Blog Archives

वादा

(धुन: इरऽविन्ग तीऽवाय. फिल्म: 96. संगीत: Govind Vasantha) ************************************ हक़ीक़त से कैसे साझा करे नयनों में तैरे सपने समय से क्या हम वादा करे दो ही मिले थे लम्हें रैना ले के चाँद के निशाँ बहती चली है और ही दिशा भोर ने है उस का आँचल यह भरा चाँद के है हिस्से में काली ख़ला फिर भी क्यूँ ना आह वह भरे हक़ीक़त से कैसे साझा करे नयनों में तैरे सपने एक आँच थी मेरा जीवन पिघला गयी एक बाँसुरी नयी सरगम सिखला गयी यूँ तो उम्र भर मैं थी भागी जिस के लिए थी वह कस्तुरी मेरे दो …Read more »

वृत्तावर्त

सुरज ढलता है तो, और जग में जलता है वह, अस्त-उदय खेल है यह भेद बुद्धी का! मृत्यू ध्रुव है तो, जन्म भी तो ध्रुव होगा, जनन-मरण चक्र है यह भेद दृष्टी का! अमावस के पीछे पौर्णिमा, कालिमा के आगे रक्तिमा, वृत्तावर्त से बना है भवसमुद्र सारा! धानानानानानाना..!! अधर्म के मार्ग पुष्प उगते, धर्ममार्गपर है शूल चुभते! पाप को चाहे यदि तजना, पुण्य की भी रस्सी क्यूँ ना छोडे! पाप क्या क्या धर्म (मुद्रा), पुण्य क्या अधर्म (के आयाम), एक को हम जो दे (मिटा किंतु), मुद्रा तो तब भी घूमेगी ना! धानानानानानाना..!! — © विक्रम श्रीराम एडके । ========================= …Read more »

मुकम्मल ग़ज़ल : ९६

रात्रीचे जवळजवळ साडेअकरा वाजलेयत आणि मी एका पंक्चरवाल्याच्या दुकानात बसून हे लिहितोय. घरी जायला अजून एखादा तास लागेल. एखादा तास मी थांबू शकत नाही का? मी थांबू शकतो. अंतर्मनात उसळणारा समुद्र नाही थांबू शकत. अर्ध्या तासापूर्वी सी. प्रेमकुमारचा “९६” बघून बाहेर पडलोय. तेव्हापासून सैरभैर झालोय मी. बऱ्याच वर्षांनंतर पडद्यावरच्या प्रेमकहाणीसाठी, त्या पात्रांसाठी, ते कुणीतरी जवळचे, सगे-सोयरे असल्यासारखी काळजी वाटली मला. आणि आता मी इथे डोकं खाजवत बसलोय की, मी या चित्रपटाबद्दल निष्पक्ष लिहू शकेन का? की पुरात वाहावत जाईन मी? कधीकधी बाजू घेणंच खरी निष्पक्षता असते! प्रेमाची स्वतःची एक भाषा असते, भावनेची! आणि या भावनेला जेव्हा शब्दांचा स्पर्श होतो, तेव्हा …Read more »

गॉडफादरचे महाभारत : चेक्का चिवंता वानम

रामायण-महाभारत यांची आजवर जगात इतक्या वेगवेगळ्या चित्रपटकारांनी वेगवेगळ्या पद्धतींनी मांडणी केलीये की विचारता सोय नाही. पण एखाद्या चित्रपटाच्या बाबतीत मात्र हा मान जर कुणाला मिळाला असेल तर तो फक्त आणि फक्त फ्रान्सिस फोर्ड कपोलाच्या “गॉडफादर”लाच (१९७२)! मुळचीच सशक्त कथा आणि तिची पडद्यावरील तितकीच ताकदवान मांडणी. “गॉडफादर”ने सिनेमाच्या मांडणीच्या क्षेत्रात इतकी वेगवेगळी दालने खुली केली की, तेव्हापासून आत्तापर्यंत माफियांवर जेवढे म्हणून काही सिनेमे बनले असतील त्यांच्यावर कुठे ना कुठे “गॉडफादर”चा प्रभाव हा दिसतोच. कधी अजाणतेपणी तर कधी जाणून-बुजून. वर मी रामायण आणि महाभारताचं उदाहरण दिलं ना, अगदी तसंच वेगवेगळ्या चित्रपटकारांनी आपापल्या दृष्टिकोनांप्रमाणे आणि अर्थातच वकूबांप्रमाणे “गॉडफादर”ची पुनर्मांडणी करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. …Read more »

कॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण

कलियुग हे आसुरी शक्तींचं युग आहे. त्रेता आणि द्वापारातच आसुरी शक्तींनी प्रचंड उच्छाद मांडलेला असताना, कलीत त्या शक्ती चरमसीमेवर नसतील तरच नवल! अशीच एक प्राचीन कृष्णशक्ती पृथ्वीवर आलीये. मागच्या अनेक युगांतरी तिचा ब्रह्मांडावर नियंत्रण मिळवण्याचा डाव फसला होता. परंतु हे युग काळीम्याला पोषक आहे. यावेळी चूक होणेच शक्य नाही. सबंध विश्वावरच नव्हे तर सगळ्यांच मितींमध्ये आपलं काळं साम्राज्य पसरायचं असेल, तर एका चेहऱ्याची गरज आहे. कुठे मिळणार तो चेहरा? दुसरीकडे नागराजचा काका असलेला सैतानी नागपाशा अमृतप्राशन केल्यामुळे अमर आहे, परंतु तरीदेखील तो नागराजपुढे वारंवार हरतच आलाय. तो का प्रत्येकवेळी हरतो, याचे कारण शोधून त्याच्या कुटील गुरूंनी एक आगळाच प्रयोग आखलाय …Read more »

ईसईज्ञानी

सिम्फनी लिहायला किती वेळ लागतो? मोठमोठे संगीतकार त्यासाठी ६ महिने ते १ वर्षसुद्धा घेतात. पण एक भारतीय कलाकार आहे ज्याने आजपासून पाव शतकापूर्वी सिम्फनी लिहिलीये. सिम्फनी लिहिणारा तो भारतातलाच नव्हे, तर आशिया खंडातला पहिलाच संगीतकार आहे. त्याला किती काळ लागला माहितीये? ६ महिने? एखादं वर्षं? १९९३ साली लंडनच्या रॉयल फिलहार्मनिक ऑर्केस्ट्राला घेऊन त्याने ही सिम्फनी अवघ्या १३ दिवसांत लिहिलीये! आणि तिचा दर्जा ऐकून इंग्लंडमधील त्या प्राचीन वाद्यवृंदाने आश्चर्याने तोंडात बोटे घातली होती. सांगायची गरजच नाही की, हा पराक्रम करण्याची ताकद असलेला केवळ एकच संगीतकार सबंध जगात आहे, ‘ईसईज्ञानी’ इलयराजा!! राजा प्रसंग ऐकतो. जागच्या जागी चाल लिहितो. आणि अवघ्या ५ मिनिटांत …Read more »

लढ मित्रा

डरतो कश्याला तू लढ मित्रा लढत्याची दासी धरणी मित्रा दु:ख तितुके माया हो सूर्य गिळतो छाया हो टाकीच्या घावांमधुनी देव बनते काया हो वेदना रे वीराला लिहिली असे जन्माला वेणांची करुनि गीते गा तू आपुल्या कर्माला तुझिया रे कष्टांनी हो अवनिला आधारा तू बांध माथ्यावरती जखमांचा हा भारा व्रण हे जरी भीषण रे युद्ध वीरा भूषण रे तू पार्थ तुझा तू कृष्ण तुझा तू तुझी गीता रे होतील कविता ह्या तलवारी देतील अंधारा त्या ललकारी डरतो कश्याला तू लढ मित्रा लढत्याची दासी धरणी मित्रा गंध मातीचा येण्या चार महिने ताप हो तपाचे फळ मिळण्या पाहावी लागते वाट हो शंभरवेळा पडताना …Read more »

आठवणींच्या गल्लीबोळांतून

नव्वदचं दशक हे अनेक अर्थांनी नॉस्टॅल्जियाचं दशक आहे. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या अनेकांसाठी ते नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद, जतिन-ललित अश्या जोड्यांनी, अन्नू मलिक वगैरेंसारख्या सफाईदार “बाजीगरां”नी व विजू शाहसारख्या अनेकानेक अंडररेटेड माणकांनी बनवलेल्या आणि कुमार, अलका, उदित वगैरेंनी बेभान होऊन गायलेल्या दिलतोड गीतांचं दशक आहे; तर नव्वदच्याच दशकात जन्मलेल्या आजच्या तरुणांसाठी ते इंडीपॉप गाण्यांमधील नव्या प्रवाहांत केलेल्या सचैल स्नानांचं दशक आहे. दोन्हीही प्रकारच्या मंडळींसाठी ते एकत्रितपणे समीरचंदेखील दशक आहे. आणि दोन्हीही प्रकारची मंडळी त्या दिवसांबद्दल बोलताना जरादेखील थकत नाहीत. याच दशकाने सोनू निगम, शान, केके, शंकर असे हिरेसुद्धा दिले! याच दशकाने शंकर-अहसान-लॉय दिले आणि याच दिवसांनी रहमान दिला!! त्यामुळे “आशिकी” (१९९०) …Read more »

कधी कधी

कधी कधी रात्र विरताना, दिवस उगवायाचा असतो अजून, सूर्य उमलायाचा असतो अजून! चंद्राचं इंधन पुरतं संपलेलं नसतं आणि लुकलुकत असतात ताऱ्यांचे लाखो पलिते, क्षितिजचुंबी गगनाच्या लाक्षागृहात! कुणीतरी साखरझोपेत कूस बदलतो, कुणाची मिठी घट्ट होते कुठे कुरकुरत असतो पंखा तर कुठे स्वप्नांची होडी पैल होते! अश्या एकाकी अंधारवेळी मी टक्क जागा असतो, कधी सुटलेले हात आठवत, तर कधी मिटलेली दारे साठवत! तू विचारलं होतंस, ‘विसरणार तर नाहीस ना मला’ आणि ‘मला विसर, माझं लग्न ठरलंय’, हेदेखील तूच म्हणाली होतीस! मला तेव्हाही उत्तर सुचलं नव्हतं, मला तेव्हाही उत्तर सुचलं नाही! त्या एकांत प्रहरी मात्र, सुचत राहातात सारीच न दिलेली उत्तरे, आणि त्यावरच्या …Read more »

गुलज़ार

नज़्म पूरे जोबन पे थीनूर के कोहरे बहते थेइश्क़ तो तब भी था मगरवह और जगह रहते थे चलते-बहते एक रातसय्यार टकराया चाँद सेनूर मिला नज़्म को जा करअब्रों की दिवार फाँद के सागर डोल गया था उस दमतारे सारे उफनने लगे थेदूर कहीं कोहसारों मेंख़्वाब पकने बनने लगे थे वक़्त थम गया था उस वक़्तनज़्म-ओ-नूर का दीदार हुआइक हलचल सी हुई उजालों मेंइक नाम उठा ‘गुलज़ार’ हुआ — © विक्रम श्रीराम एडकेGulzar #HBDGulzarSaab