श्रीगणेश विज्ञान

 

खूप दिवसांपासून या विषयावर लिहायचे मनात होते. आजचा मुहूर्त अगदी योग्य आहे. श्रीगणेश-जन्माची कथा आपणा सर्वांना माहितीच आहे.

तरीही संदर्भासाठी थोडक्यात देतो.
पार्वतीने आपल्या शरीरावरील मळापासून एक मूर्ती तयार केली. त्यात प्राण फुंकून त्याला स्वत:चा मुलगाच मानले. पुढे या मुलाचे शिर श्रीशंकराच्या हातून उडवले जाते. पार्वतीचा विलाप पाहून शिवशंकर एखाद्या दुसर्या बालकाचे शिर आणण्याची आज्ञा …देतात. शिवगण चुकून एका हत्तीच्या पिल्लाचे शिर घेऊन येतात. मानवी शिर शोधण्याइतका वेळ उरला नसल्याने अखेरीस तेच शिर लावले जाते, आणि अश्याप्रकारे गणेशाचा जन्म होतो.”

आता या कथेत खालील गोष्टी महत्वाच्या आहेत.

१) देवी पार्वती आपल्या शरीरावरील मळापासून एक मूर्ती तयार करतात. ही मूर्ती सजीव होते.
२) कोणतेच दुसरे शिर न मिळाल्याने शिवगण एका हत्तीच्या पिल्लाचे शिर
आणतात. अखेरीस तेच शिर लावले जाते.

आता या कथेकडे व्यवस्थित पाहिल्यास कळते की ही कथा म्हणजे “क्लोनिंग” आणि “अवयावारोपण” करण्याचा जगातील पहिला प्रयोग असू शकतो. कसे ते पहा. पार्वती आपल्या शरीरावरील मळापासून एक मूर्ती तयार करते,
जी सजीव होते. जीवशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास, आपण जेव्हा एक साधी चुटकी वाजवतो, तेव्हाही सहस्रावधी पेशी शरीरापासून विलग होतात. पार्वतीने जाणून-बुजून अंगावरील मळ खरवडला होता. तिला जिवंत
उति (tissues) मिळवावयाच्या असाव्यात ही शक्यता नाकारता येत नाही. तात्विक दृष्ट्या हे सहज-शक्य आहे. तसेच शंकराने गणेशाचे शिर उडवल्यावर घाईने दुसरे शिर हवे असते, कारण त्या बालकाचा प्राण गेला होता पण मध्ये फार काळ गेला नसल्याने “वैद्यकीय मृत्यू (Clinical Death)” झाला नसावा. शिवगणांनी वेंधळेपणा केल्यावर पुन्हा मानवी शिर शोधण्यात आणखी कालापव्यय झाला असता. म्हणून हत्तीचेच शिर बसवले गेले. हा तत्कालीन अवयावारोपणाचा प्रकार असण्यात अशक्य काय आहे? आजही विज्ञान मानवी अवयवांचे रोपण करूशकते. अजून थोडी प्रगती झाल्यावर प्राण्यांच्या अवयवांचे रोपण होऊ शकेलच ना? म्हणजे ही देखील गोष्ट तात्विक-दृष्ट्या अशक्य नाही. आता हे सगळे वाचल्यावर काही लोक एक ठेवणीतला प्रश्न विचारतील, “एवढी प्रगती इतक्या प्राचीन काळी झाली असणे कसे शक्य आहे?” त्यांना मी विचारतो की, का अशक्य आहे? केवळ काळ फार प्राचीन आहे, हे काही कारण नाही होऊ शकत. या प्रश्नकर्त्या मंडळींचे खरे दुखणे काय असते माहितीय का? ते आहे “न्यूनगंड”. हो, न्यूनगंड. एखादी गोष्ट हिंदू म्हणजेच भारतीय म्हटली की ती वाईटच असली पाहिजे, हा तो न्यूनगंड होय. हीच गोष्ट जर कुणा युरोपीय अथवा अमेरिकन संशोधकाने शोधली असती तर मात्र आम्ही ती मानानार्यांत अग्रभागी असलो असतो! कारण “साहेबं वाक्यं प्रमाणं!” आपण गोऱ्या कातडीच्या मानसिक गुलामीतून बाहेर यायला आजही तयार नाही हेच खरे! बरे, हिंदू संस्कृती आणि धर्म हा जगात सर्वाधिक विज्ञान-निष्ठ असल्याचे हिंदू सोडून जगातील सगळ्याच संशोधकांचे मत आहे. पण आमचा न्यूनगंड आणि आपसातील भांडण मात्र आपल्याला हे सत्य स्वीकारण्यापासून रोखतेय! हिंदूंच्या विज्ञान-निष्ठेचे आजवर शेकडो पुरावे सापडले आहेत, पण ज्यांनी झोपेचे सोंग घेतलेय त्यांच्या नजरेला ही गोष्ट कशी पडणार? त्यांना मुळात आपले वेद-पुराणे हेच खोटे वाटतात. चला, क्षणभर वादासाठी तेही गृहीत धरू. आता पुन्हा वरील कथा पहा. याही परिस्थितीत वरील कथा पाहिल्यास ती वैद्यकीय-दृष्ट्या १००% योग्य असल्याचेच आढळेल! मग निदान व्यासांनी “विज्ञान-कथा”
लिहिली एवढे तरी मान्य कराल? आणि कुठेतरी या गोष्टी खरोखर असल्याशिवाय इतकी “सुयोग्य” विज्ञान-कथा तरी कशी सुचेल? या कथेपेक्षाही कितीतरी प्राचीन काळात “ऋभू” नावाच्या ३ बंधूंनी विविध शस्त्रक्रिया केल्याचे पुरावे ऋग्वेदात आहेत. “चरक” हा “सर्जन” शस्त्रक्रियेपूर्वी आपली हत्यारे उकळून घेत असल्याचे त्यानेच
लिहून ठेवलेय. याचा अर्थ त्याला इतक्या प्राचीन काळातही सूक्ष्मजीवांचे ज्ञान होते असाच होतो ना? विमान बनवण्याची प्राचीन भारतीय विधी मीच पूर्वी प्रसिद्ध केली होती. राजा भोज याच्या “समरांगण सूत्रधार” नामक ग्रंथात तर “यंत्रमानव” बनविण्याचीही विधी दिलीय. मग इतके सगळे विज्ञान असणार्या संस्कृतीत मी म्हणतो त्याच प्रमाणे गणेश- जन्म झाला नसेल कशावरून?
 पहा, विचार करा. “सूज्ञांना” पटेल.

गणपती बाप्पा मोरया”

सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपलाच,
विक्रम श्रीराम एडके.
(संपर्क : edkevikram@gmail.com)

13 thoughts on “श्रीगणेश विज्ञान

  1. प्राचीन काळातली प्रगती म्हणण्यापेक्षा आपण म्हणू कि प्राचीन काळातल्या घटना या प्रतीकात्मक पद्धतीने आधुनिक आहेत. जसे त्या वेळचे “पुष्पक” विमान हे आजच्या विमानांना व helicoptersना symbollically represent करते. दुखाची बाब हि कि आपल्या हिंदू बांधवांमध्ये हे समजण्या इतके सामंजस्य फारसे उरलेले नाही.

  2. Not only leaving tissues but dead tissues also contain genes;this fact makes this story very very scientific…Keep it up bro…i have posted similar kind of facts on fb…hope you have gone through it..wish you luck!!!

  3. Mi tumachya matashi purntaha sahmat aahe….
    mazya mahitiprmane; aani ethe London madhil kahi lokanchya sanvadavarun as kalat aahe ki pashyatya(western) Lok suddha aaaplya vedaancha aabhyas karat aaahet. Yachi fakt laj vatate ti aaplya kahi lokanna.

    • धन्यवाद चैतन्यजी .तुम्ही प्रत्यक्षदर्शी असल्याने तुम्ही सांगितलेल्या गोष्टीला निश्चितच महत्व आहे. माझ्या माहितीनुसार अमेरिकेतील एका चौकालाही प्राचीन काळापासून Ganesha Boulevard असेच नाव आहे. अगदी तिथे ब्रिटिशांनी वस्ती करण्याच्या आधीपासून.

    • धन्यवाद चैतन्यजी .तुम्ही प्रत्यक्षदर्शी असल्याने तुम्ही सांगितलेल्या गोष्टीला निश्चितच महत्व आहे. माझ्या माहितीनुसार अमेरिकेतील एका चौकालाही प्राचीन काळापासून Ganesha Boulevard असेच नाव आहे. अगदी तिथे ब्रिटिशांनी वस्ती करण्याच्या आधीपासून.

  4. अस म्हणतात कि एक कालचक्र अविरतपणे चालू असत.. आज या चक्राच्या शिरोभागी असणाऱ्या गोष्टी उद्या तळाला असतात तर आज तळाला असणाऱ्या गोष्टी उद्या शिरोभागी… ‘Fashion ‘ या विषयाबाबतीत तर हि गोष्ट सगळ्यांना प्रकर्षाने दिसेल. विज्ञानाबाबतीत सुद्धा असेच चालू आहे फक्त त्याचा कालखंड मोठा असू शकतो इतकच. आज विज्ञान प्रगतीकडे चालले आहे याचा अर्थ ते नेहमीच अविकसित होत अस कस म्हणू शकतो? प्राचीन काळी ते प्रगत होत मग ते लयास गेल आणि आता पुन्हा प्रगती कडे जात असेल हे आपण नाकारू शकत नाही. कणाद ऋषींनी इ.स.वी ६०० वर्षांपूर्वी अणूविषयी लिहून ठेवल आहे.हे विसरणं आणि John dalton (1766-1844) याने त्याचा शोध लावण हे म्हणन यात मूर्खपणा आहे… त्याच्या आधी आपल्या जगद्गुरू तुकारामांनी लिहिलच आहे कि “अणू रेणू या थोकडा,तुका आकाशा एवढा”. जर अणू सारख्या पदार्थ विज्ञानातील सूक्ष्माती सूक्ष्म गोष्टीला हे लागू असेल तर प्राचीन भारतीयांनी शरीर विज्ञानात प्रगती केली नसेल हे कशावरून?
    एवढंच काय तंजावर येथील राजे सरफोजी २(जन्म 1777) यांनी डोळ्यांच्या शस्त्रक्रियेत महारथ मिळवलं होत याची नोंद आहे.त्यांच्या रुग्णांच्या नोंदी सविस्तर पाने आजही उपलब्ध आहे.ज्याला आपण patient history म्हणतो ती पद्धत भारतीय वैद्य पूर्वीपासून वापरत आले आहेत.आज mediacal science मध्ये या गोष्टीला अतिशय महत्व दिल जात . त्याच्या शोध कोणी पाश्चात्यांनी लावला नाही. स्वामी विवेकानंद म्हणत कि हि भूमी आता पुन्हा जागृत होत आहे याचा अर्थ ती पूर्वीही कधीतरी संपूर्ण जागृत आणि उत्कृष्ट अवस्थेत होतीच.खर तर या आणि अशा कितीतरी गोष्टींवर अभ्यास करण्यापेक्षा पाश्चात्त्य म्हणत तेच खर मानून त्यंच्या मागे पळण्यात आपण धन्य मानतो हेच आपले दुर्दैव!

    • क्या बात हैं गिरिशजी! खूप सुंदर आणि अर्थपूर्ण विश्लेषण केलेय तुम्ही. मनापासून धन्यवाद.

    • क्या बात हैं गिरिशजी! खूप सुंदर आणि अर्थपूर्ण विश्लेषण केलेय तुम्ही. मनापासून धन्यवाद.

  5. न्यूट्रॉन्सच्या टकरीत शोधण्याऐवजी माणसानं स्वतःमधल्या ईश्‍वराच्या अंशाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तर त्याला इथं अधिक काळ राहावंसं वाटलं असतं, असं म्हणायला जागा आहे. स्वामी विवेकानंद या संन्याशानं हा शोध तेव्हाच लावला होता; पण आम्ही बुद्धिप्रामाण्यवादी. संन्याशास काय कळतं? न्यूट्रॉन्सच्या टकरीतून निर्माण झालेला तो खरा ईश्‍वरीय अंश! मग चराचरात ईश्‍वर आहे, असं सांगणारे आपले पूर्वज काय वेगळं सांगत होते? तेच आता सांगायला न्यूट्रॉन्स कोलिजन आणि झायक्‍लोट्रॉनचं असं मोठं आडवळण घेण्यात आमच्या बुद्धीचं प्रामाण्य! तेही असावं; पण जिचं प्रमाण मानतो, ती बुद्धी आपल्यापाशी आली कुठून? हा प्रश्‍न विचारायचा नाही. ती स्वतः निर्माण केल्याचा कुठं आधार नाही. स्वतःच स्वतःला श्रेष्ठ ठरवायचं आणि तसे आहोत, अशी खात्री बाळगायची. परीक्षेच मीच उत्तरपत्रिका लिहायची, मीच स्वतःला शंभरपैकी शंभर मार्क द्यायचे आणि उत्तीर्ण झालो म्हणून बुद्धिमान समजायचं! हे आमच्या बुद्धीचं प्रमाण! ठीक आहे. न्यूट्रॉन्सच्या टकरीत जन्म घेतलेल्या का होईना बुद्धिप्रमाणित, आयएएस मार्कधारी ईश्‍वरानं इथून क्षणार्धात सूंबाल्या न करता थोडा जास्त वेळ थांबावं. (डॉक्‍टरांची काळजी नको! बुद्धिप्रमाणित ईश्‍वराला ते खाली ओढणार नाहीत. तेवढे सौजन्यशील ते नक्की आहेत) आणि इथं थांबून पृथ्वीतलावरच्या प्रमाणित बुद्धिवंतांना एखाद्या इलेक्‍ट्रॉन एवढीतरी सद्‌बुद्धी द्यावी, अशी त्याच्या चरणी विनम्र प्रार्थना!

    ‘हे न्यूट्रॉनपुत्रा ईश्‍वरा…!’मंगेश तेंडुलकरयांच्या सकाळ वर्तमानपत्रातील सप्तरंग पुरवणीतून साभार…

Leave a Reply to sanket joshi Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *