Category Archives: Reviews

हवीहवीशी वाटणारी लबाडी – व्हाईट कॉलर

थेटपणे खून करणारे, हिंसा करणारे अपराधी तर घातक असतातच, पण त्याहून शतपटींनी घातक असतात ते तुमच्यातच राहून, तुमचा विश्वास संपादन करून गंडवणारे! पहिल्या प्रकारचे लोक तुमचे शारीरिक आणि आर्थिक नुकसान करतात. पण दुसऱ्या प्रकारचे लोक तुमच्या विश्वासाला कधीही भरून न येणारा तडा देऊन जातात. हे पांढरपेशा अपराधी कधी लाचखोर शासकीय अधिकारी बनून व्यवस्थेचा भाग असतात तर कधी व्यवस्थेलाच नाकारणारे अराजकवादी. त्यांची रुपं अनेक आहेत, त्यांचे मार्ग अनंत आहेत. साधर्म्य जर काही असेल, तर केवळ त्यांची ओरबाडण्याची, आपल्या मालकीच्या नसलेल्या वस्तू हिरावण्याची वृत्ती! या पांढरपेशा अपराध्यांना तथा व्हाईट कॉलर क्रिमिनल्सना रोखण्यासाठी एफबीआयची एक स्वतंत्र शाखा आहे. या शाखेत धडाडीचा स्पेशल एजंट …Read more »

रेज़्ड बाय वुल्व्ह्ज़

असं म्हणतात, जेव्हा प्रलयाची घडी आली तेव्हा वैवस्वत मनूने एक नौका उभारून सबंध जीवसृष्टी नव्याने वसवली. अशीच कथा थोड्याफार फरकाने अब्राहमिक पंथांत नोहाचीदेखील आहे. बायबलमधील अॅडम, ईव्ह आणि सापाची कथादेखील प्रसिद्धच आहे. या सगळ्या पौराणिक कथा. नव्या युगाचा आरंभ आपापल्या परीने सांगणाऱ्या. पण खरोखरीच जीवसृष्टीला अशी पैलतीरी नेण्याची जबाबदारी येऊन पडली तर, कुणी आधुनिक मनू ती कशी पेलेल? त्याची नौका अथवा आर्क कोणत्या स्वरुपाचे असेल? त्यातून निर्माण होणारी नवी सृष्टी तरी कशा प्रकारची असेल? धर्माच्या अभ्यासकांना पडणाऱ्या या प्रश्नांचं उत्तर वैज्ञानिक नाट्यातून शोधण्याचा प्रयत्न म्हणजे रिडली स्कॉटची एचबीओ मॅक्सवरील नवीकोरी मालिका, ‘रेज़्ड बाय वुल्व्ह्ज़’! बावीसावं शतक निम्मं सरलंय. पृथ्वीवर एक …Read more »

शब्दांत न मावणारी — बॉडीगार्ड

मी अनेक चित्रपटांबद्दल लिहितो. गेल्या काही वर्षांपासून मला आवडलेल्या मालिकांबद्दल देखील नियमितपणे लिहितो. अगदी “गेम ऑफ थ्रोन्स”सारख्या (२०११-१९) ७३ भागांच्या किंवा “पर्सन ऑफ इंटरेस्ट”सारख्या (२०११-१६) १०३ भागांच्या मालिकेबद्दलही मी भरभरून लिहिलंय. त्यांच्याबद्दल लिहिताना माझी लेखणी कुंठित झाल्यासारखी, अवरुद्ध झाल्यासारखी आजवर कधी एकदा सुद्धा वाटली नाही. परंतु आज मात्र माझी लेखणी एका अवघ्या ६ भागांच्या मालिकेपुढे थबकली आहे. चोवीस तास उलटून गेले मी ही मालिका पाहून, परंतु अजूनही मी लिहिताना शंभरदा खोडतोय. ती मालिका म्हणजे, बीबीसी-वनची “बॉडीगार्ड” (२०१८-)! डेव्हिड बड/बुड (रिचर्ड मॅडेन) हा भूतपूर्व सैनिक युद्धावरून जरी परतलेला असला, तरीही युद्धाच्या जखमा अद्यापही अंगावर आणि मनावर बाळगून आहे. तशातच त्याची निवड …Read more »

तृप्त करून सोडणारे पक्वान्न — एजंट साई श्रीनिवास आत्रेय

रॉबर्ट बोल्टन म्हणतो, “A belief is not merely an idea the mind possesses; it is an idea that possesses the mind”. आपल्या प्रत्येकाला रहस्यकथा वाचण्याची, त्या पडद्यावर घडताना पाहायची आवड असते. कित्येकदा तर पडद्यावर खरा खुनी कोण हे कळण्याच्या आतच आपण ते ओळखतो आणि मग नंतर मुख्य नायक आपलीच रीत वापरून जेव्हा ती केस सोडवतो, त्यावेळी एकाच वेळी आपल्याला आनंदही होतो आणि अभिमानही वाटतो. हीच गोष्ट जर लहानपणापासून घडत असेल, तर कोणत्या ना कोणत्या चोरट्या क्षणी आपणही गुप्तहेर व्हायचं ठरवूनच टाकलेलं असतं. पुढे शिक्षण, करिअरच्या धबडग्यात ते अर्थातच शक्य होत नाहीच म्हणा, पण ती फँटसी पहिल्या प्रेमासारखीच ह्रदयाच्या एका कुपीत …Read more »

ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिटेक्टिव्हची गोष्ट — मंक

मनोव्यापार हे असं गूढ आहे, जे जितकं सोडवू जाल तितकं जास्त भुलवतं. आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या वळणावर लहान किंवा मोठ्या स्वरूपाच्या मानसशास्त्रीय विकाराला सामोरं जावंच लागतं. त्या खेरीज आपण रोजच्या आयुष्यातही कित्येक प्रकारचे गंड, भिती वगैरे घेऊनच जगत असतो. पण जर एखाद्याला ३१२ प्रकारचे भयगंड असतील तर? त्याने काय करावं? कोणता व्यवसाय करावा? आणि भयगंड तरी कसले तर जंतू, टोकदार वस्तू, उंची, कोंदट जागा, अळिंबी, सुया, मृत्यू, साप, वीज, गर्दी, विमाने, मुंग्या, लहान बाळं, पक्षी, माश्या, पांघरूण, जहाज, पूल, मांजरं, गुहा, खडू, बदल, डांबर, ढग, खोकला, विदुषक, कुरळे केस, अंधार, डिकॅफ, वाळवंट, घाण, कुत्रे, ड्रायर, खेळणी, अंड्याचा बलक, …Read more »

मन आणि मेंदूला पौष्टिक खुराक — ईव्हल

‘प्रोसिजरल ड्रामा’ हा तसा टिव्ही मालिकांच्या इतिहासात अनादि-अनंत काळापासून चालत आलेला प्रकार. आपल्याकडेही ‘करमचंद’ (१९८५-२००७), ‘तहक़ीकात’ (१९९४-१९९५), ‘सुराग़’ (१९९९), ‘अदालत’ (२०१०-२०१६) अशा अनेक नावाजलेल्या मालिकांनी हा प्रकार गाजवलाय. पाश्चात्य, विशेषतः अमेरिकन आणि ब्रिटीश मालिकांमध्ये तर या प्रकारच्या मालिकांच्या अक्षरशः रांगाच लागल्या आहेत. त्यांच्यातही वेगळेपणा म्हणता म्हणता हळूहळू तोचतोचपणा येऊ लागला होता. खूप साऱ्या मालिकांनी या प्रकारात काहीतरी ट्विस्ट आणायचा प्रयत्न केला. पण मला सगळ्यांत जोरात ‘लागलेला’ ट्विस्ट जर कोणता असेल, तर तो होता ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’ (२०११-२०१६)! प्रोसिजरल ड्रामामध्ये साय-फाय, राजकारण, सामाजिक व्यवस्था आणि मानसशास्त्राचं इतकं अफलातून मिश्रण मी तरी कुठेच पाहिलं नाही. मी या मालिकेचा केवढा मोठा भक्त आहे, …Read more »

Prisoner Of Subtlety — Joker

Give a man some tragedy and you can make a hero out of him, but give him more and you might end up making a villain you never wished for. Todd Phillips’ “Joker” can be summed up in these two lines. The fact that this theme has played in a number of artistic expressions over several times gets diluted by the performances it commands. Though marketed as a psychological thriller, the tale is more of a psychological study that delves into the mind of Batman’s most celebrated antagonist ever. Arthur Fleck (Phoenix) is a struggling stand-up comedian. His struggle is …Read more »

साहवेना ‘साहो’

सध्या एका व्यक्तीचा व्हिडिओ खूप व्हायरल आहे. ती व्यक्ती मोठ्या ऐटीत पॅराग्लायडिंग करायला जाते, पण लगेचच आपली चूक त्याच्या लक्षात येते. मग जमिनीवर उतरेपर्यंत त्या व्यक्तीचं कळवळणं, स्वतःलाच शिव्या देणं सध्या सगळीकडे चर्चेचा विषय झालाय. नेमकं असंच मला आज चित्रपटगृहात वाटलं! पहिल्या दहाच मिनिटांत माझी अवस्था ‘भाई मुझे लंबी राईड नहीं करनी, सौ-दो सौ ज्यादा ले ले पर लँड करा दे’ झाली होती. त्या व्हिडिओतील व्यक्तीचे आडनाव ‘साहू’ निघावे आणि तशीच अवस्था करविणाऱ्या चित्रपटाचे नाव ‘साहो’ निघावे, हा काय दर्जाचा दैवदुर्विलास म्हणावा, देवच जाणे! एक आंतरराष्ट्रीय माफिया संघटना आहे. तिचा प्रमुख पृथ्वीराजने (टिनू आनंद) तिची सूत्रे रॉयला (जॅकी श्रॉफ) सोपवली. …Read more »

सुपरहिरो जॉनरवरील फ्रेश दृष्टीकोन : द बॉईज

अनेक जण आपापल्या क्षेत्रांत शिखरावर पोहोचतात, सेलिब्रिटी होतात. इतके की त्यांचे चाहते असलेले आपण त्यांचे भक्त कधी बनून जातो, समजतही नाही. त्यांची प्रत्येक गोष्ट मग आपल्याला आवडू लागते. त्यांच्या चांगल्या गोष्टींचं बेफाट कौतुक केलं जातं आणि त्यांच्या चुकांचं कधीकधी आडून तर कधीकधी उघडपणे समर्थनही केलं जातं. त्यांच्यावर असलेली चाहत्यांची भक्तीच त्यांना देवाच्या दर्जाप्रत नेते आणि खरा देव पाहिलेला नसला म्हणून काय झालं, या देवाच्या भेटीची आस चाहत्यांना लागून राहाते. भेट होईपर्यंत ठिक असतं, पण त्याहून अधिक परिचय समजा वाढत गेला तर बहुतांश वेळी हाती एकच गोष्ट लागते, ती म्हणजे मोहभंग! कारण, ओळख वाढत गेली की लक्षात येतं की, ती सुद्धा …Read more »

पर्सन ऑफ इंटरेस्ट

तुम्हाला असं कधी वाटतं का की, आपल्या सभोवताली जे जग आपण पाहातो त्याच्या दृश्य पातळीच्या आतसुद्धा खूप काहीतरी आहे? किंवा, आसपासचं जग जरी सारखंच वाटत असलं तरीही त्यात काहीतरी बदल झालाय आणि तो बदल मनाला जाणवतोय पण तरीही त्यावर बोट ठेवता येत नाहीये? हे आणि असे आपल्या अस्तित्वावर आणि स्थानावरच प्रश्न उपस्थित करणारे प्रश्न पडले की जन्माला येतात कारस्थानांचे सिद्धांत अर्थातच कॉन्स्पिरसी थियरीज. त्यातले बहुतांशी निरर्थक असतात, पण काही खरेसुद्धा असतात. एक विशिष्ट कारस्थानाचा सिद्धांत घेऊन त्या भोवती कथा गुंफणे काही नवीन नाही. परंतु याच घासून गुळगुळीत झालेल्या समीकरणाला जेव्हा ‘नोलन’ नावाचा चलांक येऊन मिळतो तेव्हा सारे बीजगणितच बदलून जाते, …Read more »