एका पेटंटची गोष्ट

आज आपण अगदी सहजपणे मोबाईल, रेडिओ इ. साधने वापरतो. परंतु या सर्व ‘बिनतारी संदेशवहना’चा (Wireless Telecommunication) शोध कुणी लावलाय माहितीये का? हा शोध लावणारी व्यक्ती एक भारतीय आहे, नव्हे आपल्या सर्वांच्या परिचयाचीदेखील आहे! त्यांचं नाव आहे, आचार्य जगदिशचंद्र बसू (१८५८-१९३७)!! होय, ‘वनस्पतींनाही जीव असतो’ ही हिंदूधर्मातील संकल्पना वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करणारे व त्या तत्त्वावर आधारित ‘क्रेसोग्राफ’ या यंत्राची निर्मिती करणारे प्रा. जगदिशचंद्र बसू!! ते नुसते वनस्पतीशास्त्रज्ञच नव्हते, तर भौतिकशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, पुरातत्त्वविद, आणि विज्ञानकथालेखकदेखील होते! एवढेच कश्याला, आज वापरात असलेल्या ‘रेडिओ’च्या निर्मितीचेही श्रेय प्रा. बसू यांनाच दिले जाते, हे सर्वच वैज्ञानिक प्रगतीसाठी पाश्चिमात्यांकडे आस लावून पाहाणाऱ्या भारतीयांच्या गावीही नसेल! मग चंद्रावरील एका …Read more »

आत्मबोध

‘धप्प’ असा जोरदार आवाज झाला आणि अरुळसामीने आवाजाच्या दिशेने पाहिले. काय घडले, हे लक्षात यायला क्षणभरही नाही लागला त्याला.लागलीच बोंब ठोकली त्याने! त्याचा आवाज ऐकून बघता-बघता इतर नावाडीही आसपास जमा झाले त्याच्या. “काय झालं रं बोंबलायला”, एकाने विचारलं! “त्यो.. त्यो सन्याशी.. त्यो मला दर्यापारच्या फत्तरावर न्हे म्हनत हुता.. त्यानी समिंदरात उडी मारलीन् ना..” कुणाला काहीच लक्षात येईना हा काय सांगतोय ते. मग पुन्हा पुन्हा खोदून विचारल्यावर तुकड्या तुकड्यांनी माहिती हाती लागू लागली ती अशी की, एक कुणीतरी सन्यासी, ‘पलिकडे श्रीपादशिलेवर पोहोचवशील का’, असं विचारत नावाडी अरुळसामीकडे आला होता. हे तर अरुळसामीचे रोजचेच काम! त्याने ताबडतोब नेण्या-आणण्याचा दर सांगितला. सन्याश्याकडे तर …Read more »

विरलेल्या काठाचे सुंदर रेशमी वस्त्र : लोकमान्य – एक युगपुरुष

ज्यावेळी कुणी एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वावर कादंबरी लिहायला घेतो, त्यावेळी लेखकाला पृष्ठसंख्येचं जराही बंधन नसतं. त्यामुळे लेखक त्याला हवी तितकी पाने लिहू शकतो. मग त्या कादंबरीत कधी चरित्रनायकाचं संपूर्ण आयुष्य चितारलं जातं, तर कधी त्याचा काही भाग तेवढा रंगवला जातो. परंतु चित्रपटाची तशी परिस्थिती नसते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, चित्रपटाला वेळेचं बंधन असतं. एका विविक्षित वेळेतच, प्रेक्षकांना सलगपणे पाहाताना कंटाळा येणार नाही; अश्या बेताने चरित्रपट बनवायचा असतो. मग त्यात नायकाचं संपूर्ण आयुष्य दाखवायचं म्हटलं तरी दाखवता येत नाही. काही विशिष्ट घटनांवरच तेवढा भर द्यावा लागतो व दृक्माध्यमाच्या दृष्टीने अनावश्यक असलेले तपशील हे टाळावेच लागतात. माझ्या मते, चरित्रपटांचं खरं कार्य हे निवडलेलं …Read more »

व्यासांची विज्ञानकथा

भगवान परशुरामांवर जाहीर व्याख्याने देणारा मी महाराष्ट्रातील बहुतेक एकमेव वक्ता असेन. ही व्याख्यानेदेखील मी पारंपरिक भक्तिचरित्रात्मक ढंगाने देत नाही; उलट परशुरामांच्या चरित्राचे सामाजिक क्रांतिकारक, मुत्सद्दी राजकारणी इ. आजवर फारसे कुणाला माहिती नसलेले पैलू उलगडून विस्ताराने सांगत असतो. त्या ओघात खूप साऱ्या राजवंशांचे व ऋषिवंशांचे सविस्तर वर्णन येते. विशेषतः परशुरामांच्या भार्गववंशीय पूर्वजांच्या कथा येतात. त्यादेखील मी विस्ताराने सांगतो. हेतू हा की, लोकांना समजावे – ज्याकाळात इतर तथाकथित संस्कृतींना लज्जारक्षणासाठी वल्कले गुंडाळण्याचीदेखील अक्कल नव्हती आली, त्याकाळापासून भारत देश हा नुसता प्रगतच नव्हता तर आपल्याकडील थोर पुरुषांच्या व्यवस्थित वंशावळी राखण्याइतका काटेकोरदेखील होता. बायबलमध्येही अश्या वंशावळी येतात, मात्र काही अपवाद वगळता त्यांच्यामध्ये सर्वत्र परस्परविसंगतीच …Read more »

विक्रमवीर ‘विक्रम’!!

आपल्यापैकी प्रत्येकाचे स्वप्न असते, कधीकाळी आपणही चित्रपटात ‘हिरो’ व्हावं. दररोज शेकडो लोक हे स्वप्न उराशी बाळगून मायानगरी गाठतात आणि दररोज लाखो स्वप्ने चक्काचूर होतात! साठच्या दशकात तमिळनाडूतल्या व्हिक्टर अल्बर्टने हेच स्वप्न उराशी बाळगत चेन्नईची मायानगरी गाठली होती. खरं तर मायानगरी वाटते तितकी निर्दयी नाही. इथे प्रत्येकाला काही ना काही काम मिळते. व्हिक्टरलाही मिळाले! मात्र तुम्ही किती का मोठ्या स्टारचे का बेटे असेनात, इथे टिकतात केवळ प्रतिभा आणि कष्टांचा अजोड मिलाफ असलेलेच! व्हिक्टर कष्टाळू होता, पण ना त्याच्याकडे प्रतिभा होती ना तंत्रशुद्धता. त्यामुळे लहानसहान भूमिकांवरच त्याला समाधान मानावे लागले. सखोल ज्ञानाअभावी वडलांची झालेली फरपट केनेडी विनोदराज या व्हिक्टरच्या लहानग्या मुलाने केव्हाच …Read more »

माझ्या मना..

सकाळचा हिंसाचार सायंकाळच्या तांडवापुढे क्षुल्लक वाटू लागतो उद्दाम अनौरस अंधार तेवढा रात्रंदिन जागतो अरे अंधारातच तर जगायचंय आपल्याला, कारण उजेडासाठी गरजेची असते आग! तेव्हा माझ्या मना स्वस्थ राहा, येऊ देऊ नकोस राग!! आग लागण्यासाठी जाळावा लागतो जीव आणि षंढा, तुला तर नुसत्या विचारानेच भरते हीव त्यापेक्षा सोपे मेणबत्ती जाळणे, निरुपद्रवी जिची आग! माझ्या मना स्वस्थ राहा, येऊ देऊ नकोस राग!! ते येतात मुडदे पाडतात, आणि आम्ही पाडतो मुद्दे ‘दहशतवादाला धर्म नसतोच मुळी’, मग कितीही बसू देत गुद्दे गुद्दे खा, मस्त राहा, फारफार तर बन सेक्युलरी नाग! माझ्या मना स्वस्थ राहा, येऊ देऊ नकोस राग!! अरे मृत्यू कुणाला चुकलाय, मग त्यांनी …Read more »

डोवालसाहेबांच्या भाषणातले कटू तात्पर्य

हिंदुस्थानचे राष्ट्रीयसुरक्षा-सुमंत (‘सल्लागार’ या अरबी-उद्भव शब्दासाठी मी योजलेला संस्कृतनिष्ठ मराठी शब्द. एकतर शिवकालीन इतिहासामुळे ‘सुमंत’ सर्वांना माहिती आहे आणि शिवाय तो उपयोजण्यास सोपाही आहे! मूळ रामायणकालीन संस्कृत शब्द आहे ‘सुमंत्र’ अर्थात ‘चांगले सुचविणारा’!) श्री. अजित डोवाल यांनी तब्बल ७ वर्षे पाकिस्तानात हेरगिरी करत काढली आहेत. काही दिवसांपूर्वी ‘विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशन’च्या कार्यक्रमात सहभागी झाले असताना श्री. डोवाल यांनी स्वतःच एक अनुभव सांगितला होता. मला तो मोठा अर्थपूर्ण वाटल्यामुळे येथे सांगतोय. डोवालसाहेब पाकिस्तानात असताना मुसलमानवेष करून राहायचे. लाहौरला (प्रभू श्रीरामांचे सुपुत्र ‘लव’ यांच्या नावावरून असलेले मूळ हिंदू नाव ‘लवपूर’) एक मोठी ‘मज़ार’ आहे. तिथे ते एकदा गेले. धार्मिक विधी करीत असताना त्यांना …Read more »

मंथन

उठता ज्वार एवं गिरते रत्न मैं ज्येष्ठ या तू कनिष्ठ – हठधर्मी प्रयत्न कभी मदिरा का नि:सारण तो कभी मदिराक्षी का उत्थान जो अधिक से अधिक समेटें, बस वोही महान विचार ये अभेद्य है, हारा सो दैत्य है मेरूसे लिपटा वासुकी किन्तु, क्षरता सुनित्य है कौई पचाएगा हालाहल और कौई अमृत पाएगा नींवमें स्थापित कूर्म, पिसता है पिसता जाएगा लक्ष्मी वरेगी उसीको जिसके गलेमें तुलसीहार है देव निश्चिंत है की उनका पक्षधर अमृत-कहार है न्याय क्या अन्याय क्या, सब दृष्टी का भेद है कहा ले जा रहा है ये मंथन सबको, सोचा तो खेद है! सोचा तो खेद है!! — …Read more »

समयके मुडे पन्नोंपर..!

भोर मल रही थी आँखे उस वक़्त और रात बस सोनेही वाली थी परसोंकी तरह उसकी खिडकी कल और आज भी खाली थी वो खिडक़ी चार आँखोंके जहा रोज़ पेंच लडा करते थे उडते अरबी घोडें जहापर पैनी नज़रोंसे अडा करते थे वो पानी डालती थी तुलसी को तो प्यास मुसाफिरको लग जाती थी ताज़ा नहाये बाल झटकाती वो सैंकडों बारिशें छूट जाती थी वो झुका लेती थी फिर पल्कें जब वो आँखोंसे सलाम अद़ा करता साथ चलनेका तो ना सही कभी हाँ, पर निभानेका वादा  करता फिर जाने लगता था जब वो, वो नज़रोंके ताबीज़ बुना करती थी उससे …Read more »

नरकचतुर्दशीच्या निमित्ताने

व्याख्यानांच्या निमित्ताने प्रवास करताना मनुष्यस्वभावाचे अनेक नमुने पाहावयास मिळतात. वाईट कुणीच नसतं. केवळ व्यक्ती तितक्या प्रकृती एवढंच! असाच एके ठिकाणी गेलो असता, एक बाई भेटल्या. प्रचंड स्त्रीवादी! पितृसत्ताक पद्धती झुगारून समानता मागता मागता हल्लीच्या बहुतांश स्त्रीवादी बायका जश्या नकळत ‘स्त्रीवर्चस्वाचा’ टोकाचा आग्रह धरतात ना, अगदी तश्या! बोलताना त्यांच्या तोंडी एका दमात तस्लिमा नसरीनपासून ते शोभा देपर्यंत एकाहून एक नावे येत होती. स्त्रीवर किती अत्याचार होतात आणि तिने त्यापासून कशी सुटका करून घेतली पाहिजे, हाच एक धोशा. बाईंचा नवरा अजून या जगात तग धरून आहे का आणि असल्यास अश्या प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची जिद्द त्या महानुभावाने कशी कमावली, हे विचारण्याचा मला वारंवार …Read more »

Vikram Edke’s Lyrics in ‘Rotaract CHANGE Anthem’

"खलाओंको छाना हैं, हमने सुरजको थामा हैं!

हैं पता के जल जायेंगे, लेकिन सवेरा लाना हैं!!

खुदपे पूरा भरोसा करके, पावोंपे खड़े हम डटके,

अब भले चाहे तूफाँ आये, हम हैं तैय्यार!

हम तो हैं 'नचिकेता'की तरहा, हर 'प्रेयस'को आग लगाते,

और 'श्रेयस'की राहपे चलके, देते फूल लेते हैं कांटे!!

खलाओंको छाना हैं, हमने सुरजको थामा हैं!

हैं पता के जल जायेंगे, लेकिन सवेरा लाना हैं!!"

- विक्रम एडके ( हिंदी गीतांकन )