
उदगमंडलमच्या मार्गावर आट्टप्पाडीच्या जंगलासमीप एक कार थांबवली जाते. ट्रॅफिक पोलिस, अबकारी खाते आणि पोलिस दल यांचं नेहमीचंच जॉईंट ऑपरेशन असतं ते. तो सबंध भाग दारुमुक्त म्हणून घोषित केलाय. नेमकं याच कारमध्ये दारुच्या एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल बारा बाटल्या सापडतात. कारचा दरवाजा उघडताना आत दारू पिऊन लास झालेला माजी सैनिक कोशी कुरियन (पृथ्वीराज सुकुमारन) खाली पडतो. आधीच गरम डोक्याचा त्यात दारू प्यायलेला कोशी त्या तिन्ही सुरक्षादलाच्या लोकांसोबत भांडू लागतो. पोलिसांच्या गाडीचा हेडलाईट फोडतो तो. कोशीच्या अंगात रग आहे. सगळ्यांना मिळून एकत्रितपणेसुद्धा आवरत नाही तो. ते पाहून पीआय अय्यप्पन नायर (बिजू मेनन) गाडीतून खाली उतरतो आणि कोशीच्या खाडकन मुस्काडात लावतो. …Read more »