Category Archives: Sawarkar

टबू – असंतांची गोष्ट

१८१४ साल आहे. इंग्लंडचं अमेरीकेशी तुंबळ युद्ध सुरू आहे. ईस्ट इंडिया कंपनी ही जणू प्रतिपरमेश्वरच असावी इतकी ताकदवान आहे. इंग्लंडचा राजा तिसरा जॉर्ज हा शब्दशः वेडा आहे आणि सारा कारभार हा त्याचा अहंमन्य, दारुडा पोरगा चौथा जॉर्ज (मार्क गॅटिस) सांभाळतो आहे. अशा भयाण वातावरणात एक छोटीशी घटना घडते. डेलनी शिपिंग कंपनीचा मालक होरेस डेलनीचा (एडवर्ड फॉक्स) मृत्यू होतो. आणि साऱ्या इंग्लंडचेच नव्हे तर अमेरीकेचेही राजकारण ढवळून निघते. का? अशी कोणती मालमत्ता होती होरेस डेलनीकडे की जिच्यासाठी सगळ्यांनीच झुरावं? त्याहून धक्कादायक गोष्ट घडते ती वेगळीच. डेलनीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्याचा आफ्रिकेत बेपत्ता झालेला मुलगा जेम्स (टॉम हार्डी) अचानक अवतरतो. होरेसच्या मालमत्तेचा तो …Read more »

अंदमानातील मित्रमेळा

स्वा. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वातील शतावधी पैलूंपैकी एकच कोणता तरी सहज, सुगम पैलू निवडायला सांगितला, तर मी क्षणभराचाही विचार न करता उत्तर देईन की, सावरकरांचे व्यक्तिमत्त्व चुंबकासारखे होते! चुंबकाकडे जसे लोहकण आपसूकच आकर्षित होतात, तसे लोक सावरकरांच्या भोवती गोळा होत. म्हणजे अगदी लहानपणीदेखील तात्यांच्या भोवती परशुराम शिंपी, राजाराम शिंपी, पुढे देशभक्त म्हणून ख्याती प्राप्त केलेले गोपाळराव देसाई, वामनराव धोपावकर, भिकू वंजारी, त्र्यंबकराव वर्तक, वामनशास्त्री दातार वगैरे मित्रपरिवाराचा गराडा असायचा (स्वा. सावरकर चरित्र, लेखक शि. ल. करंदीकर, आ. २०११, पृ. ५४). मित्रमेळा तथा अभिनव भारताचे अगदी सुरुवातीचे सदस्य असलेले त्रिंबकराव म्हसकर आणि रावजी कृष्ण पागे हे मूळचे बाबारावांचे मित्र, परंतु ते देखील तात्यारावांच्या …Read more »

होळी – विदेशी कापडांची आणि विदेशी अहंकाराचीही!

वंगभंगाच्या चळवळीने देश ढवळून निघाला होता. स्वदेशीची चळवळही फोफावू लागली होती. लो. टिळक आणि त्यांचे सहकारी सर्वत्र फिरून या विषयावर जागृती करत होते. दि. १ ऑक्टोबर १९०५ या दिवशी पुण्यातील सार्वजनिक सभेच्या दिवाणखान्यात साहित्यसम्राट न. चिं. केळकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. त्यात एका तरुण विद्यार्थ्याने विदेशी मालावरील बहिष्काराला ठसठशीत स्वरूप यावे म्हणून विदेशी कापडांची होळी करण्यात यावी (स्वा. सावरकर चरित्र, शि. ल. करंदीकर, आ. २०११, पृ. १०६) अशी कल्पना मांडली. तो तरुण म्हणजेच स्वा. विनायक दामोदर सावरकर! केळकरांना काही ही कल्पना पसंत पडली नाही. ते विदेशी कपडे जाळून फुकट घालवण्यापेक्षा अंध, पंग, रोगग्रस्त अशा बांधवांना वाटून टाकणे योग्य, असे त्यांचे मत …Read more »

सावरकरकृत अस्पृश्यता निवारण और सामाजिक एकता

वीर सावरकर जी की जीवनी अद्भुत, अदम्य साहसों से लबालब भरी हुई है । नेता, संगठक, क्रांतिकारी, इतिहासकार, राजनीतीज्ञ, युद्धनीतीज्ञ, वक्ता, समाज सुधारक, लेखक, लेखक के रूप में भी नाटककार, उपन्यासकार, कथाकार, कवि, कवि के रूप में भी खंडकाव्यकार, दीर्घकाव्यकार, महाकवि, शाहीर; और न जाने कितने ही पहलू मात्र एक ही व्यक्ति के है, इस पर कदाचित आने वाली पीढियाँ विश्वास भी न करें । सरल तरह से देखें तो उन के जीवन के जन्म से ले कर लंडन जाने तक का काल विद्यार्थिदशा, लंडन में क्रांतिकारी, अंदमान से ले कर रत्नागिरी तक बंदी, रत्नागिरी से ले कर बिनाशर्त मुक्तता …Read more »

आत्मार्पण

या माणसाने देशासाठी घर सोडले, पदवी सोडली, सनद सोडली, नोकरी-व्यवसायाची संधी सोडली, पैसा सोडला, आरोग्य सोडले, ज्ञातिगत अस्मिता सोडली, संसारावर उदक सोडले आणि वेळ आली तेव्हा कर्तव्यतृप्तीने क्लांत देहदेखील सोडला. मी बोलतोय सावरकरांबद्दल. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांबद्दल. मी कधीच आजच्या दिवसाचा उल्लेख पुण्यतिथी म्हणून करत नाही, तर आत्मार्पणदिन म्हणून करतो ते यासाठीच. सावरकरांचे प्राण काळाने हरले नाहीत. किंबहूना तितकी काळामध्ये हिंमत तरी होती की नाही, हाच प्रश्न आहे. सावरकरांनी केलेय ते आत्मार्पण! होय, हिंदूधर्मातील शाश्वत सन्यासपरंपरेतील अनेकांनी गेली सहस्रावधी वर्षे केले तेच सहर्ष आत्मार्पण. ज्यावेळी सावरकरांना जाणीव झाली की, मातृभूमीच्या विमोचनार्थ आपण हाती घेतलेल्या व्रताचे उद्यापन झाले आहे, हिंदू समाजासाठी …Read more »

सावरकरांचे सामाजिक कार्य : एक वस्तुनिष्ठ आकलन

सावरकरांच्या आयुष्याचे ढोबळमानाने ५ कालखंड पडतात. पहिला जन्मापासून ते अटकेपर्यंत. दुसरा अंदमानपर्व. तिसरा रत्नागिरीपर्व. चौथा सुटकेपासून ते स्वातंत्र्यापर्यंत. आणि पाचवा स्वातंत्र्यापासून ते आत्मार्पणापर्यंत. ह्या कालखंडांपैकी रत्नागिरीपर्वात सावरकरांनी अतुल्य समाजकार्य केलेले दिसते. इतके की, डॉ. आंबेडकरांच्या “जनता”ने (एप्रिल, १९३३; संदर्भ: सावरकर-चरित्र, कीर, आ. २००८, पृ. २०८) सावरकरांच्या कार्याची तुलना थेट भगवान बुद्धांशी केली आहे. परंतु सावरकरांवर जे अनेक आक्षेप घेतले जातात, त्यात प्रमुख आक्षेप हादेखील असतो की, सावरकरांनी रत्नागिरीतून सुटल्यानंतर अथवा रत्नागिरीत स्थलबद्ध होण्याआधी कोणतेही सामाजिक कार्य केलेच नाही. सदर आक्षेपाला सावरकरद्वेषाचे, जातीद्वेषाचे आणि राजकारणाचे अनेक कंगोरे आहेत. आपण त्यामध्ये न पडता केवळ ह्या आक्षेपात कितपत तथ्य आहे याचा वस्तुनिष्ठपणे विचार …Read more »

सावरकर नावाचा ब्रॅण्ड!!

नव्याने विमानात बसणाऱ्यांची एक बेक्कार गंमत होते. उद्धरिणीने (लिफ्ट हो!) जाताना कसं वजनरहित वाटतं आणि डोकं पिसाहून हलकं होतं, तसं वाटतं. आणि त्या अवस्थेत प्रतितास शेकडो किलोमीटर वेगाने आपण हवेत तिरके भिरकावलो जात असतो!! बाऽबोऽऽ!! शब्दातीत अवस्था असते उड्डाण म्हणजे!! यात एक वेगळाच त्रास होतो. कान भयानक दुखतात. हवेचा दाब सतत बदलत असतो. त्यामुळे कानांवर प्रचंड ताण येतो. जरा कुठं वर-खाली झालं की, “पुटूक पुटूक” आवाज करत कानात लहानसे स्फोट होतात की “सुंईईईऽऽ..” आवाज करत अडकून राहिलेली हवा निघून जाते. परत नव्याने दाब. तात्पुरता बहिरेपणा येतो. उतरल्यावरही कित्येक तास कान दुखत राहातात. यासगळ्यात नाक व तोंड दाबायचं आणि प्रयत्नपूर्वक कानावाटे …Read more »