतिप्रचंड वेगालाही चक्कर यावी असे वळण घेतले आणि उभा ठाकला सोशल-मिडिया! सोशल मिडिया म्हणजे काय? फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॅप, इन्स्टाग्राम, युट्यूब, स्नॅपचॅट वगैरे वगैरे? ही तर सोशल मिडियाची उदाहरणं झाली! या उदाहरणांना सोशल मिडिया का म्हणायचं, याच्या ४ मुख्य कसोट्या आहेत. १) वेब २.० : …Read more »

हिंदू चैतन्याचे अवतार!!

बाजीराव सरकारांचे सार्वजनिक व्यक्तीमत्त्व कसे होते? चिमाजी अप्पा एका पत्रात लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३०), “वाटेस घोड्यावर बसोन चालले होते. तेव्हा एके गावचा पाटील भेटीस आला. तेव्हा असावध होते. त्यामुळे पाटलासी सहजात बोलले, जे कोंबड्यांचे प्रयोजन आहे. घेऊन येणे”. इथे चिमाजी खरे तर रागावून लिहितायत की, राऊंनी उघडउघड पाटलाकडे कोंबड्या मागितल्या. परंतु बाजीराव असेच होते. राजकारणात कुटील, मात्र त्याव्यतिरिक्त जे मनात असेल तेच ओठांवर ठेवणारे शिपाईगडी. ते उघडपणे मांसाहार करीत. मद्यप्राशन करीत. त्याकाळी पाहायला गेलं तर दोन्हीही ब्राह्मण्याला न शोभणाऱ्या गोष्टी. परंतु तसंच पाहायचं झालं तर, हिंदुपदपातशाही हे एकच उद्दीष्ट मनी बाळगून पायाला भिंगरी बांधल्यागत देशभर ससैन्य संचार …Read more »

बाजीराव एकटेच समर्थ आहेत!!

बाजीरावांच्या फौजेची वाताहत झाली होती. पार दुर्दशाच म्हणा ना! किती जरी झालं, तरी त्र्यंबकराव हे मराठ्यांचे सेनापती होते. सरसेनापती खंडेराव दाभाड्यांचे पुत्र! त्यांनी आपल्या माहूताला आज्ञा केली आणि त्यासरशी त्यांच्या कसलेल्या, लढवय्या, हुजरातीच्या ५००० फौजेने पूर्वेकडून ढाढर नदी पार केली. त्यावर बाजीरावांच्या सैन्याला माघार घेण्यावाचून पर्यायच नव्हता. त्र्यंबकरावांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. ज्याची गेली अनेक वर्षे वाट पाहात होतो, ज्यासाठी गेले अनेक महिने जोखीम पत्करुन राजकारण मांडलं, तो विजय दृष्टीपथात आला होता. बाजीराव? अरे हाड्!! एकही युद्ध हारला नाही म्हणे! त्याने अजून खरा मर्द पाहिलाच कुठे होता? आज त्या बाजीरावला दाभाडे कुळीच्या तलवारीचं पाणी पाजतो! विचार करता करता नदी पारसुद्धा …Read more »

आरम्भ है प्रचण्ड!!

एप्रिल १७२०. सातारच्या अदालत राजवाड्यात दरबार भरला होता. क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर खासे शाहू छत्रपती उच्चासनावर विराजमान होते. त्यांनी एकवार समग्र दरबारावरुन नजर फिरवली. श्रीपतराव पंतप्रतिनिधी, आनंदराव सुमंत, नारोराम मंत्री, चिमणाजी दामोदर, अंबाजीपंत पुरंदरे, पिलाजी जाधवराव इ. मानकरी दरबारात मोठ्या इतमामाने हजर होते. फिरता फिरता शाहूंची नजर एकेठिकाणी अडली. अंमळ मागे दोन तरुण पोरे बसली होती. नुकतेच स्वर्गस्थ झालेल्या बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची ही मुले. त्यांच्यापैकी एक होता तो बाजीराव बल्लाळ! आणि दुसरा होता तो त्याचा धाकटा भाऊ चिमणाजी!! दोघांचीही उमर विशीच्या आतलीच. थोरल्या बाजीरावाला नुकतेच मिसरुड फुटले होते. धाकट्या चिमणाजीच्या चेहऱ्यावरची तर कोवळीकसुद्धा अद्याप गेली नव्हती. त्या दोघांना पाहाताच शाहूंना आपल्या …Read more »

तुज भगवान श्रीशिवराजा

सन १६६५! मिर्ज़ाराजा जयसिंह कोटीचण्डीयाग करीत होता. चण्डीका तोषावी ही त्याची इच्छा. रणांत जय मिळावा ही त्याची मनीषा. पण तो जय कुणासाठी? औरंग पातशहासाठी! हाय रे दुर्दैवा!! देवीपुढे जय मागतो तरी कुणासाठी, तर जो दिसताक्षणी देवीची मूर्ती फोडण्याची एकही संधी सोडणार नाही त्या पापी औरंग्यासाठी! आणि कुणाविरुद्ध? तर छातीचा कोट करुन अन् तळहातावर शिर घेऊन जो सुखदुःखं समे कृत्वा आयुष्य झिजवित होता त्या पुण्यश्लोक शिवाजीराजांविरुद्ध. काली कशी तोषावीं? त्याने पुरंदरला वेढा घातला. वज्रगड पाडला. लढता लढता मर्द मुरारबाजी कामी आला. जयसिंहासोबत आलेला दिलेरखान तर बोलून-चालून परकाच. तो ही हिंदूभूमी नासवायलाच आलेला. पण जयसिंह स्वतःला राजपूत म्हणवून घेतो आणि इमान कवडीमोल …Read more »

प्रचण्डताण्डवशिवम् : भाग २

दिल्लीच्या युद्धात बाजीरावांनी मुघल साम्राज्याचा सारा नक़्शाच उतरवून ठेवला होता. एकेकाळी भारतावर एकछत्री राज्य केलेले हे घराणे. पण आज त्यांना मराठ्यांच्या मेहेरबानीवर जगावे लागत होते. आजसुद्धा मुघलच बादशाह होते, सम्राट होते; पण निव्वळ नावालाच. खरा अंमल चालत होता मराठ्यांचाच! खरी भीती होती ती बाजीरावांचीच! ही गोष्ट बादशाह मुहंमदशाहला आतून पोखरुन काढत होती. अवघे ३८ वय होते त्याचे. त्याच्यापेक्षा एखाद्या वर्षाने लहानच असलेल्या बाजीरावांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर त्याला पार पंगू करुन सोडले होते. वज़ीर कमरुद्दीन खान, सादतखान, खानदौरान, मुहंमदखान बंगश असे एकापेक्षा एक रणगाज़ी हाताशी असूनदेखील बादशाह पांगळा होता, फक्त बाजीरावांमुळे! अश्या स्थितीत बादशाहला आपल्या एका जुन्याजाणत्या सरदाराची आठवण झाली. तो …Read more »

प्रचण्डताण्डवशिवम् : भाग १

१७३५ सालापासून मराठी फौजा ह्या माळवा, राजपुताना आणि बुंदेलखंड भागात धुमाकूळ घालत होत्या. लहानसहान युद्धे घडत होती, विजय मिळत होते. पण एक मोठं आणि निर्णायक युद्ध मात्र अटळ होतं. त्यावेळी दिल्लीचा बादशहा होता मुहंमदशाह! त्याने अयोध्येचा नवाब सादतखान, वज़ीर कमरुद्दीनखान, मुहंमदखान बंगश, जयसिंह, अभयसिंह अश्या सगळ्यांना गोळा करुन मराठ्यांना नेस्तनाबूत करायचे हुकूम दिले. आणि नोव्हेंबर १७३६ ला मराठी रियासतीचे शौर्यभास्कर, खासे बाजीराव पेशवे सरकार भोपाळला डेरेदाखल झाले! आसपासची भेलसासारखी छोटी छोटी गावे घेत, खंडणी गोळा करीत आग्र्यापासून अवघ्या काही कोसांवर मराठी फौजा गोळा झाल्या. युद्धनीतीचा एक साधासोपा नियम आहे. एकाच वेळी सगळे शत्रू अंगावर नाही घ्यायचे. शिवचरित्राचा अभ्यास करताना ही …Read more »

रणपंडित

आपल्याला एखाद्या थोराच्या वैयक्तिक आयुष्यात इतका काही वेड्यागत रस असतो की, बाजीराव म्हटल्यावर आठवते ती फक्त मस्तानी. ह्या मस्तानीचं गारुड एवढं काही गडद आहे की, त्यापलिकडचा बाजीराव आम्हाला नुसता ऐकूनही ठाऊक नसतो. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी स्वराज्याचा पेशवा झालेला हो! अवघं ४० च वर्षांचं शापित आयुष्य आणि त्यातही केवळ २० च वर्षांची कारकीर्द लाभलेला हा अचाट योद्धा! त्या २० च वर्षांच्या काळात त्याने हिंदवी स्वराज्याचं हिंदवी साम्राज्य केलं! जो संकल्प थोरल्या महाराजांनी मनी धरला होता, ह्या रणधीराने तो पूर्तीस नेला. महाराष्ट्रास वाकुल्या दाखवत ४०० वर्षे खिजवणारी दिल्ली जाळली, लुटली आणि फस्तच नव्हे, तर अंकित केली ती ह्याच बाजीरावाने! मेघ …Read more »