रहमानला सारं काही कळतं!!

नष्ट होती आशा अन् जळू लागती दिशा
नैराश्याच्या गर्तेत केवळ अश्रूंचीच भाषा
एक लकेर उमटते अन् डोळ्यांतलं पाणी खळतं
मनात तेव्हा विश्वास वाटतो –
“रहमानला सारं काही कळतं”!

तुझा एक-एक सूर आणि एक-एक ताल
आपसूकच बनतात ते सारे माझी ढाल
अंधाऱ्या अंतरी तेज स्पर्शते अन् गानब्रह्म आकळतं
मनात तेव्हा विश्वास वाटतो –
“रहमानला सारं काही कळतं”!

मी अज्ञाताचा प्रवासी तू दीप घेऊन उभा तिथे
तू घेता कवटाळूनी अंतर्मन माझे रिते
सारे अहं अर्पिता तुला मन “स्व”कडे वळतं
मनात तेव्हा विश्वास वाटतो –
“रहमानला सारं काही कळतं”!

– © विक्रम.
(www.vikramedke.com )

image

One thought on “रहमानला सारं काही कळतं!!

  1. विक्रम, नुकताच तुझा परिचय एका लेखातून झाला. आज साईटवर आणखी तुझ्या काव्य- शास्त्र – विनोदाचा आस्वाद घेत आहे. संपर्कात असायला आवडेल. विंग कमांडर शशिकांत ओक. मो.क्र.९८८१९०१०४९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *