काल फार्मास्युटिकल्स कंपनीचा कर्ताधर्ता असलेला काल (विवेक ओबेरॉय) हा अपंग आहे. लहानपणापासूनच त्याच्या गुणसूत्रांमध्ये दोष असल्याने तो आपल्या शरीरातील केवळ चेहरा आणि एका हाताची बोटेच तेवढी हलवू शकतो. परंतू त्याच्या शरीराची सारी शक्ती याच दोन अवयवांत एकवटून त्याच्याकडे अतिंद्रीय शक्तींचा भलामोठा संचय झालाय. काल जरी एक फार्मास्युटिकल कंपनी चालवत असला, तरीही त्याचा मुख्य व्यवसाय हा विषाणू बनवून कोणत्या तरी देशात सोडणं आणि नंतर त्याच देशाला प्रतिजैविक विकून पैसा कमावणं, हा आहे. या उपद्व्यापात कालने अनेक अमानव (म्यटंट्स / चित्रपटात वापरलेला शब्द – मानवर) तयार केले आहेत. त्यांच्याद्वारे तो आपल्या अपंगत्वावर इलाज शोधू पाहातोय आणि आपल्या जैवतंत्रज्ञानातील ज्ञानाचा वापर करून सबंध …Read more »
Category Archives: Reviews
तरल संवेदनांची सरल गोष्ट – द लंचबॉक्स
साजन फर्नांडिस (इरफान खान) हा एक मध्यमवयीन, विधुर, एकटाच राहाणारा, जरासा माणुसघाणा असा सरकारी कर्मचारी आहे. एकटेपणामुळे आणि मुंबईतल्या रोजच्या दगदगीमुळे लवकरच स्वेच्छानिवृत्ती घेऊन नाशिकला स्थायिक होण्याचा विचार आहे त्याचा. त्याने स्वेच्छानिवृत्तीचा अर्जही दिलाय आणि आता आपल्या कार्यालयात तो केवळ महिनाभराचाच पाहुणा आहे. एकटा राहातो, म्हणून घराजवळच मेस लावलीये त्याने. तिथून आलेला डबा मुंबईतले डबेवाले रोज त्याला कार्यालयात पोहोचवतात. अर्थात ही केवळ एक सोय आहे, कारण त्याच्या बिचाऱ्याच्या डब्यात रोज महाराष्ट्रातल्या सगळ्या खानावळींची खासियत असलेली “बटाट्याची भाजी”च तेवढी असते! थोडक्यात साजन एकाकी आहे. एकाकी अन् दु:खी. शिवाय जीवनाबाबतचा त्याचा आत्तापर्यंतचा अनुभवही वाईटच आहे. एके दिवशी मात्र चमत्कार घडतो. साजनच्या …Read more »
तलाश – मंत्रावेगळे गंधर्वगान!
कल्पना करा की तुम्ही एखाद्या मैफिलीला गेला आहात. चांगल्या नावाजलेल्या गायकाची मैफिल आहे ही. आज मात्र तो गायक गाताना सतत चुका करतोय. काही जागा जिथं खरं तर सूर असायला हवा होता, त्या मोकळ्याच सोडतोय. का असं करतोय तो? त्याला वेड लागलंय का? मैफिल पुढे सरकत जाते आणि अचानक, अचानक तुम्हाला साक्षात्कार होतो की, इतका वेळ आपण ज्याला संगीत समजत होतो, ते संगीत नव्हतंच मुळी! संगीत तर त्या सूर नसलेल्या मोकळ्या जागांतच होतं. गायकी चालू होती ती तिथं! मूर्ख तो गायक नव्हता, तर आपणच होतो, जे नसलेल्या गोष्टी पाहता पाहता असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होतो; किंबहुना त्यांना तुछ लेखत होतो. …Read more »
"चांगले" आणि "वाईट"च्या पलीकडला – रॉकस्टार
कोणताही कलाकार घ्या. किंवा आपापल्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ ठरलेली कुणीही व्यक्ती घ्या. ते जर आत्ता आहेत तसे नसते तर कसे असले असते? ए. आर. रहमान घ्या. त्याच्या संगीताला जर अध्यात्माची बैठक नसती तर? तर तो कसा असला असता? कसा सोडा. “काय” असला असता? सहस्रो नद्यांच्या जंजाळात समुद्र “एक”च असतो… पण मग त्याने “किनारा” घेऊनच जन्माला यावं ना? समुद्राला किनारच नसला तर कसे चालेल? “रॉकस्टार” पाहून प्रथमदर्शनी विचित्र वाटणारे असे शेकडो प्रश्न मनात उभे राहिलेयत. ही रॉकस्टारची समीक्षा नव्हे. रसग्रहण वगैरेही नव्हे. हा आहे एक प्रयत्न. रॉकस्टार पाहून मनात कल्लोळणार्या वादळाला शब्दांत पकडण्याचा एक निष्फळ प्रयत्न. प्रत्येकाने तो आपापल्या नजरेने पाहावा. “पता …Read more »
Categories
- A R Rahman (17)
- Bajirao (5)
- Bhagavad Geeta (5)
- Books (5)
- Cinema (59)
- Comics (3)
- Hindutva (42)
- History (53)
- Music (11)
- Poetry (55)
- Politics (52)
- Pravaas Chitre (3)
- Ramayana (9)
- Reviews (64)
- Savarkar Katha (3)
- Sawarkar (7)
- TV (27)
- Uncategorized (18)
- Vaidik Knowledge (18)
- कथा (12)
- स्फुट लेख (29)
Menu
Recent Posts
- A Masterclass In Paradox July 25, 2023
- दक्षिणपंथी – यातिसई June 17, 2023
- अर्धवट शिजलेली थाळी – पोन्नियिन सेल्वन २ May 4, 2023
- गेमसारखाच – टेट्रिस! April 9, 2023
- रावणाचं फर्स्ट इम्प्रेशन! October 3, 2022
- मर्यादांमध्ये अडकून पडलेला – पोन्नियिन सेल्वन: १ October 1, 2022
- टबू – असंतांची गोष्ट September 10, 2022
- मार्मिक भाष्याने समृद्ध – बिफॉरेनर्स May 10, 2022
- आरआरआर — भारताची कथा भारताच्या भाषेत जगाला सप्रेम! March 28, 2022
