Category Archives: Pravaas Chitre

प्रवासचित्रे : ३. भारद्वाज

व्याख्याने-कार्यक्रमांनिमित्त होणाऱ्या सततच्या प्रवासाने मला काय दिलं? तर जीवाभावाची माणसं आणि कोणत्याही, अगदी कोणत्याही पुस्तकातून कधीच मिळू शकणार नाही अशी शिकवण! परवा मुंबईच्या व्याख्यानावेळी मी अधिवक्ता श्री. भारद्वाज चौधरी यांच्या घरी राहायला होतो! चौधरीसाहेब म्हणजे एकदा नव्हे तर चक्क दोनदा युपीएससी फायनल पार केलेला माणूस. साधेसुधे वकील नाहीत, तर गेली ९ वर्षे थेट सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करताहेत ते. अपार बुद्धीमत्ता, निढळाच्या घामाने कमावलेली श्रीमंती आणि कट्टर शिवसैनिकाचं भाबडं मन; यांचा त्रिवेणीसंगम म्हणजे आमचे भरद्वाज चौधरी! बोलता बोलता ते त्यांच्या लहानपणीचे किस्से सांगत होते. घरी अठराविश्वे दारिद्र्य. पहाटेच लवकर उठायचं. आवरुन ५.२०ची गाडी पकडायची. ती शाळेपासून ३-५ किमी अंतरावर सोडायची. तिथून …Read more »

प्रवासचित्रे : २. नीलेश

“स्टेशनला येणार का”? “१०० रु. होतील”! “म्हणजे? मीटरप्रमाणे नाही घेणार का? कश्यासाठी बसवलंय मग ते”? “मीटरने परवडत नाही साहेब. तिकडून भाडं नाही मिळत लवकर. असं करा, ८० द्या”. “स्टेशनवरुन भाडं मिळणार नाही? कोण विश्वास ठेवेल यावर! मीटरप्रमाणे नेत असलात तर चला, ८० च काय १८० सुद्धा देईन”. “नाही जमणार”. “ठिकंय. दुसरी रिक्षा पाहातो मी”. एक बारीक चणीचा, तिशीचा दिसणारा मनुष्य आमची ‘चर्चा’ ऐकत होता. तो जवळ आला आणि मला म्हणाला, “साहेब, माझ्यासोबत चला. मीटरप्रमाणं न्हेतो”. मी जाऊन त्याच्या रिक्षात बसलो. त्याने खटका ओढला. जरा पुढं गेल्यावर तो बोलला, “किती म्हणत होता हो साहेब तो मा×××द”? “१००”, मी म्हणालो, “नंतर ८० …Read more »

प्रवासचित्रे : १. षण्मुगम

सोलापूरात बाजीराव सांगून निघालो, तर रेल्वेत षण्मुगम भेटला. अर्थात, भेटला असं मी आत्ता म्हणतोय. भेटला तेव्हा तर आम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतो – ना नाव माहिती होते! माझ्या शेजारच्याच आसनावर तो बसला होता. लुंगी सांभाळत नाश्त्याची कसरत चालली होती त्याची. गडी साधारण चाळीशीचा. त्यातून तमिळ, हे बघताक्षणीच समजत होतं. आता तमिळ म्हटलं की, माझे अष्टसात्त्विक भाव जागृत होतात खरं तर, पण त्या राज्याला प्रचंड बुद्धीवैभव असूनही मख्ख चेहऱ्याचा आणि भिडस्तपणाचा शापच आहे की काय, न कळे. षण्मुगमच्या चेहऱ्यावरचे त्रयस्थ भाव पाहून मी स्वत:हून काहीच बोललो नाही. कानात रहमान घातला आणि ब्रह्मानंदी टाळी लागली माझी. जरावेळाने त्याने एक तमिळ मासिक काढले आणि …Read more »