समजा आपल्या देशाने एखादा जिहादी आतंकवादी पकडला. त्याची रोज चौकशीही होतेय. तो रोज त्याच्या थोड्या थोड्या साथीदारांची नावेही सांगतोय. परंतु तरीही चौकशी पूर्ण होण्याच्या आत शासन त्या लोकांची नावं जाहीर करतं का हो? नाही करत! का? अहो कारण सोप्पं आहे. अर्धवट माहितीच्या आधारे नावं जाहीर केली, तर तो ज्यांची नावे घेणार आहे ते अपराधी सावध नाही का होणार! जिथे मोठ्ठा समूह हाती लागण्याची शक्यता आहे, तिथे चार-दोन छोटे मासे पकडून समाधान मानावं लागेल. त्यामुळे कोणतंही शासन अशी नावं चौकशीच्या दरम्यान जाहीर करत नाही. किंबहूना कुणाची चौकशी चाललीये आणि ती कोणत्या दिशेने चाललीये, हेही सांगितलं जात नाही. हे झालं जरासं अवघड …Read more »
Category Archives: स्फुट लेख
तुम्हाला पुरोगामी व्हायचंय का? सोप्पं आहे!!
हल्लीच्या जगात ‘श्वास घेण्या’पेक्षाही सोपी गोष्ट कोणती झालीये माहितीये? ‘पुरोगामी होणे’!! त्यासाठी काय करायचं? काहीच नाही, जाणून-बुजून सातत्याने हिंदूंना अपमानास्पद वाटेल असं वागत राहायचं, की ठरलातच तुम्ही पुरोगामी! मग यात सरळसरळ तुमचा ढोंगीपणा दिसला तरीही चालेल. कारण तुम्हाला काहीच करावं लागत नाही. हे मूर्ख हिंदूच ‘तुमचा ढोंगीपणा हा कसा तुमचा ढोंगीपणा नसून प्रामाणिकपणा आहे’ हे जीवाच्या आकांताने सांगायला पुढे येतात. अहो उलट तुम्ही जितका जास्त ढोंगीपणा कराल तितकी वरची पुरोगामी श्रेणी मिळेल तुम्हाला. म्हणजे थोडासा ढोंगीपणा केला की – ‘विवेकवादी’, त्याहून अधिक केला की – ‘पुरोगामी’आणि आणि ढोंगीपणाची कमाल मर्यादा गाठली की – ‘भारतीय सेक्युलर’!! आणि हे सारं अगदी सोप्पं …Read more »
अनुच्छेद ३७० : दशा आणि दिशा
“अनुच्छेद 370: दशा आणि दिशा” (साप्ताहिक विवेक, दि. २९ जून ते ५ जुलैच्या अंकात प्रकाशित झालेला लेख.) केंद्रामध्ये भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांना स्पष्ट बहुमत मिळाल्यापासून अनुच्छेद 370चा मुद्दा पुन्हा एकवार जोर पकडू लागला आहे. तसा हा मुद्दा सुरुवातीपासूनच विवादित. त्यातून या अनुच्छेदाला विरोध करणारे सरकार अस्तित्वात आल्यापासून तर हे अनुच्छेद रद्द करावे, अशी जोरदार मागणी होणे साहजिकच होते. ही मागणी जितकी तीव्रतेने होऊ लागली, तितक्याच तीव्रतेने या अनुच्छेदाच्या पाठीराख्यांनी विरोधही सुरू केला आहे. गंमत म्हणजे या दोन्हीही बाजू आपापले म्हणणे मांडण्यासाठी हाती असलेल्या सर्व माध्यमांचा – मुख्यत्वेकरून नव्यानेच लोकप्रिय झालेल्या फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप इ. सोशल मीडियाचा – पुरेपूर …Read more »
सेक्युलरी गौडबंगाल : एक चिंतन
आपल्या बऱ्याच मित्रांना स्वत:ला ‘सेक्युलर’ म्हणवून घ्यायची खाज असते. कारण काय, तर म्हणे भारत हा एक सेक्युलर देश आहे. या ‘सेक्युलर’ शब्दाचे उपद्रवमूल्य समजल्यामुळे हा शब्द एखाद्या शिवीसारखा वापरणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. पण या सेक्युलर-भक्तांना आणि विरोधकांनाही एक गोष्ट अजिबात ठाऊक नसते की, भारतात हे सेक्युलरी गौडबंगाल आलं कधी? तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल मित्रहो, परंतू हा ‘सेक्युलर’ शब्द भारताच्या संविधानात ४२व्या घटनादुरुस्तीअन्वये घुसडण्यात आला! मी मुद्दामच ‘घुसडण्यात आला’ असे म्हणतोय, कारण भारतात ढोबळमानाने १९७५ ते १९७७ आणीबाणी होती आणि ही उपरोक्त घटनादुरुस्ती झाली आहे १९७६ साली! तेव्हा हा ‘सेक्युलर’ शब्द घटनेत कुणी टाकला असेल, काय हेतूने टाकला असेल, आणि किती …Read more »
सावरकरांची उडी, नव्हे — भारतीय स्वातंत्र्याची गुढी!
आज ८ जुलै. आजच्याच दिवशी स्वा. सावरकरांनी मार्सेल्स बंदरात ती त्रिखंड गाजविणारी जगप्रसिद्ध उडी ठोकली होती. आता काही टिनपाट लोक म्हणतात की, सावरकर ५ मिनिटंही पोहोले नसतील आणि ती उडी गाजलेली नव्हे तर गाजवलेली होती इ. काहीजण तर या उडी मारण्याच्या पराक्रमासाठी सावरकरांना पळपुटे म्हणण्याइतकी मजल मारतात! वास्तविक सावरकर किती वेळ पोहोले, हे महत्वाचं नाहीच आहे. त्या पोहोण्याचे परिणाम काय झाले हे महत्वाचे! आणि सावरकर फक्त पाचच मिनिटं पोहोले हे सांगायला सावरकरांचे जातीयवादी टीकाकारच कश्याला हवेत? सावरकर तुरुंगात असताना एका चीनी बंद्याने सावरकरांना अतिशय भक्तिभावाने विचारले होते, ‘महाराज आपण किती दिवस पोहत होता’? तर सावरकर शांतपणे उत्तरले होते, ‘दिवस कसले, …Read more »
शाहरुख नाचलाच पाहिजे!
देशाच्या पंतप्रधानाइतकं व्यस्त कुणी असू शकतं का हो? नाही ना! काल कै. मुंडेंच्या निधनाची बातमी समजल्यानंतर ताबडतोब पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदींनी सारे कार्यक्रम रद्द केले व राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. मात्र बहुतेक हिंदी सिनेमातला बोबडा नाच्या शाहरुख खान हा स्वत:ला पंतप्रधानांपेक्षाही मोठा समजत असावा. कारण या राष्ट्रीय दु:खाच्या प्रसंगी कार्यक्रम रद्द करणे तर दूरच, हा घरबुडव्या बंगालात ठुमके लावत होता – ममता बॅनर्जीसोबत! त्याला देशाच्या दु:खापेक्षा स्वत:च्या संघाच्या विजयाचा जास्त आनंद महत्वाचा वाटत होता. इतके दिवस शाहरुखनामक माकडसदृश प्राणी माझ्या भारत देशात राहातो, याची लाज वाटायची. काल मला त्याची लाज नाही, घृणा वाटली – घृणा! एखाद्या सडलेल्या मांसाच्या तुकड्याची …Read more »
RIP नव्हे, ‘सद्गती’ म्हणा!!
कुणी व्यक्ती गेली की सोशल मिडियावर श्रद्धांजलीचे सत्रच सुरू होते. त्यातही हल्ली आपल्या भावना एवढ्या काही स्वस्त झाल्या आहेत की, आपल्याला Rest In Peace एवढे ३ शब्दही टंकित करण्याची तसदी घ्यावीशी वाटत नाही, अथवा तितका वेळ नसतो. त्यामुळे मंडळी थोडक्यात RIP लिहून मोकळी होतात! याच RIP संदर्भात काही गोष्टी स्पष्ट करणे आवश्यक वाटते. पाहा पटतात का — १) RIP अर्थात Rest In Peace चा शब्दशः अर्थ होतो – ‘(शरीर) शांततेत आराम करो’. आपण तो शब्द इतक्या काही सहजपणे वापरतो की, त्याचा अर्थ तरी आपल्याला समजतो की नाही असा प्रश्न पडावा. ही मुळात ख्रिश्चन संकल्पना आहे मित्रांनो. त्यांच्यात शरीरालाच सारे महत्व …Read more »
ब्राझीलच्या कार्निव्हलमध्ये शिवशंभो — एक नवी सुरुवात?
भारत देश किती जरी दांभिक-धर्मनिरपेक्षतेच्या गाळात रुतत असला, तरीही शेष जग कसे हळुहळू परंतू निश्चितपणे हिंदू धर्म, संस्कृती आणि हिंदुत्वाकडे आकर्षित होते आहे, याची अनेक उदाहरणे मी सातत्याने देत असतो. मग तो लिसा मिलर या अमेरिकन विदुषीचा “We Are All Hindus Now” हा अमेरिकेचे हिंदुत्वाकडे वाढते आकर्षण साधार सांगणारा लेख असो (लिंक: http://www.thedailybeast.com/newsweek/2009/08/14/we-are-all-hindus-now.html) वा कोस्टारिका देशाने पाडलेले श्रीगणेशाचे सुंदर नाणे असो वा घाना या आफ्रिकन देशात प्रतिवर्षी वाढत जाणारा गणेशोत्सवाचा प्रभाव असो (लिंक: http://www.patheos.com/blogs/drishtikone/2013/09/hinduism-growing-in-africa-without-proselytizing/) वा अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये सातत्याने चर्चेसचे मंदिरांमध्ये होत असलेले रुपांतर असो (लिंक: http://vikramedke.com/blog/churches-chi-hotayat-mandire-chahul-badalatya-pravahachi/) वा कॅलिफोर्नियात साजरा होणारा हिंदू-मास असो (लिंक: http://www.hafsite.org/CA_Declares_Oct_Hindu_American_Month) वा अन्य काही! आजही …Read more »
विस्मृतीत गेलेली त्रिमूर्ती
आज १९ डिसेंबर. १९२७ साली याच दिवशी पं. रामप्रसाद “बिस्मिल”, अशफाकउल्लाह खान “हसरत” आणि ठाकूर रोशनसिंह यांना फाशी देण्यात आली होती. तीन जीव हुतात्मा झाले होते. दुर्दैवाने क्रमिक पुस्तकांतून राजकीय हेतूंनी प्रेरित इतिहास शिकलेल्या आम्हाला, चार-दोन अहिंसक राजकारणी सोडल्यास, मातृभूमीसाठी प्राणांचीही बाजी लावणारे अन्य हुतात्मे माहितीदेखील नसतात. त्यामुळे उपरोक्त तिघांबद्दल थोडक्यात सांगतो, जेणेकरून वाचकांना त्यांची माहिती व्हावी व या देशभक्तांचा अधिक अभ्यास करण्याची प्रेरणा मिळावी.. १) आर्यसमाजी असलेले पं. रामप्रसाद बिस्मिल हे कट्टर हिंदुत्ववादी. शुद्धीकार्यात अग्रेसर. बाणेदारपणा तर असा की, फाशीपूर्व खटला चालू असताना एकदा त्यांचा उल्लेख “मुलजिम” (आरोपी) ऐवजी चुकून “मुलाजिम” (नोकर) असा झाला तर या पठ्ठ्याने थेट न्यायाधिशाला …Read more »
अभिव्यक्तीस्वातंत्र्य असेही..!
गिरीश कर्नाड ही व्यक्ती तर आपणा सर्वांना माहितीच असेल. ते लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत. अभिनेतेही आहेत. परंतू एवढीच एक ओळख नाहीये त्यांची. या सगळ्यासोबतच श्री. कर्नाड हे सेक्युलॅरिझमच्या भारतीय आवृत्तीचे मूर्तीमंत प्रतीकही आहेत! मग त्यासाठी ते विविध मंचांवरून हिंदूत्वविरोधी वक्तव्ये (बऱ्याचदा प्रसंग सोडून!! आठवा काही महिन्यांपूर्वी व्हि. एस. नायपॉल यांच्यावर त्यांनी केलेली टिका!) करीत असतात. मराठा साम्राज्याच्या शूर पेशव्यांना कित्येकदा पाठ दाखवून पळालेल्या जिहादी टिपूचे समर्थन करत असतात. त्यांना तुघलकही आवडतो म्हणे! मागील वर्षी तर या महानुभावांनी कमालच केली. जयपूरच्या साहित्य महोत्सवात त्यांनी भारतरत्न रवींद्रनाथ ठाकूरांचा उल्लेख “एक थर्डक्लास नाटककार” असा केला. त्यावरून बरेच वादळही उठले होते. कर्नाडांनी त्यावेळी स्वत:च्या …Read more »
Categories
- A R Rahman (17)
- Bajirao (5)
- Bhagavad Geeta (5)
- Books (5)
- Cinema (59)
- Comics (3)
- Hindutva (42)
- History (53)
- Music (11)
- Poetry (55)
- Politics (52)
- Pravaas Chitre (3)
- Ramayana (9)
- Reviews (64)
- Savarkar Katha (3)
- Sawarkar (7)
- TV (27)
- Uncategorized (18)
- Vaidik Knowledge (18)
- कथा (12)
- स्फुट लेख (29)
Featured Downloads
- Akashwani Interview On Swami Vivekanand (2072 downloads)
- An_Interesting_Interview (1746 downloads)
- Bhagwan_Parshurama (1869 downloads)
- Interview-of-Shri.-Vikram-Edke-on-Swami-Vivekananda (1424 downloads)
- Interview_on_Bhagatsingh_Rajguru_Sukhdeo (1678 downloads)
- Parashuram Speech (2544 downloads)
- Raja Shivachhatrapati Speech (2316 downloads)
- Sawarkar Ani Dalitanche Shalapravesh Aandolan (1568 downloads)
- Sawarkaranvaril Aakshepanche Khandan (1988 downloads)
- Tarunansamoril_Aahwane_ani_Swami_Vivekananda (1377 downloads)
Menu
Recent Posts
- A Masterclass In Paradox July 25, 2023
- दक्षिणपंथी – यातिसई June 17, 2023
- अर्धवट शिजलेली थाळी – पोन्नियिन सेल्वन २ May 4, 2023
- गेमसारखाच – टेट्रिस! April 9, 2023
- रावणाचं फर्स्ट इम्प्रेशन! October 3, 2022
- मर्यादांमध्ये अडकून पडलेला – पोन्नियिन सेल्वन: १ October 1, 2022
- टबू – असंतांची गोष्ट September 10, 2022
- मार्मिक भाष्याने समृद्ध – बिफॉरेनर्स May 10, 2022
- आरआरआर — भारताची कथा भारताच्या भाषेत जगाला सप्रेम! March 28, 2022