Category Archives: Cinema

अखंडा – यतो धर्मस्ततो जय:

कर्नाटकच्या सीमेवर सैनिकांची एक तुकडी मोहिमेवर असते. त्यांचं लक्ष्य असतं नक्षलवादी गजेंद्र साहू. कर्मधर्मसंयोगाने साहू पळून जाण्यात यशस्वी होतो व एका हिंदू साधूच्या आश्रमात शरण घेतो. आश्रम, तेथील महंत आणि त्यांचा समाजावरील प्रभाव यांच्या प्रचंड ताकदीची जाणीव साहूला होते व ती ताकद हस्तगत करण्यासाठी तो महंतांचा खून करतो आणि त्यांची जागा घेतो. त्याच आसपास एका कुटूंबात प्रसुती होते. जुळी मुलं. पण एक जिवंत आणि दुसरा मृत. गावात वास्तव्यास असलेला अघोरी अनपेक्षितरित्या त्या घरी येतो आणि मृत बालकाची मागणी करतो. मुलाची आई अद्याप मूर्च्छेत असते. वडील तिच्या नकळत ते बाळ अघोरीला देऊन टाकतात. हस्ते परहस्ते त्या मृत बालकाचा प्रवास होऊ लागतो. …Read more »

पुष्पा – आहे मनोहर तरी..!

रायलसीमा भागात अतिदुर्मिळ अशा रक्तचंदनाचे वृक्ष उगवतात. लाल सोने म्हटले जाते त्या झाडांना. अत्यंत मौल्यवान अशा या वृक्षाच्या लाकडांची अर्थातच तस्करी झाली नसती, तरच नवल. अशाच एका ठेक्यावर काम करणारा हमाल आहे पुष्पराज (अल्लु अर्जुन). तिरकं डोकं चालवणारा निडर पुष्पराज या चंदनाच्या तस्करीतून यशाच्या आणि सामर्थ्याच्या शिड्या कशा चढतो, याची कहाणी म्हणजे ‘पुष्पा – द राईज, पार्ट १’. हा चित्रपट निर्माण कसा झाला असेल? एके दिवशी दिग्दर्शक सुकुमार आणि अल्लु अर्जुन या दोघांपैकी एक कुणीतरी दुसऱ्याकडे गेला असेल व म्हणाला असेल, ‘अरे तो केजीएफ काय तुफान चालला यार! यश दाढी वाढवून कसला कूल दिसलाय! आपण पण असा एक पिक्चर केला …Read more »

सर्वार्थाने फसलेला – अतरंगी रे

‘अतरंगी रे’ सुरू झाल्यापासून पहिल्या पाच-सात मिनिटांतच तुम्हाला तो पॉईण्टलेस वाटू लागतो. निष्फळतेची जागा हळूहळू घृणा घेऊ लागते. तुम्ही तो कित्येकदा पॉजसुद्धा करता, पण स्टॉप करून ॲपमधून बाहेर काही तुम्ही पडत नाही. तुम्ही तो पाहातच राहाता, अगदी शेवटपर्यंत! बॉलिवूडच्या तुलनेत अत्यंत नव्या पार्श्वभूमीवर बेतलेला हा चित्रपट इतक्या पातळ्यांवर फसलाय आणि इतक्या निष्काळजीपणाने साकारलाय की, कुठून सुरूवात करावी आणि काय सांगू नये, तेच समजत नाही. आपल्याकडे चांगली कथा आहे म्हटल्यावर ती कशी जरी मांडली तरी चालून जाईल, या अतिआत्मविश्वासाचं फळ आहे हा चित्रपट. त्यातूनच मग कथेच्या सादरीकरणात अनेक खिंडारं आणि त्याहून जास्त प्रश्न उभे राहातात. ‘तनू वेड्स मनू’चे दोन्हीही भाग आणि …Read more »

प्रपोगण्डाच्या वजनाने कोसळलेला पोकळ डोलारा : द मॅट्रिक्स रिझरेक्शन्स

‘रिझरेक्शन्स’च्या साधारण विसाव्या मिनिटाला स्मिथ (जोनाथन ग्रॉफ) थॉमस अँडरसनला (कियानू रीव्ह्ज़) सांगतो की, ‘आपली पॅरेंट कंपनी वॉर्नर ब्रदर्सने मूळ त्रयीचा पुढचा भाग बनवायचं ठरवलंय. आपण तयार झालो तर आपल्यासोबत नाही तर आपल्या शिवाय’! तो प्रत्यक्षातील वास्तव आणि सिनेमाच्या काल्पनिक अशा दोन्ही जगांमधील सत्यच त्या प्रसंगात सांगत असतो. सबंध चित्रपट असाच वास्तव आणि कल्पनेची सरमिसळ करत बनलाय. पण वाईट गोष्ट अशी की, त्या विसाव्या मिनिटापर्यंत सांगावं, लक्षात ठेवावं आणि आठवावं असं काहीच न घडल्यामुळे आपल्याला हा प्रसंग किती जरी स्वसंदर्भ असला तरीही अनाठायीच वाटत राहातो, अगदी पुढे वाढून ठेवलेल्या सबंध चित्रपटासारखाच. गंमत म्हणजे नियोदेखील पुढचा भाग बनवणं ही कल्पना फारशी चांगली …Read more »

परिपूर्ण दर्जाचे लेणे – लाईन ऑफ ड्युटी

आपल्याकडे म्हण आहे की, एक सडका आंबा अवघी पेटी नासवून टाकतो. पण सध्याचं वास्तव त्याच्या अगदी उलट झालंय. सगळ्या पेट्याच नासक्या आंब्यांनी भरलेल्या आहेत. त्यात एखादाच आंबा चांगला असेल आणि दैवयोगाने त्याच्यावरच जर सडके आंबे वेचून फेकायची जबाबदारी आली तर? वरवर पाहाता हे काम अतिशय धाडसी, साहसी, शूर वगैरे गुणांनी संपन्न अशा रुबाबदार नायकाचं अथवा नायकांचं वाटतं. पण लक्षात घ्या, आपण बोलतोय ते वास्तवाबद्दल. वास्तवात जर सडक्या आंब्यांचीच बहुसंख्या असेल तर त्या चांगल्या आंब्याला त्यांना वेचून काढणे तर दूरच, पण निव्वळ जगणेदेखील अवघड होऊन बसणार हे सांगायला काही कुणा ज्योतिष्याची आवश्यकता नाही. पाण्यात राहून मगरीशी वैर करणाऱ्या माश्याला प्रत्यक्षात केवळ …Read more »

सोल्गॅझम देणारे जॅझ – बॉश

‘बॉश’च्या अखेरच्या पर्वात एक पात्र बॉशचा उल्लेख ‘Bosch is a living legend’ असा करते. हे वाक्य, हे लहानसंच वाक्य एखाद्या सुईसारखे माझ्या कानावाटे मेंदूत शिरले आणि सात पर्वांच्या, सात चित्रकोड्यांच्या, किमान सात हजार आठवणींचे धागे त्याने उसवायला सुरुवात केली. खरं तर नायकाचं नायकत्व अधोरेखित करणारं, त्याची स्तुती करणारं हे वाक्य. पण मला ते तसे वाटलं नाही. मला वाटला तो क्रूर विनोद, आपल्या आसपासच्या जगातील वाढतच चाललेला विरोधाभास अधोरेखित करणारा. बॉश या मालिकेत जे जे काही म्हणून करतो, ते ते सारं त्याचं एक पोलिस अधिकारी म्हणून कर्तव्यच असतं. पण साला, आपण अशा जगात राहातो ना की, हिरो होण्यासाठी हिरोगिरी करण्याची आजकाल …Read more »

लोणच्यासारखी मुरत जाणारी – चक

‘बाय मोअर’ सुपरमार्केटच्या ‘नर्ड हर्ड’ या अत्यंत रटाळ आणि गचाळ अशा संगणक दुरुस्ती विभागात काम करणाऱ्या चार्ल्स तथा चक बार्टोव्स्कीचं (झकॅरी लेव्ही) आयुष्य एका रात्रीत पार बदलून जातं. त्याचं कारण म्हणजे चकचा एकेकाळचा स्टॅनफर्डसारख्या प्रथितयश विद्यापीठातील परममित्र आणि कालौघात परमशत्रू बनलेला ब्राईस लार्किन (मॅथ्यू बोमर). ब्राईसच्या कारस्थानामुळे चकला विद्यापीठाने काढून टाकलं होतं. त्या घटनेलाही आता चार वर्षं उलटून गेली. किंबहूना त्या घटनेमुळेच चकसारखा जग बदलू शकणारा अत्यंत हुशार विद्यार्थी आज ‘बाय मोअर’सारख्या फडतूस ठिकाणी काम करतोय. ब्राईस मात्र अजूनही त्याचा पिच्छा सोडत नाहीये. जगाच्या दृष्टीने साधा अकाऊंटंट असलेला लार्किन प्रत्यक्षात सीआयएचा अत्यंत खतरनाक गुप्तहेर आहे. पण तो आपल्याच देशावर उलटतो …Read more »

आर्मी ऑफ द डेड

एरिया ५१! अमेरिकेतील अतिगोपनीय, अतिसुरक्षित ठिकाण. ज्या ठिकाणाबद्दल अर्बन-लिजण्ड्स प्रसवली जातात, अशा या एरिया ५१ मधून सैन्याचा एक कॉन्व्हॉय काहीतरी अत्यंत महत्त्वाचं पार्सल घेऊन चाललाय. या कॉन्व्हॉयसोबत एक अपघात घडतो आणि ते पार्सल रस्त्यावरच उघडं पडतं! त्या पार्सलमधून निघतो एक झॉम्बी. पण नेहमीचा, साधा, सज्जन, बिनडोकपणे हळूवार चालणारा झॉम्बी नाही बरं, तो असतो एक चपळ, हुशार आणि म्हणूनच अनेकपटींनी खतरनाक सुपरझॉम्बी! तो अर्थातच सगळ्या सैनिकांना चावतो, मारून टाकतो. आणि जवळच असलेल्या एका शहरात निसटून जातो. ते शहर म्हणजे जुगाऱ्यांचा स्वर्ग, लास व्हेगास! जुगाऱ्यांच्या जीवाशीच जुगार होतो आणि बघता बघता सारे शहर संक्रमित होते. अमेरिकन शासन तत्परतेने सबंध शहर क्वारण्टाईन करते. …Read more »

सजीवीकरणातून साकारलेल्या वैश्विक कथा : लव्ह डेथ + रोबॉट्स

भारतीय (विशेषतः उत्तरेकडील) चित्रपटसृष्टी आणि अभारतीय चित्रपटसृष्टी यांच्यात एक मूलभूत अंतर आहे. भारतीय चित्रपटसृष्टी या सजीवीकरणाला (ऍनिमेशन) लहान मुलांनी पाहायची गोष्ट मानतात तर अभारतीय चित्रपटसृष्टी मात्र जे जे काही प्रत्यक्ष चित्रणातून साध्य होऊ शकत नाही अथवा ज्याची साथ लाभल्यास प्रत्यक्ष चित्रण अनेक पटींनी अधिक खुलते अशी गोष्ट म्हणजे सजीवीकरण, असे मानतात. पहिल्या वाक्यात मुद्दामहूनच दोन गोष्टी लिहिल्या आहेत. एक म्हणजे अभारतीय चित्रपटसृष्टी. कारण, केवळ पाश्चात्यच नाही तर अनेकानेक पौर्वात्य चित्रपटसृष्टीदेखील सजीवीकरणात अग्रेसर आहेत त्या केवळ सजीवीकरण म्हणजे लहान मुलांच्या गोष्टी असा डबक्यातला विचार न करण्यामुळेच. याचे अतिशय प्रसिद्ध उदाहरण म्हणजे आपणां सर्वांनाच ठाऊक असलेला युगो साकोंचा ‘रामायण – द लिजण्ड …Read more »

स्मार्ट, हिंसक ‘असा मी असामी’ – नोबडी

हच मॅन्सेल (बॉब ओडेनकर्क) हा एक सर्वसाधारण, मध्यमवयीन आणि मध्यमवर्गीय मनुष्य आहे. पुलंनी लिहून ठेवलेले बहुतांशी त्रासदायक ग्रहयोग नशिबात वाढून ठेवलेल्या कुणाही सर्वसामान्य माणसासारखा माणूस म्हणजे हच मॅन्सेल. त्या धोंडो भिकाजी कडमडेकर-जोश्याच्या आयुष्यासारखं आयुष्य त्याचं. त्याला बायको आहे, दोन गोंडस मुलं आहेत. बायको करिअरमध्ये प्रचंड यशस्वी आणि हा मात्र सासऱ्याच्या वर्कशॉपमध्ये साधं काहीतरी काम करतो. आसपासचे लोकच नव्हेत तर सख्खं पोरगंसुद्धा येता-जाता, कळत-नकळतपणे हचच्या कर्तृत्वशून्यतेवरून त्याला टोमणे मारत असतो. या अशा ‘असामी’ हचच्या घरी एके दिवशी दोन चोर शिरतात. हचचं पोरगं मोठ्या धिटाईने एका चोरावर झडप घालतं. चोरासोबत असलेली चोरणी मुलावर बंदूक रोखते. हच तिच्या पाठिमागून येतो. हचच्या हातात गोल्फस्टिक …Read more »