Blog Archives

एका प्रसंगावधानाची गोष्ट!

२००१ साली अमेरिकेत आतंकवादी हल्ला झाला तेव्हा मी नववीत होतो. काही दिवसांतच त्यादिवशी घडलेल्या घटना आणि त्यांचं विश्लेषण करणाऱ्या बातम्या येऊ लागल्या. मला आठवतं, एका बातमीत सांगितलं होतं की ट्विन टॉवर्सवर विमाने आदळली तेव्हा जॉर्ज बुश कोणत्यातरी पूर्वनियोजित कार्यक्रमांतर्गत लहान मुलांच्या एका शाळेत – वर्गात तिथल्या लहानग्यांशी गप्पा मारत होते. व्हाईट हाऊसच्या कर्मचाऱ्यांपैकी एकाने धावत येऊन त्यांच्या कानात घडलेली घटना सांगितली. श्री. बुश यांनी ते ऐकले. चेहऱ्यावरील रेषही ढळू न देता त्यांनी अत्यंत हलक्या आवाजात त्या कर्मचाऱ्याला काही सूचना दिल्या आणि परत ते त्या लहानग्यांशी बोलू लागले. त्यांनी कार्यक्रम संपवला आणि मगच ते ९/११ संदर्भात पुढील कारवाई करायला बाहेर पडले. …Read more »

“आवडलेला क्रिश-३”

काल फार्मास्युटिकल्स कंपनीचा कर्ताधर्ता असलेला काल (विवेक ओबेरॉय) हा अपंग आहे. लहानपणापासूनच त्याच्या गुणसूत्रांमध्ये दोष असल्याने तो आपल्या शरीरातील केवळ चेहरा आणि एका हाताची बोटेच तेवढी हलवू शकतो. परंतू त्याच्या शरीराची सारी शक्ती याच दोन अवयवांत एकवटून त्याच्याकडे अतिंद्रीय शक्तींचा भलामोठा संचय झालाय. काल जरी एक फार्मास्युटिकल कंपनी चालवत असला, तरीही त्याचा मुख्य व्यवसाय हा विषाणू बनवून कोणत्या तरी देशात सोडणं आणि नंतर त्याच देशाला प्रतिजैविक विकून पैसा कमावणं, हा आहे. या उपद्व्यापात कालने अनेक अमानव (म्यटंट्स / चित्रपटात वापरलेला शब्द – मानवर) तयार केले आहेत. त्यांच्याद्वारे तो आपल्या अपंगत्वावर इलाज शोधू पाहातोय आणि आपल्या जैवतंत्रज्ञानातील ज्ञानाचा वापर करून सबंध …Read more »

सुसंस्कृतम्..!

“तमाखुपत्रं राजेन्द्र भजमाज्ञानदायकम् । तमाखुपत्रं राजेन्द्र भजमाज्ञानदायकम् ।।” वरवर पाहाता असे वाटेल की, इथे एकाच संस्कृत ओळीची पुनरावृत्ती करण्यात आली आहे. पण हीच तर संस्कृत भाषेची मौज आहे. जरी दोन्हीही ओळी समान असल्या तरीही दोन्ही ओळींचे अर्थ वेगळे आहेत. आणि दोन्ही ओळी मिळून एक संपूर्ण श्लोक तयार होतो. सुभाषितकार कुणा राजाच्या दरबारात गेलाय. तिथे त्याने पाहिले की, राजा भर दरबारात कामकाज चालू असतानाही तंबाखूचे व्यसन करतोय. ते पाहून लगेच सुभाषितकाराला ओळ स्फुरली – “तमाखुपत्रं राजेन्द्र भजमाज्ञानदायकम्”. याची फोड होते – “तमाखुपत्रं राजेन्द्र भज मा अज्ञानदायकम्”. अर्थात – हे राजेन्द्रा, नशा आणणारे (अज्ञानदायकम्) तंबाखूचे पान (तमाखुपत्र) नको खाऊस (मा भज). राजाने …Read more »

एक कृतिशील पूल: स्वामी विवेकानंद

मला एका बाबतीत कायम स्वामी विवेकानंदांचं उदाहरण द्यावंसं वाटतं. स्वामीजी हे आपल्या काळातल्याच नव्हे तर आत्ताच्या काळातल्याही कित्येक धर्मज्ञांहून अधिक धर्मज्ञ आणि कित्येक सुधारकांहूनही अधिक सुधारक होते. परंतू त्यांनी कधी निव्वळ निष्क्रिय अध्यात्म लोकांच्या माथी मारलं नाही, वा पराकोटीच्या इहवादाने लोकांच्या श्रद्धांची नासधूस केली नाही. लोकांमध्ये राहिले, लोकांचे बनून राहिले. आत्यंतिक धर्मवाद्यांचे बोट पकडून हळूच त्यांना आवश्यक ती भौतिकता शिकवली आणि आत्यंतिक धर्मवाद्यांना अध्यात्माची वैज्ञानिकता दाखवून दिली. हे सारे नुसते बोलून नव्हे बरं का, तर कृतीने! आठवा त्या संस्थानिकाचा किस्सा! टोकाचा इहवादी असलेला तो संस्थानिक मूर्तीपूजेचा कट्टर विरोधक होता. स्वामीजींनी त्याच्याच दरबारात टांगलेली त्याचीच तसबीर मागवली. सारे पाहातायत. “प्रधानजी, असे …Read more »

तरल संवेदनांची सरल गोष्ट – द लंचबॉक्स

  साजन फर्नांडिस (इरफान खान) हा एक मध्यमवयीन, विधुर, एकटाच राहाणारा, जरासा माणुसघाणा असा सरकारी कर्मचारी आहे. एकटेपणामुळे आणि मुंबईतल्या रोजच्या दगदगीमुळे लवकरच स्वेच्छानिवृत्ती घेऊन नाशिकला स्थायिक होण्याचा विचार आहे त्याचा. त्याने स्वेच्छानिवृत्तीचा अर्जही दिलाय आणि आता आपल्या कार्यालयात तो केवळ महिनाभराचाच पाहुणा आहे. एकटा राहातो, म्हणून घराजवळच मेस लावलीये त्याने. तिथून आलेला डबा मुंबईतले डबेवाले रोज त्याला कार्यालयात पोहोचवतात. अर्थात ही केवळ एक सोय आहे, कारण त्याच्या बिचाऱ्याच्या डब्यात रोज महाराष्ट्रातल्या सगळ्या खानावळींची खासियत असलेली “बटाट्याची भाजी”च तेवढी असते! थोडक्यात साजन एकाकी आहे. एकाकी अन् दु:खी. शिवाय जीवनाबाबतचा त्याचा आत्तापर्यंतचा अनुभवही वाईटच आहे. एके दिवशी मात्र चमत्कार घडतो. साजनच्या …Read more »

परावर्तित प्रसिद्धीचे दिवाने!!

  ईस्माईल दरबार या संगीतकाराने “हम दिल दे चुके सनम”, “देवदास” आणि “किस्ना”ची काही गाणी सोडता काय संगीत निर्माण केलेय हा एक संशोधनाचाच विषय ठरावा. कुणाच्याही लक्षात नसलेला हा माणूस अचानकच प्रसिद्धीच्या झोतात आला ते “ए. आर. रहमानने ऑस्कर मिळवले नसून विकत घेतलेय” या विधानामुळे!   अश्या प्रकारच्या प्रसिद्धीला मी परावर्तित प्रसिद्धी म्हणतो. म्हणजे, स्वत: तर काहीच कर्तृत्व दाखवायचे नाही, परंतू इतर कुणी स्वकष्टाने वर येत असेल तर त्याचेही प्रतिमाभंजन करायचा प्रयत्न करायचा. माझी रेष तुझ्या रेषेपेक्षा मोठी होऊ शकत नाही, तर थांब तुझी रेषच पुसतो – असा आकस दाखवायचा. सूर्यावर दगड फेकला की चार-दोन प्रकाशाचे शिंतोडे आपल्यावरही उडतील, असा …Read more »

आरंभ हैं प्रचंड..!

  काल काँग्रेसची अधिकृत प्रतिक्रिया होती की, हा भाजपचा अंतर्गत मामला आहे. आता लवकरच राहूल गांधींचे नाव पंतप्रधानपदासाठी घोषित करून त्यांच्या नावे फटाके-पेढे आदी जल्लोष करवून घेण्यात आल्यास मला नवल वाटणार नाही. अर्थातच काल काँग्रेसने दिलेली प्रतिक्रिया यावेळी भाजप देईल! परंतू पंतप्रधानपदाचे प्रत्याषी घोषित करणं हा खरंच एखाद्या पक्षाचा अंतर्गत मामला असतो का हो? तसं असतं तर भाजप काल सहजच आडवाणींचं नाव घोषित करू शकले असते आणि सोनिया गांधी २००४ सालीच पंतप्रधान झाल्या असत्या. तेव्हा असा कोणताही अंतर्गत मामला नसतो, तर जो काही असतो तो पक्षाला जनतेतून बहुमत मिळवून देऊ शकणारा निर्णय असतो. थोडक्यात, तो जनतेच्या दबावाचा परिणाम असतो – …Read more »

ब्रिटिशांचा कर्दनकाळ : मदनलाल धिंग्रा

17 ऑगस्ट 1909 हा दिवस कुणीही सच्चा देशभक्त कधीही विसरणार नाही. कारण याच दिवशी सर विल्यम हट कर्झन वायली या इंग्रज अधिकार्‍याचा वध करणारे हुतात्मा मदनलाल दित्तमल धिंग्रा हसत हसत फासावर चढले. 1 जुलै 1909 रोजी पिस्तुलाच्या चार गोळ्या झाडून धिंग्राजींनी कर्झन वायलीचा वध केला होता. ‘एका इंग्रज अधिकार्‍याचा भारतीय क्रांतियोद्धय़ाने केलेला वध’ एवढेच केवळ या घटनेचे महत्त्व नाही, तर हा होता अजिंक्यतेचा तोरा मिरवणार्‍या ब्रिटिशांच्या भूमीवर राहून त्यांच्याच एका अधिकार्‍याचा केलेला वध! अभूतपूर्व अशीच घटना होती ही. याआधी आम्ही भारतीयांनी कुणी गोरा अधिकारी कधी मारलाच नव्हता, असे नाही. दु:शासनी कारवाया करणार्‍या रँडला चापेकर बंधूंनी घातलेले कंठस्नान इंग्रज विसरलेले नव्हते; …Read more »

वाकियात

चँद कंचोंकी आवाज हुई बस, फिर खेल सारा बिखर गया! पंछी उड गये पेडोंसे और, माँ का दामन सिहर गया!! सफेद बर्फपे गिरे थे जो, वो स्याह खूनके छींटें थे! फर्जकी खुशबू थी जिनमें, वो आँसू बडे ही मीठे थे!! गुजर गये थे मौसम यूँ ही, सावन सारे रुठे थे! ‘लौट आऊँगा प्रिये’, कहा था जिनमें वो वादे सारे झूठे थे!! परसोंही जन्मे बच्चेका उसने, मुख भी अब तक देखा न था! बूढे पिताके चरणोंमें, सुना हैं, कई दिनोंसे मथ्था टेका न था!! नेता मस्त थे घोटालोंमें, आवाम चैनसे सोया था! बस धरतीका सीना उस दिन, चुपके चुपके रोया था!! …Read more »

उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य-वरान्निबोधत!!

The track “Nenje Ezhu” from Maryan is one of my favorite songs. It’s great music & soulful voice of none other than A.R. Rahman inspired me so much that I decided to write a Hindi poem on this tune. So, here is my take on this song. This is not a translation but an independent poetry conveying the meaning of the song. I’ve taken the poetic-freedom of incorporating many concepts from the holy Katha-Upanishada (“Awake, Arise.. & stop not till the goal is achieved”!! – Katha/1.3.14; Apparently the favorite quote of Swami Vivekananda!) & the Bhagawad-Geeta (“Nainam Chhindati Shastrani – …Read more »