ती कविता…

  • ti kavita

ती कविता,
जी सुचलीच नाही, परि मन गुंतलेले त्या शब्दांवर…
तिचा नि माझा लपंडाव, अन राज्य कायमच माझ्यावर !
ती प्रियेसम – प्रसन्नही, अप्रसन्नही…
आणि मजकडे – केवळ अधीरे नवखेपण !
थोडी गाफिलता आणि तिचे निघोन जाणे,
सहजच होते तिच्यासाठी फिरुनी परत न येणे…
रसिकांची तिला काय कमी ?
(सहस्र झुरत असतील तिच्यासाठी !)
पण मजसाठी मात्र, एकच ती…
ती कविता, जी सुचलीच नाही,
परि मन गुंतलेले त्या शब्दांवर…
अन आजही मी थांबलो आहे, ती निघून गेली त्या वळणावर…

– © विक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *