कसं जगायचं..?


कसं जगायचं..
तुजविण जीवन सूने, कसं जगायचं..?

तुझ्या घरपासनं मी चकरा मारतोय रोज
दिसशील तू कधीतरी ही आशा फुलते रोज
मग दिसताच तू मला, मी खुदकन हसायचं
पण नाहीच हे होणे, कसं जगायचं…?
कसं जगायचं..
तुजविण जीवन सूने, कसं जगायचं..?

कॉलेजवरती कट्ट्यावरती विषय तुझाच मनी
हळूच टिपतो डोळे जेव्हा बघत नाही कोणी
येणाऱ्या प्रत्येकीत आता तू मला दिसायचं
बघ फितूर झाले डोळे, कसं जगायचं…?
कसं जगायचं..
तुजविण जीवन सूने, कसं जगायचं..?

कुठेच नाही लक्ष मी गर्दीत एकटा
भिजून भिजून किती तरी माझा रुमाल कोरडा
तिन्ही-त्रिकाळ तुलाच मी देवाकडे मागायचं
पण नाहीच तो ही देणे, कसं जगायचं…?
कसं जगायचं..
तुजविण जीवन सूने, कसं जगायचं..?

भेटणारच तू मला हे मला माहित आहे
होणारच तू माझी हे मला ठाऊक आहे
मग आपल्या नात्याचं रेशीम मी तेव्हा उलगडायचं
पण तोवर कसले जगणे, कसं जगायचं…?
कसं जगायचं..
तुजविण जीवन सूने, कसं जगायचं..?

– © विक्रम.

2 thoughts on “कसं जगायचं..?

Leave a Reply to Adwait Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *