Blog
-
" ते…. "
जेव्हा तुम्ही-आम्ही घालत असतो आपल्या कुजलेल्या दु:खाचे लोणचे,
-
याद हैं वोह हमारी पहली मुलाक़ात की रात..?
याद हैं वोह हमारी पहली मुलाक़ात की रात?हमारी दोस्तीका मोती तुमने अपनी नर्म पल्कोंपे तोला था..शायद धनकमें कुछ और रंग जुड़ गए होंगे उस रात,या फिर यूँ कहो की ज़िन्दगी के रेगिस्तांमें बरसात हुई थी पहली बार..एक रात वोह भी तो थी,जब हमने सारी दुनियादारीको लात मारके कहकहे लगाए थे!लगा था जैसे वक़्त के पन्नोंपे किसीने पेपरवेट रख दिया हो!‘यारी-दोस्ती और बात हैं, तो दुनियादारी कुछ और’बात ये समझके भी नहीं समझना चाहते थे उस रात हम तीनों..कल को एक रात वो भी तो आएगी..की जब तुम चली जाओगी..हम भी आंसूओंको बारिश का पानी कहके जी बहला लेंगे!ज़िन्दगी तो किसी पहिए की तरह हैं, गोल-गोल!फिर किसी मोडपे मुलाक़ात तो होगी ही होगी..!तब तुमसे पूछेंगे,याद हैं वो हमारी पहली मुलाक़ात की रात?हमारी दोस्ती का मोती तुमने अपनी नर्म पल्कोंपे तोला था..!– © विक्रम. -
जी करता हैं…
जी करता हैं, गुलाल बन जाऊँ..चीखता-चिल्लाता बवाल बन जाऊँ..!दूरीयों, मजबूरीयोंसे अलग..उन रेशमी हाथोंका रुमाल बन जाऊँ..!जिंदगी क्यूँ सिखाए मुझे उसके मायने..आज खुद जवाब, खुद सवाल बन जाऊँ..!पीछे घनी धुंध, आगे गहरा कुऑं..डर को डरानेवाली मिसाल बन जाऊँ..!कभी किशन बन बन्सी बजाऊं..कभी गाय, तो कभी गोपाल बन जाऊँ..!हो जाऊँ आज मैं परोंसे भी हलका..मस्तीमें उडता खयाल बन जाऊँ..!आखिर कब तक उठाए गैरोंके बोझ..आज खुद के बोझ का हमाल बन जाऊँ..!जी करता हैं.. जी करता हैं..!– © विक्रम. -
जब तक है जान (संगीत-समीक्षण) : भाग – १
चित्रपटागणिक प्रगती करत करत कायम स्वतःची शैली बदलत राहणारा माझ्या माहितीतील एकमेव संगीतकार म्हणजे ए. आर. रहमान! १९९५ च रहमान २००५ साली आढळत नाही आणि २००५ चा रहमान २०१२ साली आढळणार नाही!
परंतु मला सर्वाधिक आकर्षित करणारी गोष्ट हि नव्हे! मला कळतं तेव्हापासून मी रहमानचं सर्व संगीत ऐकत आलोय. सुरुवातीच्या काळात त्याने लता मंगेशकर, आशा भोसले, एस. पी. बालासुब्रह्मण्यम, येसुदास, एस. जानकी, के. एस. चित्रा आदी दिग्गजांसोबत खूप सुरेख गाणी दिली. आजही तो, गीताची तशी गरजच असेल तर या महानुभावांकडून गाऊन घेतोच. पण त्याने लवकरच बहुधा विचार सुरु केला असावा की, ‘ही मंडळी गेल्यानंतर काय‘? म्हणूनच त्याने जाणीवपूर्वक या लोकांची जागा नव्या गायकांना देणे सुरु केले. सुरुवातीला त्याच्यावर चहूबाजूंनी प्रखर टीकाही झाली, परंतु तो डगमगला नाही. १०-१२ वर्षे मेहनत घेऊन त्याने काही हिरे घडवले. आज हे गायक उपरोक्त दिग्गजांच्या तुलनेत कुठेही कमी तर नाहीतच, उलट या प्रत्येकाचा स्वत:च एक दिग्गज बनण्याकडे प्रवास चालू झाल्याचे स्पष्ट दिसते. ही काही नावे पहा – कार्तिक, जावेद अली, बेनी दयाल, चिन्मयी, हर्षदीप कौर, विजयप्रकाश, नरेश अय्यर, राशीद अली, विजय येसुदास – सगळीच नावे देणे मला शक्यही होणार नाही. कदाचित, घेतलेल्या नावांपेक्षा राहिलेली नावेच अधिक असतील!
आता या लोकांना घडवलं म्हणजे नेमकं काय केलं? काही उदाहरणे देतो. जावेद अलीची रहमानकडे गायलेली जश्न-ए-बहारा (जोधा अकबर – २००८) पासून ते जोहरा जबीन (एक दिवाना था – २०१२) या चार वर्षांतली सारी गीते ऐका. तुम्हाला त्याचा ‘एक साधा गायक’ ते ‘एक दिग्गज’ असा झालेला प्रवास सहज जाणवेल. तीच गोष्ट चिन्मयीची, कार्तिकची आणि इतर सर्वांची! किलीमांजारो (एनधिरन – २०१०) हे गीत ज्या जावेद-चिन्मयी जोडीने गायलेय, त्याच जोडीने मैय्या यशोदा (झूठा हि सही – २०१०) देखील गायलेय हे खरेच वाटत नाही इतके वैविध्य त्यांनी आपल्या गायकीत आणलेय. यात त्यांचा गुरु असलेल्या रहमानचा वाटा काय असेल हे मी निराळे सांगायची आवश्यकता नाही! आता तर रहमानने के. एम. म्युझिक कॉन्झरवेटरीद्वारे असे हिरे अधिक शिस्तबद्ध पद्धतीने घडविणारे विद्यालयच सुरु केले आहे. याच विद्यालयात शिकलेला फणी कल्याण हा संगीतकार सध्या तमिळ चित्रपटसृष्टीत नाव कमावतो आहे. रहमानचा भाचा जी. व्ही. प्रकाशकुमार तिकडे तर प्रसिद्ध आहेच, शिवाय ग्यांग्स ऑफ वासेपूर (२०१२) आणि जोकर (२०१२) द्वारे तो इकडेही हळूहळू प्रसिद्ध होतोय. असो, विस्तारभयास्तव एवढीच उदाहरणे पुरे!
यावेळी हाच ए. आर. रहमान रॉकस्टार (२०११) नंतर तब्बल वर्षभराने संगीतप्रेमींसाठी मेजवानी घेऊन आलाय ‘जब तक है जान’च्या रूपाने. एकीकडे यश चोप्रांचा शेवटचा चित्रपट असे वलय लाभलेले तर दुसरीकडे दिल से (१९९८) पासून ते रावण (२०१०) पर्यंत एकाहून एक सरस गीते देण्याची परंपरा असलेली रहमान-गुलजार ही जोडी! वर चर्चा केल्याप्रमाणे, इतका भव्य प्रकल्प असूनही बहुतांशी गीते नवोदितांनी गायली आहेत तर उरलेली गीते नवदिग्गजांनी! आता ही गीते खरोखरीच जमून आली आहेत किंवा काय हे पाहूया याच लेखाच्या पुढील भागात!– © विक्रम श्रीराम एडके
(edkevikram@gmail.com)
-
भाषाभिमान – एक स्फुट चिंतन.
लॉर्ड मेकोले आपल्या २ फेब्रु. १८३५ रोजी ब्रिटीश संसदेत केलेल्या भाषणात म्हणतो,
“I have traveled across the length and breadth of India and I have not seen one person who is a beggar, who is a thief. Such wealth I have seen in this country, such high moral values, people of such caliber, that I do not think we would ever conquer this country, unless we break the very backbone of this nation, which is her spiritual and cultural heritage, and, therefore, I propose that we replace her old and ancient education system, her culture, for if the Indians think that all that is foreign and English is good and greater than their own, they will lose their self-esteem, their native culture and they will become what we want them, a truly dominated nation“.
दुर्दैवाने मेकोले यशस्वी झालाय असं नाही वाटत का आपल्याला? भाषेपुरताच विचार करू. आज आपण इंग्रजीत बोलणेच भूषण मानू लागलो आहोत. माझ्या माहितीत काही लोक असेही आहेत जे प्रसंगी उपाशी राहतात पण भरमसाठ शुल्क भरून मुलाला इंग्रजी शाळेतच टाकतात! का तर म्हणे, इंग्रजी ही जगाची भाषा आहे, इंग्रजी येत नसेल तर आजच्या जगात वावरणे अशक्य आहे, वगैरे.. खरंच तसं आहे का हो?
चीनमध्ये इंग्रजीला अधिकृत भाषा म्हणून मान्यता नाही. जपानमध्ये कुणी इंग्रजीत बोलत नाही. जर्मनी, फ्रान्समध्ये इंग्रजीत बोललात तर लोक तुमच्याकडे तुच्छतेने पाहतात. रशियात सर्व कारभार रशियन भाषेतच चालतो. इंग्लंडसारखे काही अपवाद वगळले तर सबंध युरोपात कोणताही देश इंग्रजी-भाषिक नाही. उपरोक्त सर्व देशांत शिक्षण, प्रशासन आणि व्यापार हे तिन्ही त्यांच्याच भाषेत चालतात. हे सर्व देश तथाकथित “प्रगत देश” या व्याख्येत बसतात. मग कश्याच्या आधारावर आम्ही इंग्रजीला “जगाची भाषा” म्हणतो? बरं, मी इंग्रजी अजिबातच शिकू नये असे म्हणतोय का? नाही. इंग्रजी शिकावी, अवश्य शिकावी पण कोणतीही इतर परकीय भाषा कामापुरती शिकतो तशी. याउप्पर तिचा अतिवापर टाळावा.
एक उदाहरण सांगतो. विख्यात विद्वान श्री. रामदास कळसकर कामानिमित्त फ्रान्समध्ये जात, राहत असत. तिथे गेले कि नेहमीच एका फ्रेंच कुटुंबाकडे उतरत. काही वर्षांचा हा परिचय दाट स्नेहात बदलला होता. एकदा कळसकर तेथे काही काळासाठी वास्तव्यास असताना त्यांना भारतातून काही पत्रे आली. कळसकर बाहेर गेले होते म्हणून घरमालकिणीच्या मुलीने ती पत्रे स्वत:कडे ठेवली आणि ते आल्यावर त्यांना ती दिली. देताना तिने विचारले की, ‘मी पत्रे फोडली नाहीत पण पाकीटावरचा मजकूर वाचला. तो इंग्रजीत आहे. असे का?’ कळसकर तिला म्हणाले की, ‘आमच्या देशात बर्याचदा पत्रव्यवहारासाठी वगैरे इंग्रजीचा वापर होतो.’ ही गोष्ट त्या मुलीने आपल्या आईला सांगितली. जेवणाच्या वेळी त्या बाई कळसकरांना म्हणाल्या, ‘तुम्ही आमच्या घरातून कृपया दुसरीकडे राहायला जा. ज्या देशातील लोक स्वभाषेचा वापर करीत नाहीत त्या लोकांना आमच्याकडे रानटी समजतात. आणि अश्या व्यक्तीला मी आमच्या घरात ठेवू इच्छित नाही.’ गोष्ट थोडीशी तिखट वाटेल, पण अंजन झणझणीतच असायला हवे!
याउलट पहा. स्वातंत्र्य मिळाल्यावर इस्रायेलने आपल्या हिब्रू भाषेच्या संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. “शुद्ध हिब्रूत बोला आणि बक्षीस मिळवा” अश्या धर्तीच्या स्पर्धाही घेतल्या गेल्या आणि मृतप्राय झालेल्या हिब्रूचे पुनरुज्जीवन झाले. ही त्यांची निष्ठा!
कुणाला काही शिकवावे इतका काही मी मोठा नाही, पण माझ्यासारख्या अतिसामान्य माणसालाही एवढं नक्की कळतं की आपल्या भाषेची काळजी आपणच घ्यायला हवी. इंग्रजीतच एक म्हण आहे – Alphabet follows the religion. दुर्दैवाने ही म्हण खरी ठरू पाहतेय. हे व्हायला नको. आपला श्रेष्ठ वारसा आपण आपल्याच कर्मांनी गमवायला नको. किमान माझ्याशी सहमत होणार्यांनी तरी आपल्या मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण द्यावे. इंग्रजीचा दुराग्रह हा आपल्या मानसिक पारतंत्र्याच्या पाउलखुणा आहेत, त्या पुसायची जबाबदारी आपलीच आणि त्यासाठी स्वभाषाभिमानाची वाट बांधायची जबाबदारीदेखील आपलीच!– विक्रम श्रीराम एडके.
(edkevikram@gmail.com) -
" जब तक हैं जान "
” जब तक हैं जान “बरखा की छींटें तेरे रुखसारोंपर,
जैसे ओस आ थमी हो गुलजारोंपर..
देखके धडकने कुछ यूँ तेज हुई हैं,
के सुन नहीं पा रहा तेरे लब्जोंके गुलफामोंको..
मानो जैसे सुर्ख होठोंसे खामोशी ही खामोशी छलक रही हो..!
पूछा तुमने, चुपचाप हो क्यूँ..
कैसे समझाऊ मैं तुम्हे, बस इतना समझ लो..
आगोशमें भरके सुनना चाहता हूँ मैं ये मस्तानी खामोशी तेरी..जब तक हैं जान, जब तक हैं जान..!!
-
शांती नव्हे, "सद्गती"
कुणीही महत्वाची व्यक्ती गेली की मी फेसबूकवर पोस्ट्स वाचतो किंवा मला भ्रमणध्वनीवर संदेश येतात, “त्यांच्या आत्म्याला शांती लाभो” अथवा “Rest In Peace”. वास्तविक ही इंग्रजांनी रूढ केलेली पद्धत, आपली नव्हे. पण आपल्यातले बहुतांशी लोक कळत-नकळत हीच पद्धत पुढे चालवतायत. यालाच साध्या भाषेत मानसिक-पारतंत्र्य म्हणतात.
ख्रिशचन धर्मात अशी समजूत प्रचलित आहे की, व्यक्तीचा आत्मा त्याच्यासह कबरीत अंतिम निवाड्याचादिवस येईपर्यंत पडून राहणार आहे. मग इतकी हजारो वर्षे पडून राहण्याचे त्या आत्म्याच्या नशिबात आहेच तर ते किमान शांततेने होवो, म्हणून म्हणतात, “शांती लाभो”. याउलट भारतीय संस्कृतीत मृत्यूला एक मंगल-सोहळा मानतात. आपण ज्याप्रमाणे जुने कपडे टाकून देत नवीन कपडे घालतो, त्याप्रमाणेच आत्माही जुने शरीर टाकून मोक्षप्राप्ती होईपर्यंत नवनवीन शरीरे परिधान करत असतो. आपल्या संस्कृतीत मृत्यूला स्वल्पविरामच नव्हे, तर एका प्रवासाची, अनंताच्या यात्रेची सुरूवात मानतात. या अश्या प्रवासासाठी त्या आत्म्याला साहजिकच गतीची आवश्यकता असणार. म्हणूनच आपली संस्कृती जाणणारे म्हणतात, “त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो” किंवा “May His/Her Soul Attain Sadgati”.
आता काही तर्कट मंडळी प्रश्न करतील की, भारतीय संस्कृतीत खरी कश्यावरून? त्याच्यासाठी काही मुद्दे –
१) मृत्यूनंतर आत्म्याला शरीराबाहेर ढकलण्याचे काम अपान वायू करतो. वैज्ञानिकदृष्ट्या एक गोष्ट नक्की की, मृत्युसमयी शरीरातून “काहीतरी बाहेर जाते”. आता बाहेर जाते म्हटलं की गतीशी संबंध आलाच.
२) पाश्चात्यांकडून आपल्या संस्कृतीतली एखादी गोष्ट मान्य झाली तर आणि तरच ती मान्य करणारे काही महाभाग असतात. अश्यांनी कृपया विविध पाश्चात्त्य Theosophists ची या विषयावर मते वाचावीत आणि एक्टोप्लाझ्म वगैरे त्यांच्याच भाषेत समजून घ्यावे, कारण त्यांना आत्मा, गती वगैरे शब्द डाऊन-मार्केट वाटण्याची शक्यता आहे.
३) पाश्चात्य शांतीची संकल्पना बरोबर की आपली गतीची हे वैज्ञानिकदृष्ट्या अजूनतरी १००% सिद्ध झालं नाही. मग जर का दोन्हीही शंकास्पदच असतील तर त्यांची संकल्पना का वापरावी? जरासा स्वाभिमान वापरत खरं काय ते कळेपर्यंत आपलीच संकल्पना का वापरू नये?
इतर सूज्ञांनाही माझी नम्र विनंती आहे की, किमान स्वाभिमान आणि आपल्या संस्कृतीवरील विश्वास या दोन कारणांनी तरी आपण व्यक्तीस “सद्गती लाभो” असे म्हणावे. श्राद्ध या संकल्पनेमागेही मृतात्म्यास सद्गती देण्याचाच विचार असतो. -
श्रीगणेश विज्ञान
खूप दिवसांपासून या विषयावर लिहायचे मनात होते. आजचा मुहूर्त अगदी योग्य आहे. श्रीगणेश-जन्माची कथा आपणा सर्वांना माहितीच आहे.
तरीही संदर्भासाठी थोडक्यात देतो.
” पार्वतीने आपल्या शरीरावरील मळापासून एक मूर्ती तयार केली. त्यात प्राण फुंकून त्याला स्वत:चा मुलगाच मानले. पुढे या मुलाचे शिर श्रीशंकराच्या हातून उडवले जाते. पार्वतीचा विलाप पाहून शिवशंकर एखाद्या दुसर्या बालकाचे शिर आणण्याची आज्ञा …देतात. शिवगण चुकून एका हत्तीच्या पिल्लाचे शिर घेऊन येतात. मानवी शिर शोधण्याइतका वेळ उरला नसल्याने अखेरीस तेच शिर लावले जाते, आणि अश्याप्रकारे गणेशाचा जन्म होतो.”आता या कथेत खालील गोष्टी महत्वाच्या आहेत.१) देवी पार्वती आपल्या शरीरावरील मळापासून एक मूर्ती तयार करतात. ही मूर्ती सजीव होते.
२) कोणतेच दुसरे शिर न मिळाल्याने शिवगण एका हत्तीच्या पिल्लाचे शिर आणतात. अखेरीस तेच शिर लावले जाते.आता या कथेकडे व्यवस्थित पाहिल्यास कळते की ही कथा म्हणजे “क्लोनिंग” आणि “अवयावारोपण” करण्याचा जगातील पहिला प्रयोग असू शकतो. कसे ते पहा. पार्वती आपल्या शरीरावरील मळापासून एक मूर्ती तयार करते,
जी सजीव होते. जीवशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास, आपण जेव्हा एक साधी चुटकी वाजवतो, तेव्हाही सहस्रावधी पेशी शरीरापासून विलग होतात. पार्वतीने जाणून-बुजून अंगावरील मळ खरवडला होता. तिला जिवंत
उति (tissues) मिळवावयाच्या असाव्यात ही शक्यता नाकारता येत नाही. तात्विक दृष्ट्या हे सहज-शक्य आहे. तसेच शंकराने गणेशाचे शिर उडवल्यावर घाईने दुसरे शिर हवे असते, कारण त्या बालकाचा प्राण गेला होता पण मध्ये फार काळ गेला नसल्याने “वैद्यकीय मृत्यू (Clinical Death)” झाला नसावा. शिवगणांनी वेंधळेपणा केल्यावर पुन्हा मानवी शिर शोधण्यात आणखी कालापव्यय झाला असता. म्हणून हत्तीचेच शिर बसवले गेले. हा तत्कालीन अवयावारोपणाचा प्रकार असण्यात अशक्य काय आहे? आजही विज्ञान मानवी अवयवांचे रोपण करूशकते. अजून थोडी प्रगती झाल्यावर प्राण्यांच्या अवयवांचे रोपण होऊ शकेलच ना? म्हणजे ही देखील गोष्ट तात्विक-दृष्ट्या अशक्य नाही. आता हे सगळे वाचल्यावर काही लोक एक ठेवणीतला प्रश्न विचारतील, “एवढी प्रगती इतक्या प्राचीन काळी झाली असणे कसे शक्य आहे?” त्यांना मी विचारतो की, का अशक्य आहे? केवळ काळ फार प्राचीन आहे, हे काही कारण नाही होऊ शकत. या प्रश्नकर्त्या मंडळींचे खरे दुखणे काय असते माहितीय का? ते आहे “न्यूनगंड”. हो, न्यूनगंड. एखादी गोष्ट हिंदू म्हणजेच भारतीय म्हटली की ती वाईटच असली पाहिजे, हा तो न्यूनगंड होय. हीच गोष्ट जर कुणा युरोपीय अथवा अमेरिकन संशोधकाने शोधली असती तर मात्र आम्ही ती मानानार्यांत अग्रभागी असलो असतो! कारण “साहेबं वाक्यं प्रमाणं!” आपण गोऱ्या कातडीच्या मानसिक गुलामीतून बाहेर यायला आजही तयार नाही हेच खरे! बरे, हिंदू संस्कृती आणि धर्म हा जगात सर्वाधिक विज्ञान-निष्ठ असल्याचे हिंदू सोडून जगातील सगळ्याच संशोधकांचे मत आहे. पण आमचा न्यूनगंड आणि आपसातील भांडण मात्र आपल्याला हे सत्य स्वीकारण्यापासून रोखतेय! हिंदूंच्या विज्ञान-निष्ठेचे आजवर शेकडो पुरावे सापडले आहेत, पण ज्यांनी झोपेचे सोंग घेतलेय त्यांच्या नजरेला ही गोष्ट कशी पडणार? त्यांना मुळात आपले वेद-पुराणे हेच खोटे वाटतात. चला, क्षणभर वादासाठी तेही गृहीत धरू. आता पुन्हा वरील कथा पहा. याही परिस्थितीत वरील कथा पाहिल्यास ती वैद्यकीय-दृष्ट्या १००% योग्य असल्याचेच आढळेल! मग निदान व्यासांनी “विज्ञान-कथा”
लिहिली एवढे तरी मान्य कराल? आणि कुठेतरी या गोष्टी खरोखर असल्याशिवाय इतकी “सुयोग्य” विज्ञान-कथा तरी कशी सुचेल? या कथेपेक्षाही कितीतरी प्राचीन काळात “ऋभू” नावाच्या ३ बंधूंनी विविध शस्त्रक्रिया केल्याचे पुरावे ऋग्वेदात आहेत. “चरक” हा “सर्जन” शस्त्रक्रियेपूर्वी आपली हत्यारे उकळून घेत असल्याचे त्यानेच
लिहून ठेवलेय. याचा अर्थ त्याला इतक्या प्राचीन काळातही सूक्ष्मजीवांचे ज्ञान होते असाच होतो ना? विमान बनवण्याची प्राचीन भारतीय विधी मीच पूर्वी प्रसिद्ध केली होती. राजा भोज याच्या “समरांगण सूत्रधार” नामक ग्रंथात तर “यंत्रमानव” बनविण्याचीही विधी दिलीय. मग इतके सगळे विज्ञान असणार्या संस्कृतीत मी म्हणतो त्याच प्रमाणे गणेश- जन्म झाला नसेल कशावरून?पहा, विचार करा. “सूज्ञांना” पटेल.“गणपती बाप्पा मोरया”सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!आपलाच,
विक्रम श्रीराम एडके.
(संपर्क : edkevikram@gmail.com) -
"चांगले" आणि "वाईट"च्या पलीकडला – रॉकस्टार
कोणताही कलाकार घ्या. किंवा आपापल्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ ठरलेली कुणीही व्यक्ती घ्या. ते जर आत्ता आहेत तसे नसते तर कसे असले असते? ए. आर. रहमान घ्या. त्याच्या संगीताला जर अध्यात्माची बैठक नसती तर? तर तो कसा असला असता? कसा सोडा. “काय” असला असता? सहस्रो नद्यांच्या जंजाळात समुद्र “एक”च असतो… पण मग त्याने “किनारा” घेऊनच जन्माला यावं ना? समुद्राला किनारच नसला तर कसे चालेल?
“रॉकस्टार” पाहून प्रथमदर्शनी विचित्र वाटणारे असे शेकडो प्रश्न मनात उभे राहिलेयत. ही रॉकस्टारची समीक्षा नव्हे. रसग्रहण वगैरेही नव्हे. हा आहे एक प्रयत्न. रॉकस्टार पाहून मनात कल्लोळणार्या वादळाला शब्दांत पकडण्याचा एक निष्फळ प्रयत्न. प्रत्येकाने तो आपापल्या नजरेने पाहावा.
“पता हैं, यहाँ से बहोत दूर… “गलत” और “सही” के पार एक मैदान हैं..! मैं वहाँ मिलूँगा तुझे..!” या “रुमी”च्या ओळींनी चित्रपट सुरु होतो. आणि शेवटपर्यंत याच भावनेच्या लाटांवर हेलकावे घेत राहतो. कधी त्या लाटा आपल्याला हलकेच भिजवतात तर कधी जोरदार शिपकारा मारतात. फाडकन कुणीतरी कानफटात वाजवल्यासारख्या. पण कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही आणि तुमची नाव या वादळाच्या पार काही जाऊ शकत नाही. जाउच शकत नाही.
“त्या”ला “ती” भेटत नाही आणि भेटूनही भेटत नाही, हाच “त्या”च्या संगीताचा पाया आहे. “पुढे काय” याचा “तो” विचार करीत नाही, किंबहुना “तो” त्या पातळीलाच पोहोचलेला नाही. “त्या”चा शेवट अटळ आहे. प्रतिभेला दुखा:ची किनार देण्यापेक्षा जर अध्यात्माचे आसन जॉर्डन देऊ शकला असता, तर निश्चितपणे उस्ताद जमील खान (शम्मी कपूर) बनू शकला असता; ही भावना पाहणार्याला सतत जाळीत राहाते. शम्मीच्या डोळ्यांतील दयेतून तर ती त्याची अगतिकता अधिकच अधोरेखित करते. जॉर्डनला जर हे कळलं असतं तर? तर, तर कदाचित त्याचं कुढणं, तुटणं, जरासं कमी होऊ शकलं असतं. “ती” केवळ निमित्तमात्र. “त्या”चं दु:ख मात्र सनातन आहे. “ती” नसती तर “त्या”ला दुसरं काहीतरी निमित्त मिळालं असतं, आणि त्याही स्थितीत Dichotomy Of Fame कायमच राहिली असती. म्हणून श्रेष्ठतेला गरज असते अध्यात्माची. त्याशिवाय श्रेष्ठतेला तिचं श्रेष्ठत्व नाही सांभाळता येत. म्हणूनच कदाचित “बीटल्स” भारतात आले होते. “स्टीव्ह जॉब्स” इकडे सन्याश्यासारखा भटकला होता. आणि म्हणूनच कदाचित “स्वामी विवेकानंद” जगभर खर्या अर्थाने “रॉकस्टार” ठरले. म्हणूनच रहमान ऑस्करलाही साधेपणाने सामोरा जाऊ शकतो आणि एकेकाळचा “सम्राट” मायकेल जाक्सन काळाच्या वस्त्रावरील एका क्षुद्र ठिपक्यासारखा क्षणात नाहीसा होतो.
“सौ दर्द बदन पे फैले हैं |
हर करम के कपडे मैले हैं ||”
हे कितीजारी खरं असलं तरी “नादान परीन्द्या”ला घरी यावंच लागतं. शेवटी डोळे मिटले तर भर सूर्यप्रकाशातही अंधारच अंधार आहे आणि डोळे उघडले तर पणतीच्या मिणमिणत्या उजेडातही सर्वत्र प्रकाशच प्रकाश आहे. तो “रंगरेज़” रंगवायला बसलेलाच आहे. फक्त आपली रंगवून घ्यायची तयारी मात्र हवी.
हा आहे माझ्या भावनेचा कल्लोळ. कितीही प्रयत्न केले तरी शब्दांत न मावणारा.
“जो भी मैं कहना चाहूँ |
बर्बाद करे अल्फाज़ मेरे ||”
नेहमीच्या धोपटमार्गाने जाऊन सांगायचं तर “रॉकस्टार” अवश्य पाहा. संवेदनशील असलात तर तुमच्याही मनात भावनेचा एखादा उठेल. कदाचित यापेक्षा वेगळा. पण निश्चित उठेल. रणबीरने त्याच्या वाटेला आलेल्या प्रत्येक दृश्यात सिद्ध केलेय की तो उद्याचा “सुपरस्टार” आहे. SSRK म्हणून आपण आज Super Star RajiniKanth ला ओळखतो. भविष्यातला SSRK निश्चितपणे रणबीर आहे. इम्तियाझने हा वेगळा विषय कमालीच्या प्रयोगशीलतेने मांडलाय. एकूणच चित्रपटक्षेत्रात त्याने मोलाची भर घातलीय. रहमान बद्दल काय लिहू? तो “देव” आहे एवढे पुरेसे नाही का? बाकी “नर्गिस” आणि “अदिती राव” यांनीही अतिशय उत्तम काम केलेय. कथानक आणि मांडणीच इतकी सशक्त आहे की, नायिका म्हणून कुणीही चालली असती.
रेटिंग विचाराल तर थोड्याफार चुका लक्षात घेऊन मी ५ पैकी ४ गुण देईन. पण खरं सांगू? रॉकस्टार म्हणजे रूमीच्या कवितेसारखा आहे. “चांगले” आणि “वाईट” यांच्या पलीकडचा. त्याचं त्या पातळीला जाऊनच आस्वाद घ्यावा. बाकी
“साड्डा हक़..!
ऐत्थे रख़..!!”
© विक्रम श्रीराम एडके.
(इतरत्र प्रसिद्ध करण्याआधी लेखकाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक.) -
३३ कोटी देवांचे कोडे
खूपशी हिंदुद्रोही मंडळी वाद घालताना एक प्रश्न हमखास विचारतात, कि “तुमच्या त्या फडतूस हिंदू धर्मात म्हणे ३३ कोटी देव आहेत, त्यांची नावे तरी माहिती आहेत का तुम्हाला?” आणि आमचे भोळे-भाबडे हिंदू बंधू या प्रश्नासमोर गडबडून जातात. मलाही व्याख्यानाच्या वगैरे निमित्ताने जेव्हा इतर मंडळी भेटतात, तेव्हा हा प्रश्न विचारणे ठरलेले असते. कधी खोडसाळपणे, तर कधी जिज्ञासेने! तेव्हा माझ्या फेसबुक मित्रांना देखील या प्रश्नाचे उत्तर माहिती असावे म्हणून सांगतो.
मुळात हिंदू धर्म हा जगातील एकमेव विज्ञान-निष्ठ धर्म आहे. यात एकही गोष्ट “उगीचच” या सदराखाली येत नाही. तरीही जर तसे वाटले, तर निश्चितच समजावे कि आपले ज्ञान कमी पडतेय.
आता नमनालाच घडाभर तेल न ओतता मूळ विषयाला हात घालतो.३३ कोटी या शब्दाचा जो सरळ-सरळ ३३ करोड असा अर्थ लावला जातो, तो चुकीचा आहे हे मी एक संस्कृतचा अभ्यासक म्हणून ठामपणे सांगतो. खर तर येथे कोटी या शब्दाचा अर्थ होतो Degree किंवा सोप्या भाषेत, “प्रकार”. कोटी ज्यावेळी आपण पैशासंदर्भात वापरतो तेथेही हाच अर्थ मुळात अभिप्रेत असतो हे खोलवर विचार केल्यास कळते. शिवाय आपण गणितात “बैजिक पदांच्या कोटी” हि संज्ञा वापरतो तेथेही हाच अर्थ अभिप्रेत असतो. आता प्रश्न असा येईल कि हे ३३ कोटी, म्हणजे ३३ प्रकारचे देव नेमके कोण? तर त्यांची नावे देतो.
धाता, मित्र, अर्यमा, शक्र, वरुण, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा आणि विष्णू हे १२ आदित्य. (संदर्भ: महाभारत, आदि. ६५/१५-१६)
धर, ध्रुव, सोम, अह:, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास हे ८ वसु. (संदर्भ: महाभारत, आदि. ६६/१८)
हर, बहुरूप, त्रयम्बक, अपराजित, वृषाकपि, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व आणि कपाली हे ११ रुद्र. (संदर्भ: हरिवंश, १/३/५१-५२)
आणि याखेरीज २ अश्विनीकुमार!
असे सारे मिळून ३३ प्रकारचे देव होतात. आता तुम्ही कुणाही प्राश्निकास हे उत्तर देऊ शकता, मी व्यवस्थित संदर्भही दिले आहेत.
© विक्रम श्रीराम एडके (edkevikram@gmail.com)
टीप: हा मजकूर माझ्या पूर्व-परवानगीशिवाय कुठेही वापरलात तरी चालेल.
या प्रश्नास आपले बहुतांशी बांधव उत्तर देऊ शकत नसण्याचे कारण म्हणजे हिंदू धर्माचा विशेषत: संस्कृत भाषेचा अभ्यास नसणे. तेव्हा मी येथे सर्वांना आवाहन करतो कि त्यांनी संस्कृतचा शक्य होईल तेवढा अभ्यास करावा. तीच हिंदू धर्माची किल्ली आहे. याखेरीज इतर प्रश्न आणि शंकांसाठी मला वर दिलेल्या विद्युत पत्त्यावर संपर्क करावा.

