Category Archives: Cinema

वास्तवाशी नाळ घट्ट जोडलेली परीकथा – स्टारडस्ट

“मी तुझ्या प्रेमासाठी वाट्टेल ते करेन. मी आकाशात टांगलेला चंद्र उतरवून तुझ्या पायांशी ठेवेन. तारे तोडून तुझ्या भालावर त्यांची चमकदार नक्षी काढेन. रात्रीच्या अंधाराने तुझे केस सजवेन. फुलांच्या लालीम्याने तुझे ओठ रंगवेन..” या आणि अशाच अनेक अशक्य कोटींतल्या आणाभाका प्रेमात वेडे झालेले जवळपास सगळेच जण घेतात. घेणाऱ्याला आणि ऐकणाऱ्यालाही त्या शब्दांचे वास्तविक फोलपण ठाऊक असते, मात्र त्या नुसत्या शब्दांनीच मनावरून फिरणारे मोरपिसदेखील हवेहवेसे वाटत असते! त्यातूनच प्रेमकथा घडत असते. परंतु कुणी जर खरोखरच या आणाभाका खऱ्या करण्यासाठी धडपडला तर ती प्रेमकथा नुसतीच प्रेमकथा राहात नाही, तर तिची परीकथा होऊन बसते. वास्तवाच्या जगापासून शतयोजने दूर आणि स्वप्नांच्या जगाच्या सहस्रयोजने जवळ, अशी …Read more »

दुभंगाचा अभंग – शॅडो अँड बोन

राष्ट्रं कशामुळे दुभंगतात? युद्धामुळे! पंथवेडामुळे! राजकारणामुळे! राष्ट्रं अनेक कारणांनी दुभंगतात. पण या सगळ्या कारणांच्या मुळाशी असते ती एकच भावना, हाव! राष्ट्रं दुभंगतात ती कुणा एकाच्या हावरटपणापायी. भले वर्तमान त्या हावरट व्यक्तीला नायक म्हणो, पण इतिहास त्या व्यक्तीच्या कर्मांची बरोब्बर नोंद ठेवत असतो. अशीच हाव ‘राव्का’मधील एकाला सुटली. आणि तिचा परिणाम अखंड राव्का दुभंगण्यात झाला. पण हा दुभंग नुसता राजकीय व सामाजिक नाहीये. हा दुभंग आहे जादूचा, ज्याचा ती व्यक्ती ‘स्मॉल सायन्स’ असा उल्लेख करते. या उपविज्ञानातून निर्माण झाले ‘द फोल्ड’. राव्काला दुभंगणारी ही तमोमय भिंत अतिशय हिंस्र अशा व्होल्क्रांनी ग्रासलेली आहे. शतकानुशतके राव्का आपल्या उद्धारकर्त्या अवताराची, ‘द सन समनर’ची वाट …Read more »

स्त्रीकेंद्री प्रहेलिका – द ब्लेच्ली सर्कल

युद्धं केवळ सीमेवरच लढली जातात, ही अंधश्रद्धा आहे. सीमेवर असते ती केवळ दृश्य आघाडी. पण खरी युद्धं लढली जातात ती, राष्ट्राच्या नागरिकांच्या मनात. ज्या राष्ट्राच्या नागरिकांचं मनोबल अतूट असतं आणि राष्ट्रासाठी आपापल्या अश्रू, रुधिर, स्वेद यांची हवि देण्याची ज्या राष्ट्राच्या नागरिकांची तयारी असते, त्या राष्ट्राचं सैन्यबळ काही का असेना पण ते राष्ट्र युद्धं जिंकतंच. किंबहूना हरले तरीही ते पराभव पचवून अंतिम विजयासाठी पुन्हा उभे राहातात. दुसरं महायुद्ध ही अशाच मनोबलाच्या जोरावर जिंकलेल्या युद्धांची गाथा आहे. त्या काळी इंग्लंडमधील स्त्रियांना सीमेवर लढण्याची अनुज्ञा नव्हती. पण म्हणून काही तत्कालीन ब्रिटिश स्त्रिया शांत नाही बसल्या. त्यांनी दुसऱ्या मार्गांनी आपलं योगदान दिलं. किंबहूना त्यांचं …Read more »

चित्रपटांच्या उत्क्रांतीमार्गातील धातुस्तंभ : २००१ – अ स्पेस ओडिसी

उत्क्रांतीच्या पहिल्या पायरीवर, जेव्हा माणसाचा अद्याप माणूस व्हायचा होता, तेव्हा एका मानवसदृश वानरांच्या कळपापुढे अचानकपणे एक धातुस्तंभ येऊन उभा राहातो. ही वानरं टोळ्या करून राहाणारी आणि पाण्याच्या डबक्यांवरून दुसऱ्या कळपांशी भांडणारी, एकमेकांना घाबरून राहाणारी आहेत. काही वानरं त्या स्तंभाला स्पर्श करतात. स्पर्श केलेल्या वानरांचा कळप नवनवीन युक्त्या वापरून दुसऱ्या कळपांवर सहजी विजय मिळवू लागतो. लक्षावधी वर्षांनंतर चंद्रावर एका अवकाशयानाला तसाच पण आधीच्यापेक्षा मोठा स्तंभ सापडतो. त्या स्तंभाच्या खुणेवरून मानवांचे अजून एक अंतराळयान गुरूच्या दिशेने झेपावते. त्यांना तिकडे काय आढळते, याचा आध्यात्मिक, तात्त्विक, भौतिक आणि वैज्ञानिक पातळीवर घेतलेला रूपकात्मक शोध म्हणजे स्टॅन्ली कुब्रिकची १९६८ सालची श्रेष्ठतम कलाकृती, ‘२००१ – अ स्पेस …Read more »

सोलफुल जॅझ — सोल

रहमानने मला ज्या अनेक गोष्टी दिल्या आहेत त्यांच्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जॅझ. त्याने गेल्या तीन दशकांतील त्याच्या अनपेक्षित रचनांमधून वेळोवेळी जॅझशी ओळख करून दिली आणि माझ्यासाठी जणू एक नवंच दालन खुलं झालं. जे योगदान राजाचं मला व माझ्यासारख्या अनेकांना सिम्फनिक संगीताची गोडी लावण्यात आहे, तेच योगदान रहमानचं आम्हाला जॅझचं वेड लावण्यात आहे. पुढे या वाटेवर हर्बी हॅन्कॉक, सोनी रॉलिन्स, माईल्स डेव्हिस, डायना क्राल वगैरे गंधर्व भेटत गेले आणि सगळा प्रवासच जॅझसारखा उन्मुक्त, उत्फुल्ल होऊन गेला. रहमानला कदाचित कल्पनाही नसेल की, त्याने पेटवलेले हे स्फुल्लिंग २०२० साली अवचितपणे एका चित्रपटाशी वेगळ्याच सुरावटीवर जोडले जाण्यात मदत करेल. मी बोलतोय पिट …Read more »

नील

Spoiler_Alert स्पॉयलर_अलर्ट [‘टेनेट’ पाहिलेला नसल्यास लेख वाचू नये, रसभंग होण्याची शक्यता आहे. चित्रपट पाहिल्यावरच लेख वाचावा.] ‘टेनेट‘मधील माझं सध्याचं सगळ्यांत आवडतं पात्र नील आहे. एक तर रॉबर्ट पॅटिन्सनने जॉन डेव्हिड वॉशिंग्टनपेक्षा जास्त चांगलं काम केलंय. आणि दुसरं कारण असं की, त्याचं पात्र हे भविष्यातून भूतकाळात आलेलं असल्यामुळे सुरुवातीपासूनच सर्वानुभवी व परिपक्व आहे. त्या मानाने नायकाचे पात्र आत्ता कुठे शिकू लागलेय. या अनुभवाच्याच आधारे नीलने त्याच्या आयुष्याचे तत्त्वज्ञान उभारलेय, “What’s happened, happened”. या तीनच शब्दांमध्ये भौतिकशास्त्रीय आणि तात्त्विक अशा दोन्ही पातळ्यांवर अतिशय सारगर्भ चिंतन आहे. गणित आणि भौतिकशास्त्रात एक सिद्धांत आहे, त्याला ‘केऑस थियरी‘, अर्थात ‘कोलाहल सिद्धांत’ असे म्हणतात. हा सिद्धांत …Read more »

‘टेनेट’ – उलट्या काळाचा सुलटा भविष्यवेध!

चलचित्र बनवणं आणि चित्रपट बनवणं, यात एक मूलभूत फरक असतो. एक उदाहरण देतो. समजा की, चलचित्र म्हणजे कविता आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत काहीतरी एक विधान करणारी. चित्रपट मात्र कवितेसारखा नसतो. चित्रपट म्हणजे सूक्त असते. त्याची प्रत्येक चौकट ही एखाद्या ऋचेसारखी असते, स्वयमेव काही कथा सांगणारी. आणि या चौकटी जेव्हा एकत्र येतात तेव्हा अनेक ऋचा मिळून जसे एक परिपूर्ण आणि काहीतरी गूढ उलगडून सांगावे तसा अर्थ सांगणारे सूक्त बनते, तसा चित्रपट सबंध पाहिला तर चौकटींनी बनलेली परंतु चौकटींपेक्षा भिन्न अशी कथा उलगडते. हा निकष लावला तर मला सांगा, जगात खरोखर किती ‘चित्रपट’ बनतात! इतकी कठोर परीक्षा घेतली तर जगातील काही भलेभले आणि …Read more »

किंचित फुगलेला, पण आवडलेला – सुपरमॅन : रेड सन

‘एमसीयू’ आणि ‘डिसीइयू’ मध्ये दोन मूलभूत फरक होते. मार्टिन स्कॉर्सेसीच्या दृष्टीने मार्व्हलचे चित्रपट हे चित्रपटच नसले, तरीही त्यांनी बॉक्स ऑफिसवर गेल्या दशकभरात अब्जावधी डॉलर्सचा धुमाकूळ घालत चाहत्यांची जवळजवळ एक आख्खी पिढी आपल्या बाजूला वळवली. त्याच आसपास सुरू झालेल्या ‘डिसीइयू’ला मात्र ना समीक्षकांची फारशी दाद मिळवता आलीये ना रसिकप्रियता. अर्थात ‘वंडर वुमन’च्या (२०१६) प्रचंड यशानंतर आणि ‘अक्वामॅन’ (२०१९), ‘शझॅम’ (२०१९) यांच्या निमित्ताने रोख बदलण्यात यशस्वी झाल्यावर हा फरकही हळूहळू पुसट होत चाललाय. परंतु एक फरक मात्र अद्यापही कायम आहे, तो म्हणजे डिसीच्या मालिका आणि विशेषतः त्यांचे अनिमेटेड चित्रपट हे मार्व्हलच्या मालिका व अनिमेटेड चित्रपटांपेक्षा अनेक पटींनी सखोल आणि श्रेष्ठ असतात. (अपवाद …Read more »

एरर्समधून चालणारी ट्रायल – ट्रायल अँड एरर

डॉक्युमेंटरी अथवा माहितीपट हा प्रकार आपल्याला ऐकून आणि पाहून चांगलाच परिचित आहे. जेव्हा डॉक्युमेंटरी हा प्रकार कथाकथनाचे साधन म्हणून मांडला जातो, तेव्हा मात्र त्यातून फिल्ममेकिंगची एक वेगळीच शैली निर्माण होते, त्या प्रकाराला म्हणतात मॉक्युमेंटरी, अर्थातच मॉक-डॉक्युमेंटरी! तसं बघायला गेलं तर डॉक्युमेंटरी आणि मॉक्युमेंटरी यांच्यात फारसा फरक नसतोच. बऱ्याचशा डॉक्युमेंटरीज या एखाद्या विशिष्ट विचारसरणीला वाहून घेतलेल्या, काय निष्कर्ष काढायचाय हे आधीपासूनच पक्के ठरवून असलेल्या आणि त्याच दृष्टीने सबंध मांडणी करणाऱ्या असतात, हे उघड गुपित आहे. फक्त त्या आपल्या झुकावाला निष्पक्षतेचा बेमालूम मुखवटा चढवतात. तर मॉक्युमेंटरीमध्ये कथावस्तूपासून पात्रांपर्यंत सगळेच नकली असते. त्या अनुषंगाने बघायला गेलं तर बऱ्याचशा मॉक्युमेंटरीज या डॉक्युमेंटरीजपेक्षा जास्त प्रामाणिक …Read more »

हवीहवीशी वाटणारी लबाडी – व्हाईट कॉलर

थेटपणे खून करणारे, हिंसा करणारे अपराधी तर घातक असतातच, पण त्याहून शतपटींनी घातक असतात ते तुमच्यातच राहून, तुमचा विश्वास संपादन करून गंडवणारे! पहिल्या प्रकारचे लोक तुमचे शारीरिक आणि आर्थिक नुकसान करतात. पण दुसऱ्या प्रकारचे लोक तुमच्या विश्वासाला कधीही भरून न येणारा तडा देऊन जातात. हे पांढरपेशा अपराधी कधी लाचखोर शासकीय अधिकारी बनून व्यवस्थेचा भाग असतात तर कधी व्यवस्थेलाच नाकारणारे अराजकवादी. त्यांची रुपं अनेक आहेत, त्यांचे मार्ग अनंत आहेत. साधर्म्य जर काही असेल, तर केवळ त्यांची ओरबाडण्याची, आपल्या मालकीच्या नसलेल्या वस्तू हिरावण्याची वृत्ती! या पांढरपेशा अपराध्यांना तथा व्हाईट कॉलर क्रिमिनल्सना रोखण्यासाठी एफबीआयची एक स्वतंत्र शाखा आहे. या शाखेत धडाडीचा स्पेशल एजंट …Read more »