अनाठायी टीका नकोच!!

समजा आपल्या देशाने एखादा जिहादी आतंकवादी पकडला. त्याची रोज चौकशीही होतेय. तो रोज त्याच्या थोड्या थोड्या साथीदारांची नावेही सांगतोय. परंतु तरीही चौकशी पूर्ण होण्याच्या आत शासन त्या लोकांची नावं जाहीर करतं का हो? नाही करत! का? अहो कारण सोप्पं आहे. अर्धवट माहितीच्या आधारे नावं जाहीर केली, तर तो ज्यांची नावे घेणार आहे ते अपराधी सावध नाही का होणार! जिथे मोठ्ठा समूह हाती लागण्याची शक्यता आहे, तिथे चार-दोन छोटे मासे पकडून समाधान मानावं लागेल. त्यामुळे कोणतंही शासन अशी नावं चौकशीच्या दरम्यान जाहीर करत नाही. किंबहूना कुणाची चौकशी चाललीये आणि ती कोणत्या दिशेने चाललीये, हेही सांगितलं जात नाही. हे झालं जरासं अवघड …Read more »

पहिले ते ‘हरिकथानिरुपण’, दुसरे ते ‘राजकारण’!!

प्रभू रामचंद्रांनी जेव्हा सीतामाईचा परित्याग केला, तेव्हा त्या बिचाऱ्या ऋषी वाल्मिकींकडे आश्रयासाठी राहिल्या. वाल्मिकींनी जाणले की, राजाचे कर्तव्य म्हणून श्रीरामांना सीतेचा त्याग करणे आवश्यकच होते, परंतू त्यापोटी सीतेवर झालेला अन्यायही अस्वस्थ करून सोडणारा होता. वाल्मिकींनी सीतेला ठेवून घेतले. लव-कुशांचा जन्म झाला. त्यांचेही वाल्मिकींनी यथासांग संगोपन-शिक्षण केले. त्यांना ‘रामायण’ शिकवले. आणि योग्य वेळ येताच श्रीरामांच्या राज्यातील यज्ञाचे निमित्त करून दोन्हीही पोरांना तिकडे रामकथा गाण्यासाठी पाठवले. दोन गोजिरवाणी पोरं! अयोध्येत सगळीकडे फिरायची. चौका-चौकात, पारा-पारांवर अस्खलित संस्कृतमध्ये रामकथा गायची. लोक भावविभोर व्हायचे. मंत्रमुग्ध व्हायचे. नकळत ही दोन्ही पोरं कित्ती रामासारखी दिसतात, अशी तुलनाही सुरू व्हायची त्यांच्या मनांत! मात्र वाल्मिकींनी सक्त ताकीद दिली होती …Read more »

एकट्या ‘भाजप’चीच खिल्ली का उडवली जाते?

मित्रांना प्रश्न पडतो की केवळ ‘महाराष्ट्र भाजप’चीच (महाराष्ट्र हा शब्द महत्वाचा!) खिल्ली का उडवली जातेय सगळीकडे? अहो साधी गोष्ट आहे. लोकांच्या मनात काँग्रेस-राष्ट्रवादीविषयी इतका काही प्रचंड राग आहे की, त्यांच्याबद्दल बोलायची सुद्धा लोकांची इच्छा नाहीये. त्यांना साफ झोपवायचं, हे तर पक्कंच ठरलंय! उरले कोण, तर शिवसेना आणि भाजप. त्यांपैकी ज्या शिवसेनेशी भाजपने २५ वर्षे घरोबा केला, ती शिवसेना म्हणजे ‘गुंडांचा पक्ष’ असल्याचा महाराष्ट्र-भाजपला अचानकच साक्षात्कार झालाय. त्यांच्याबद्दल काय बोलायचं मग? उरला भाजप!! त्यांना ना महाराष्ट्रात चेहरा ना व्हिजन. बहुमत मिळालं तर मुख्यमंत्रीपदासाठी खुर्चीच्या ऐवजी सोफा ठेवावा लागतो की काय असे वाटण्याइतपत त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे इच्छुक. असेना का. राजकारणात पदाची इच्छा अवश्य …Read more »

दुंदुभी निनादल्या.. नौबती कडाडल्या..!!

अगदी साधा हिशोब करुयात. महाराष्ट्राच्या राजकारणातील युती आणि आघाड्यांचे पर्व तर सध्या संपले. तेव्हा यावेळी पंचरंगी लढत होणार हे नि:संशय. यातून कोणतातरी एकच पक्ष सर्वाधिक जागा मिळवणारा ठरेल हेही निश्चित. मात्र समविचारी (‘विचारी’ शब्द लिहितानाही खरे तर लाज वाटतेय!) पक्ष एकमेकांची मते खाणार, त्यामुळे कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची सुतराम शक्यता नाही. सध्याची काँग्रेस-आघाडीविरोधी लाट पाहाता त्यांच्यापैकी कोणताही पक्ष सर्वाधिक जागा जिंकणार नाही, हेही नक्की. तेव्हा सर्वांत मोठा पक्ष एकतर शिवसेना तरी असणार वा भाजप तरी! मला वाटते, इथपर्यंत कुणाचेच दुमत नसेल. क्षणभर गृहित धरू की, भाजपला सर्वाधिक जागा मिळतील. अश्यावेळी भाजपला पुन्हा एकवार कुणासोबत तरी युती करणे भागच …Read more »

Gurupaurnima

Dear A.R. Rahman – You were there when no one was When everyone is there, you still are Shadows leave, you do not Every moment teaching me a lot When I cry, you wipe out my tears You hold my hand, when strike out fears Your are a boat, sailing me through the Bhava-Saagar You not merely entertain, spiritually uplifts me rather You are the one who always give me a smile Which I wear everyday & walk another mile Dear A.R. Rahman, you are a Sad-Guru for me. Always keeping me on the right path & keeping my Vivek …Read more »

तुम्हाला पुरोगामी व्हायचंय का? सोप्पं आहे!!

हल्लीच्या जगात ‘श्वास घेण्या’पेक्षाही सोपी गोष्ट कोणती झालीये माहितीये? ‘पुरोगामी होणे’!! त्यासाठी काय करायचं? काहीच नाही, जाणून-बुजून सातत्याने हिंदूंना अपमानास्पद वाटेल असं वागत राहायचं, की ठरलातच तुम्ही पुरोगामी! मग यात सरळसरळ तुमचा ढोंगीपणा दिसला तरीही चालेल. कारण तुम्हाला काहीच करावं लागत नाही. हे मूर्ख हिंदूच ‘तुमचा ढोंगीपणा हा कसा तुमचा ढोंगीपणा नसून प्रामाणिकपणा आहे’ हे जीवाच्या आकांताने सांगायला पुढे येतात. अहो उलट तुम्ही जितका जास्त ढोंगीपणा कराल तितकी वरची पुरोगामी श्रेणी मिळेल तुम्हाला. म्हणजे थोडासा ढोंगीपणा केला की – ‘विवेकवादी’, त्याहून अधिक केला की – ‘पुरोगामी’आणि आणि ढोंगीपणाची कमाल मर्यादा गाठली की – ‘भारतीय सेक्युलर’!! आणि हे सारं अगदी सोप्पं …Read more »

लोकमान्यांना शंभर वर्षांनंतर लाभलेला शिष्य!!

मोहनदास गांधी जेव्हा आफ्रिकेतून भारतात परतले होते आणि येथील विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते, तेव्हा आपल्या या प्रवासात ते लोकमान्य टिळकांनाही भेटले होते. भेट संपली. गांधी निघून गेले. ते जाताच लोकमान्य आपल्या सहकाऱ्यांकडे वळून म्हणाले, “हा माणूस पक्का बनिया दिसतोय. बोट दिलं तर हातच ताब्यात घेईल. याला दूर लोटू नका, पण फार जवळदेखील करू नका. नाहीतर हा विकून खाईल सगळ्यांना”. अर्थातच टिळकयुगाच्या अस्तानंतर लोकमान्यांचा हा मुत्सद्दी सल्ला कुणीच मानला नाही. हळूहळू सारी काँग्रेसच गांधींच्या कह्यात गेली. त्यातून पुढे काय काय रामायणे घडली आणि देशाला त्याचे काय काय परिणाम भोगावे लागले, हा एक वेगळाच विषय आहे. मात्र मला आज एक असा …Read more »

याद हैं..?

रात-रात जागकर हम चाँद काटा करते थे! याद हैं? और अमावसको जब वो फ़नाह हो जाता, तो तारे बाँटा करते थे!! मैं ख्वाबोंसे भरता था माँग, तुम मुझमें सिमटा करती थी! मैं हार जाता था बाज़ी, और दोनों जीता करते थे!! तुम तो चली गयी बाज़ी आधी छोडके.. बस मैं बचा हूँ, रात बची हैं, और हाँ, चाँदभी तो बाक़ी हैं फ़लकपे.. अधकटा! वोही चाँद, जिसकी छाँवतले ज़िंदगीभर साथ निभानेका वादा किया था तुमने..! याद हैं? – © विक्रम श्रीराम एडके. (www.vikramedke.com)

ढूँढता रहता हूँ..!!

रातें ऊब जाती हैं अँधेरोंसे दिन जल जाते हैं सवेरोंसे मैं ढूँढता रहता हूँ तुझको पिया बुझती राख़के ढेरोंसे!! इक सुरंगसी बनी हैं मौनकी जीस्त निगला करती हैं इक चाँद दुभंगता रहता हैं तारोंके बिखरे डेरोंसे!! वो खिडकीभी अब उजड गयी हैं जहा तेरी ज़ुल्फोंमें शामें अटका करती थी बस घौंसलेके उडते हैं तिनके खाली पडे मुण्डेरोंसे!! रातें ऊब जाती हैं अधेरोंसे दिन जल जाते हैं सवेरोंसे मैं ढूँढता रहता हूँ तुझको पिया बुझती राख़के ढेरोंसे!! – © विक्रम श्रीराम एडके. (www.vikramedke.com)

अनुच्छेद ३७० : दशा आणि दिशा

“अनुच्छेद 370: दशा आणि दिशा” (साप्ताहिक विवेक, दि. २९ जून ते ५ जुलैच्या अंकात प्रकाशित झालेला लेख.) केंद्रामध्ये भाजपा आणि  राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांना स्पष्ट बहुमत मिळाल्यापासून अनुच्छेद 370चा मुद्दा पुन्हा एकवार जोर पकडू लागला आहे. तसा हा मुद्दा सुरुवातीपासूनच विवादित. त्यातून या अनुच्छेदाला विरोध करणारे सरकार अस्तित्वात आल्यापासून तर हे अनुच्छेद रद्द करावे, अशी जोरदार मागणी होणे साहजिकच होते. ही मागणी जितकी तीव्रतेने होऊ लागली, तितक्याच तीव्रतेने या अनुच्छेदाच्या पाठीराख्यांनी विरोधही सुरू केला आहे. गंमत म्हणजे या दोन्हीही बाजू आपापले म्हणणे मांडण्यासाठी हाती असलेल्या सर्व माध्यमांचा – मुख्यत्वेकरून नव्यानेच लोकप्रिय झालेल्या फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप इ. सोशल मीडियाचा – पुरेपूर …Read more »

Vikram Edke’s Lyrics in ‘Rotaract CHANGE Anthem’

"खलाओंको छाना हैं, हमने सुरजको थामा हैं!

हैं पता के जल जायेंगे, लेकिन सवेरा लाना हैं!!

खुदपे पूरा भरोसा करके, पावोंपे खड़े हम डटके,

अब भले चाहे तूफाँ आये, हम हैं तैय्यार!

हम तो हैं 'नचिकेता'की तरहा, हर 'प्रेयस'को आग लगाते,

और 'श्रेयस'की राहपे चलके, देते फूल लेते हैं कांटे!!

खलाओंको छाना हैं, हमने सुरजको थामा हैं!

हैं पता के जल जायेंगे, लेकिन सवेरा लाना हैं!!"

- विक्रम एडके ( हिंदी गीतांकन )