Category Archives: Music

शारदेच्या अंशा..

आपल्याला नाही का, लहानपणी छायागीत, चित्रहार, रंगोली वगैरे पाहाताना किंवा बिनाका गीतमाला अथवा तत्सम कार्यक्रम ऐकताना, त्या सुमधूर आणि जनप्रिय गीतांच्या सोबत गुणगुणायची सवय लागते. मग हीच गाणी कधी भेंड्या खेळताना कामी येतात, कधीतरी कुणाला तरी मोहविण्यासाठी चपखल बसतात. मग कुणातरी मित्रमैत्रीणीकडून त्या गाण्याचं कधीतरी कौतुक केलं जातं. आणि ‘आपल्याला गाता येतं’ असा साक्षात्कार सहजच होऊन जातो! गाण्याचं शिक्षण तर झालेलं नसतं. असतो तो फक्त देवाने दिलेला कंठप्रसाद! काही जण तेवढ्यावरच खुश राहातात. जसजसं वय वाढतं आणि कालानुरुप विविध जबाबदाऱ्या खुणावू लागतात, तसतसं गाणं दुरावत जातं. ते उरतं फक्त चार नातेवाईक-मित्रांच्या फर्माईशीपुरतंच! पण काही जण मात्र असतात जे या कंठाला …Read more »