Blog Archives

चर्चेसची होताहेत मंदिरे : चाहूल बदलत्या प्रवाहाची

मी माझ्या व्याख्यानांतून आणि लेखनातून एक गोष्ट कायम मांडत असतो की, हिंदूंनी जर दांभिक-धर्मनिरपेक्षता आणि सहिष्णुतेची सद्गुणविकृती सोडली नाही, तर लवकरच जगभरात सर्वत्र हिंदुच हिंदू दिसतील परंतू सनातनच्या उगमस्थानी भारतात मात्र औषधालाही हिंदू सापडणार नाहीत. एकीकडे भारतातील सामान्य हिंदू आधुनिकतेच्या खोट्या कल्पनांपायी आपल्या समृद्ध धर्म आणि संस्कृतीपासून दूर जात असताना उरलेले जग (त्यातही विशेषत्वाने पाश्चात्य देश!) हळूहळू का होईना परंतू हिंदू संस्कृती अंगिकारत आहे. एवढेच नव्हे तर तिथे हिंदू धर्माचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतोच आहे. हा मुद्दा मी पूर्वीदेखील फेसबुकवर आणि अन्यत्र मांडला आहे. त्यासाठी वेळोवेळी प्रसंगोपात उदाहरणेही दिली आहेत. मग तो श्रीमती लिसा मिलर या अमेरिकन विदुषीचा We Are Hindus …Read more »

श्रीगणेश विज्ञान

श्रीगणेश विज्ञान खूप दिवसांपासून या विषयावर लिहायचे मनात होते. आजचा मुहूर्त अगदी योग्य आहे. श्रीगणेश-जन्माची कथा आपणा सर्वांना माहितीच आहे. तरीही संदर्भासाठी थोडक्यात देतो. “पार्वतीने आपल्या शरीरावरील मळापासून एक मूर्ती तयार केली. त्यात प्राण फुंकून त्याला स्वत:चा मुलगाच मानले. पुढे या मुलाचे शिर श्रीशंकराच्या हातून उडवले जाते. पार्वतीचा विलाप पाहून शिवशंकर एखाद्या दुसर्या बालकाचे शिर आणण्याची आज्ञा …देतात. शिवगण चुकून एका हत्तीच्या पिल्लाचे शिर घेऊन येतात. मानवी शिर शोधण्याइतका वेळ उरला नसल्याने अखेरीस तेच शिर लावले जाते, आणि अश्याप्रकारे गणेशाचा जन्म होतो.” आता या कथेत खालील गोष्टी महत्वाच्या आहेत. १) देवी पार्वती आपल्या शरीरावरील मळापासून एक मूर्ती तयार करतात. ही …Read more »

ती कविता…

ती कविता, जी सुचलीच नाही, परि मन गुंतलेले त्या शब्दांवर… तिचा नि माझा लपंडाव, अन राज्य कायमच माझ्यावर ! ती प्रियेसम – प्रसन्नही, अप्रसन्नही… आणि मजकडे – केवळ अधीरे नवखेपण ! थोडी गाफिलता आणि तिचे निघोन जाणे, सहजच होते तिच्यासाठी फिरुनी परत न येणे… रसिकांची तिला काय कमी ? (सहस्र झुरत असतील तिच्यासाठी !) पण मजसाठी मात्र, एकच ती… ती कविता, जी सुचलीच नाही, परि मन गुंतलेले त्या शब्दांवर… अन आजही मी थांबलो आहे, ती निघून गेली त्या वळणावर… – © विक्रम

खरेच गणेशविसर्जनाने प्रदूषण होते का ?

खरेच गणेशविसर्जनाने प्रदूषण होते का ? गणेशोत्सव जवळ येऊ लागलाय त्याअर्थी आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन आणि त्याद्वारे होणार्या प्रदूषणाच्या नावाने शिमगा जोरजोरात सुरु होईल, हेही ओघाने आलेच. अर्थातच हिंदूंच्या प्रत्येक सणाला असा शिमगा होणे नित्याचेच असल्याने, सर्वांनाच या प्रकाराची सवय झाली आहे. हा आरडाओरडा करणारी मंडळी अन्यधर्मीयांच्या सणांच्या प्रसंगी विवेकवादी आणि पुरोगामी चिंतनात इतकी काही व्यस्त असतात की, त्यांना त्यातले प्रदूषण दिसतच नाही आणि दिसले तरी त्याबद्दल बोलावेसे वाटत नाही! असो. परंतू खरंच प्लॅस्टरच्या गणेशमूर्तींनी प्रदूषण होते का हो? केलाय कधी विचार? किंबहूना असे काही प्रदूषण होते हीच जर अंधश्रद्धेचे निर्मूलन करू म्हणणार्यांची अंधश्रद्धा असली तर? तसे असेल …Read more »

हुतात्मा राजगुरू – काही शल्ये, काही प्रश्न!

आज २४ ऑगस्ट. अर्थात हुतात्मा राजगुरू यांची जयंती. विषय केवळ आजच्या दिवसापुरते त्यांना प्रणाम करण्याचा नाहीये. विषय आहे यानिमित्ताने जरासं आत्मपरिक्षण करण्याचा. जरा स्वत:ला विचारण्याचा की, ज्या माणसाने तुमच्या-माझ्या सुखासाठी अतिशय कोवळ्या वयात आपल्या प्राणांची आहुती दिली, त्याची आज जयंती आहे हे आपल्या लक्षात तरी होतं का? जयंती सोडा राजगुरूंचे संपूर्ण नाव तरी आपण गुगलचा आधार घेतल्याशिवाय अथवा कुणाला विचारल्याशिवाय सांगू शकतो का? संपूर्ण नावही राहू द्या, राजगुरू नावाची व्यक्ती कोण होती आणि तिने काय कार्य केले होते, हे तरी आपण धडपणे सांगू शकतो का? सौ बात की एक बात – मूळात आपल्याला राजगुरूंना प्रणाम करण्याचा तरी हक्क आहे का? …Read more »

हुतात्म्यांचा गौरव

खरे तर आपण राजकुमार संतोषी आणि राकेश ओमप्रकाश मेहरांचे आभारच मानायला हवेत. कारण, आजच्या पिढीला भगतसिंह, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद “बिस्मिल”, अशफाकउल्ला खान इ. वीर हुतात्म्यांबद्दल जी काही थोडेफार माहिती आहे आणि या लोकांनी या देशाच्या बंधमोचनासाठी काहीतरी त्याग केला होता हे त्यांना कळले, ते याच दोन दिग्दर्शकांमुळे. हवं तर दुर्दैवी म्हणा पण ही वस्तुस्थिती आहे की, आमच्या देशाचे क्रांतिकारक त्यांच्यावर चित्रपट निघेपर्यंत आम्हाला धड माहितीही नसतात! बर्याच जणांना तर या वीरांची कथा चित्रपटात सांगितली तेवढीच फक्त माहिती आहे. त्यापलीकडे जाऊन या व्यक्तीमत्वांचा शोध घ्यायचा प्रयत्न यांपैकी किती जणांनी केला? वाईट वाटतं! चेतन भगतसारख्या सुमार लेखकाची सगळी पुस्तके वाचणारे …Read more »

वसंत पंचमी

हल्ली “व्हॅलेंटाईन डे”चे सर्वत्र फॅड सुरू आहे. मी या दिवसाचा विरोधक आहे आणि म्हणून याला फॅड म्हणतोय असा कृपया समज करून घेऊ नका. मी फॅड म्हणतोय कारण, त्रयस्थपणे विचार केल्यावर कळते की या दिवसाचा आणि प्रेमाचा तसा काही संबंध नाही. ही फक्त प्रेमाच्या नावाखाली फुले, ग्रिटींग्ज आदी वस्तू विकण्याची मार्केटींग स्ट्रॅटेजी आहे, बाकी काही नाही. आणि पाश्चात्यांहूनही अधिक पाश्चात्याळलेले आपल्याकडचे तरुण याला बरोब्बर बळी पडतात. प्रेमाच्या नावाखाली या दिवसाची भलावण करीत अगदी पाच रुपयांचा गुलाब वीस रुपयांना घेण्यापासून सर्व मूर्खपणा सुरू असतो! मागे नाही का त्या हॉलिवूडवाल्यांनी त्यांचे पिक्चर चालत नाहीत म्हटल्यावर “डिसेंबर २०१२”चा बागुलबुवा उभा करून, त्यावर पिक्चर काढून, …Read more »

जो जीता वोही सिकंदर ???

काल दूरचित्रवाणीवर एक प्रसिद्ध गीत पाहात होतो. बोल होते, “वो सिकंदर ही दोस्तो कहलाता हैं, हारी बाजीको जीतना जिसे आता हैं”! चित्रपटाचंही नाव साजेसंच होतं, “जो जीता वोही सिकंदर”. गेले दोन दिवस मी असत्याधारित, विकृत आणि राष्ट्राचा तेजोभंग करणार्या इतिहासाबद्दल लिहितोय. जे आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आलोय -” जो जीता वोही सिकंदर” असं खरंच होतं का? अलेक्झँडर हा अतिशय महत्वाकांक्षी होता, विश्वविजयासाठी निघाला होता हे खरे. परंतू कोणत्याही अर्थाने विश्वविजयी नव्हता. ग्रीस ते इराणपर्यंतचे प्रदेश त्याने सहज जिंकले. भारताच्या सीमेवरील गांधारजवळची (अफगाणिस्तान) छोटीछोटी गणराज्ये पाहून त्याला नक्कीच आनंदाच्या उकळ्या फुटल्या असणार! मी यापेक्षा अनेकपट मोठी साम्राज्ये सहज जिंकली, ही छोटी राज्ये तर …Read more »

मानवाधिकारछाप गोष्ट

एकदा काश्मीरातील एका जिहादी आतंकवाद्याने तीन जणांना पकडले – एक पुढारी, एक मानवाधिकारछाप (हा शब्द “कछुआछाप”च्या चालीवर वाचावा) पत्रकार बाई आणि एक भारतीय जवान! आतंकवादी म्हणाला, “तुम्ही तिघंही आता मरणार आहात. काही शेवटची इच्छा असेल तर बोला”. इच्छापूर्ती म्हटली की सर्वात पुढे पळण्याचा पुढार्यांचा स्वभावच असतो! आपले पुढारीबुवाही त्याला अपवाद नव्हते. पण इच्छा पूर्ण झाली की लगेच मरावे लागणार या कल्पनेने ते काहीच बोलले नाहीत. अतिरेक्याच्याच काय मनात आलं कुणास ठाऊक, त्याने पुढार्याकडे बोट दाखवले, “तू बोल”. पुढार्याने क्षणभर विचार केला. म्हणाला, “आयुष्यभर मला कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहायची, त्यांच्याकडून जयजयकार ऐकायची सवय. तुही माझ्या नावाने ‘की जय..!’ असे ओरड आणि हा जयघोष …Read more »

मेरा रंगदे बसंती चोला…

तिघा वीरांना फाशी होणार हे आता नक्की झालं होतं. तीन वीर – भगतसिंह, राजगुरु अन् सुखदेव – भारतमातेच्या उद्धारासाठी जन्माला आलेली त्रिमूर्तीच जणू! अवघ्या विशी-बाविशीतली कोवळी पोरं, परंतू आपलं आयुष्य आता संपणार याचं वैषम्य वाटण्यापेक्षा आपलं जीवन कृतार्थ झालं, याची धन्यताच त्यांच्या चेहर्‍यावर झळकत होती. जन्मठेप न होता फाशी झाली याचं दु:ख होत नाही का, असं कुणीतरी विचारताच राजगुरु सहजपणे म्हणाले, “अहो, जन्मठेपेवर गेलो असतो तर मरायला वेळ लागला असता. त्यापेक्षा फाशीने चटकन् मरु म्हणजे स्वातंत्र्यलक्ष्मीच्या सेवेसाठी पटकन् पुन्हा जन्मासही येता येईल, काय!” आणि मिष्किल हसत टाळीसाठी हात पुढे केला! हे धैर्य!! इकडे सबंध देश या तिघांसाठी आक्रंदत होता. आझादही अस्वस्थ …Read more »