प्रवासचित्रे : २. नीलेश

“स्टेशनला येणार का”? “१०० रु. होतील”! “म्हणजे? मीटरप्रमाणे नाही घेणार का? कश्यासाठी बसवलंय मग ते”? “मीटरने परवडत नाही साहेब. तिकडून भाडं नाही मिळत लवकर. असं करा, ८० द्या”. “स्टेशनवरुन भाडं मिळणार नाही? कोण विश्वास ठेवेल यावर! मीटरप्रमाणे नेत असलात तर चला, ८० च काय १८० सुद्धा देईन”. “नाही जमणार”. “ठिकंय. दुसरी रिक्षा पाहातो मी”. एक बारीक चणीचा, तिशीचा दिसणारा मनुष्य आमची ‘चर्चा’ ऐकत होता. तो जवळ आला आणि मला म्हणाला, “साहेब, माझ्यासोबत चला. मीटरप्रमाणं न्हेतो”. मी जाऊन त्याच्या रिक्षात बसलो. त्याने खटका ओढला. जरा पुढं गेल्यावर तो बोलला, “किती म्हणत होता हो साहेब तो मा×××द”? “१००”, मी म्हणालो, “नंतर ८० …Read more »

वैनतेय

काल तू मला मारलं होतंस ना, पाहा आज मी पुन्हा उभा राहिलोय! तू करुन टाकलं होतंस छिन्नविच्छिन्न मला, मी ते सगळे तुकडे गोळा केले आणि सांधलंय बघ हे देहभर आभाळ! आजपासून इथे बरसतील केवळ असण्याचेच मेघ, होय मी आहे अजूनही, मी आहे आणि मी राहाणार, मी असलो आणि नसलो तरीही नेहमीच तुझ्या अपराधगंडाने सडलेल्या मनात, मी राहाणार! कारण.. कारण, तूच तर होतास ना मला तोडून-मोडून फेकणारा? तू मला तोडलंस आणि पाहा, मी झालोय कृष्णबासरी! अवघं वृंदावन डोलवण्याची ताकद आहे माझ्यात आज!! तुझा एक एक घाव जरी मला संपवण्यासाठी होता तरी नव्याने मला माझ्याच दगडात माझ्याच हक्काचा देव सापडत होता त्यातून.. …Read more »

तेरा नाम

लफ़्ज़ अटक-अटकके आते है इन दिनों ख़यालात बिखरतेसे जा रहे है बदमाश बदली चिढ़ाती है तेरा नाम ले-लेके दिलके दोशमें उलझसा जाता हूँ मैं तब.. तब वहीं तेरा नाम खुद एक नज़्म बनके चलता है मेरे साथ सुलझाता है वह खयालोंके धागे, जो अस्तव्यस्त पडे रहते है किसी सुर्ख़ जगह.. ऐसी जगह, जहा ना सुरज होता है उपर ना पाँवोंतले ज़मीं बस यहीं सोचके रह जाता हूँ मैं की – यह किस नदीमें बहता चला जा रहा हूँ मैं, ना हाथमें पतवार है, ना बहावको कोई दिशा साथ है तो बस इक तेरे नामकी खुशबू जो खींचके ले जा रही …Read more »

प्रवासचित्रे : १. षण्मुगम

सोलापूरात बाजीराव सांगून निघालो, तर रेल्वेत षण्मुगम भेटला. अर्थात, भेटला असं मी आत्ता म्हणतोय. भेटला तेव्हा तर आम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतो – ना नाव माहिती होते! माझ्या शेजारच्याच आसनावर तो बसला होता. लुंगी सांभाळत नाश्त्याची कसरत चालली होती त्याची. गडी साधारण चाळीशीचा. त्यातून तमिळ, हे बघताक्षणीच समजत होतं. आता तमिळ म्हटलं की, माझे अष्टसात्त्विक भाव जागृत होतात खरं तर, पण त्या राज्याला प्रचंड बुद्धीवैभव असूनही मख्ख चेहऱ्याचा आणि भिडस्तपणाचा शापच आहे की काय, न कळे. षण्मुगमच्या चेहऱ्यावरचे त्रयस्थ भाव पाहून मी स्वत:हून काहीच बोललो नाही. कानात रहमान घातला आणि ब्रह्मानंदी टाळी लागली माझी. जरावेळाने त्याने एक तमिळ मासिक काढले आणि …Read more »

आरम्भ है प्रचण्ड!!

एप्रिल १७२०. सातारच्या अदालत राजवाड्यात दरबार भरला होता. क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर खासे शाहू छत्रपती उच्चासनावर विराजमान होते. त्यांनी एकवार समग्र दरबारावरुन नजर फिरवली. श्रीपतराव पंतप्रतिनिधी, आनंदराव सुमंत, नारोराम मंत्री, चिमणाजी दामोदर, अंबाजीपंत पुरंदरे, पिलाजी जाधवराव इ. मानकरी दरबारात मोठ्या इतमामाने हजर होते. फिरता फिरता शाहूंची नजर एकेठिकाणी अडली. अंमळ मागे दोन तरुण पोरे बसली होती. नुकतेच स्वर्गस्थ झालेल्या बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची ही मुले. त्यांच्यापैकी एक होता तो बाजीराव बल्लाळ! आणि दुसरा होता तो त्याचा धाकटा भाऊ चिमणाजी!! दोघांचीही उमर विशीच्या आतलीच. थोरल्या बाजीरावाला नुकतेच मिसरुड फुटले होते. धाकट्या चिमणाजीच्या चेहऱ्यावरची तर कोवळीकसुद्धा अद्याप गेली नव्हती. त्या दोघांना पाहाताच शाहूंना आपल्या …Read more »

सावरकर नावाचा ब्रॅण्ड!!

नव्याने विमानात बसणाऱ्यांची एक बेक्कार गंमत होते. उद्धरिणीने (लिफ्ट हो!) जाताना कसं वजनरहित वाटतं आणि डोकं पिसाहून हलकं होतं, तसं वाटतं. आणि त्या अवस्थेत प्रतितास शेकडो किलोमीटर वेगाने आपण हवेत तिरके भिरकावलो जात असतो!! बाऽबोऽऽ!! शब्दातीत अवस्था असते उड्डाण म्हणजे!! यात एक वेगळाच त्रास होतो. कान भयानक दुखतात. हवेचा दाब सतत बदलत असतो. त्यामुळे कानांवर प्रचंड ताण येतो. जरा कुठं वर-खाली झालं की, “पुटूक पुटूक” आवाज करत कानात लहानसे स्फोट होतात की “सुंईईईऽऽ..” आवाज करत अडकून राहिलेली हवा निघून जाते. परत नव्याने दाब. तात्पुरता बहिरेपणा येतो. उतरल्यावरही कित्येक तास कान दुखत राहातात. यासगळ्यात नाक व तोंड दाबायचं आणि प्रयत्नपूर्वक कानावाटे …Read more »

तुज भगवान श्रीशिवराजा

सन १६६५! मिर्ज़ाराजा जयसिंह कोटीचण्डीयाग करीत होता. चण्डीका तोषावी ही त्याची इच्छा. रणांत जय मिळावा ही त्याची मनीषा. पण तो जय कुणासाठी? औरंग पातशहासाठी! हाय रे दुर्दैवा!! देवीपुढे जय मागतो तरी कुणासाठी, तर जो दिसताक्षणी देवीची मूर्ती फोडण्याची एकही संधी सोडणार नाही त्या पापी औरंग्यासाठी! आणि कुणाविरुद्ध? तर छातीचा कोट करुन अन् तळहातावर शिर घेऊन जो सुखदुःखं समे कृत्वा आयुष्य झिजवित होता त्या पुण्यश्लोक शिवाजीराजांविरुद्ध. काली कशी तोषावीं? त्याने पुरंदरला वेढा घातला. वज्रगड पाडला. लढता लढता मर्द मुरारबाजी कामी आला. जयसिंहासोबत आलेला दिलेरखान तर बोलून-चालून परकाच. तो ही हिंदूभूमी नासवायलाच आलेला. पण जयसिंह स्वतःला राजपूत म्हणवून घेतो आणि इमान कवडीमोल …Read more »

प्रचण्डताण्डवशिवम् : भाग २

दिल्लीच्या युद्धात बाजीरावांनी मुघल साम्राज्याचा सारा नक़्शाच उतरवून ठेवला होता. एकेकाळी भारतावर एकछत्री राज्य केलेले हे घराणे. पण आज त्यांना मराठ्यांच्या मेहेरबानीवर जगावे लागत होते. आजसुद्धा मुघलच बादशाह होते, सम्राट होते; पण निव्वळ नावालाच. खरा अंमल चालत होता मराठ्यांचाच! खरी भीती होती ती बाजीरावांचीच! ही गोष्ट बादशाह मुहंमदशाहला आतून पोखरुन काढत होती. अवघे ३८ वय होते त्याचे. त्याच्यापेक्षा एखाद्या वर्षाने लहानच असलेल्या बाजीरावांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर त्याला पार पंगू करुन सोडले होते. वज़ीर कमरुद्दीन खान, सादतखान, खानदौरान, मुहंमदखान बंगश असे एकापेक्षा एक रणगाज़ी हाताशी असूनदेखील बादशाह पांगळा होता, फक्त बाजीरावांमुळे! अश्या स्थितीत बादशाहला आपल्या एका जुन्याजाणत्या सरदाराची आठवण झाली. तो …Read more »

प्रचण्डताण्डवशिवम् : भाग १

१७३५ सालापासून मराठी फौजा ह्या माळवा, राजपुताना आणि बुंदेलखंड भागात धुमाकूळ घालत होत्या. लहानसहान युद्धे घडत होती, विजय मिळत होते. पण एक मोठं आणि निर्णायक युद्ध मात्र अटळ होतं. त्यावेळी दिल्लीचा बादशहा होता मुहंमदशाह! त्याने अयोध्येचा नवाब सादतखान, वज़ीर कमरुद्दीनखान, मुहंमदखान बंगश, जयसिंह, अभयसिंह अश्या सगळ्यांना गोळा करुन मराठ्यांना नेस्तनाबूत करायचे हुकूम दिले. आणि नोव्हेंबर १७३६ ला मराठी रियासतीचे शौर्यभास्कर, खासे बाजीराव पेशवे सरकार भोपाळला डेरेदाखल झाले! आसपासची भेलसासारखी छोटी छोटी गावे घेत, खंडणी गोळा करीत आग्र्यापासून अवघ्या काही कोसांवर मराठी फौजा गोळा झाल्या. युद्धनीतीचा एक साधासोपा नियम आहे. एकाच वेळी सगळे शत्रू अंगावर नाही घ्यायचे. शिवचरित्राचा अभ्यास करताना ही …Read more »

द्वीपशिखा

पोर्टब्लेअरपासून अवघ्या ८-१० मिनिटांच्या अंतरावर ‘रॉस’ नावाचे बेट आहे. ब्रिटिश खलाशी डॅनिअल रॉसच्या नावावरुन या बेटाचे नाव ठेवलेय. ह्या बेटावर राहाते एक देवी! अनुराधा राव नाव तिचं. पण का तिची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला? काय एवढं विशेष आहेत तिच्यात? एकाच वाक्यात सांगायचं झालं तर, अंदमानातली सगळ्यात महत्त्वाची अगदी तिथल्या सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांच्याइतकी आणि सेल्युलरजेलइतकीच महत्त्वाची गोष्ट आहे ती! तुम्हाला खोटं वाटेल, पण माझ्या दौऱ्यात पहिल्या दिवशी त्यांची भेट होऊ शकली नाही तर तिसऱ्या दिवशी काही स्थळं पाहाणे रद्द केले मी, पण तिची भेट घेतलीच! यावरुनच तिच्या महत्तेची कल्पना यावी!! अनुराधाचे वडील रॉस बेटावरचे रहिवासी. ते वारल्यावर निव्वळ कुतुहलापोटी अनुराधा ह्या बेटावर …Read more »

Vikram Edke’s Lyrics in ‘Rotaract CHANGE Anthem’

"खलाओंको छाना हैं, हमने सुरजको थामा हैं!

हैं पता के जल जायेंगे, लेकिन सवेरा लाना हैं!!

खुदपे पूरा भरोसा करके, पावोंपे खड़े हम डटके,

अब भले चाहे तूफाँ आये, हम हैं तैय्यार!

हम तो हैं 'नचिकेता'की तरहा, हर 'प्रेयस'को आग लगाते,

और 'श्रेयस'की राहपे चलके, देते फूल लेते हैं कांटे!!

खलाओंको छाना हैं, हमने सुरजको थामा हैं!

हैं पता के जल जायेंगे, लेकिन सवेरा लाना हैं!!"

- विक्रम एडके ( हिंदी गीतांकन )