बहुत याद येते..!

Written by

in

जेव्हा जेव्हा अवचित बरसात येते,
माझ्या पागल दिलाला तुझी, बहुत याद येते..!

माझ्या पागल दिलाची कहाणी, सांगू मी कुणा?
रोजच सताविती मजला, या दग्ध प्रीतिखुणा!
जेव्हा जेव्हा अलवार अशी चांदरात येते,
माझ्या पागल दिलाला तुझी, बहुत याद येते!

माझ्या पागल दिलाची कहाणी, ऐकूनी ये साजणी
गूज तुझेही उमटू दे आता, माझ्या अवखळ मनी!
जेव्हा हलके संध्या धरेला कुर्निसात देते,
माझ्या पागल दिलाला तुझी, बहुत याद येते!

बहुत याद येते!
बहुत याद येते!

– © विक्रम.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *