
पृथ्वीवर जीवनाची उत्पत्ती पाण्यात झाल्याचा सिद्धांत चार्ल्स डार्विनने मांडला [संदर्भ: Darwin, Francis ed (1887), Vol. 3, “The Life & Letters Of Charles Darwin, Including An Autobiographical Chapter”, London : John Murray, Pg. 18]. आजही काही वर्ग सोडल्यास बहुतांशी शास्त्रज्ञ हाच सिद्धांत मानतात. यातूनच पुढे डार्विनचा उत्क्रांतिवाद जन्मास आला. मीही आज उत्क्रांतिवादच समजावून सांगणार आहे, पण जरा वेगळ्या प्रकारे! मला आकळला तसा. पहा पटतोय का! जीवनाची उत्पत्ती पाण्यात झाल्याचे ऋषींनी शोधले. जीवन निर्माण करणं परमेश्वराच्याच हातात, त्यामुळे त्यांनी या प्राथमिक जीवनास परमेश्वराचा, पालनकर्ती देवता श्रीविष्णूचा अवतार मानले. नाव दिले, “मत्स्यावतार”! पुढे आणखी उत्क्रांती झाली. आता जीव पाण्यासोबतच जमिनीवरही राहू शकत होता. …Read more »