तुकडा तुकडा चंद्र..

रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी एकटाच जागताना तुला मागतो मी मला त्यागताना मोडतो डाव चांदण्यांचा अन् भान होते मंद्र रात्रीच्या कुपीत भरतो मी तेव्हा, तुकडा तुकडा चंद्र! डोकावले असतेस तू जर आसवांच्या विहारी भेटलो असतो मी पापण्यांच्या किनारी विसरतेस तू ही जेव्हा हासण्याचे तंत्र रात्रीच्या कुपीत भरतो मी तेव्हा, तुकडा तुकडा चंद्र! वाट ही अंधारयुगाची एकट्यानेच चालण्याची कोमेजलेली विरहफुले तव वेणीत माळण्याची विश्रब्ध नेणीवेत भानू आळवतो प्रात:मंत्र रात्रीच्या कुपीत भरतो मी तेव्हा, तुकडा तुकडा चंद्र! – © विक्रम श्रीराम एडके. (www.vikramedke.com)
‘ति’ची गोष्ट

दिवसभर ऍटिट्यूड सांभाळून वावरणारी ती आपल्याच तोऱ्यात असते, दिवाणे जग हे सारे तिच्या बोटाच्या टोकावर नाचते! वाऱ्याच्या नादावर धरलेला असतो तिने ताल — अन् अस्मानावर ती उधळते अधरांचा रंग लाल! भीती कश्याची? पर्वा कुणाची? मला कोण रोखेल? हसविणे, फसविणे, उंच उडविणे — माझा रोजचाच खेळ! “‘त्या’नेही नव्हते का मला फसविले असेच, टाकले नव्हते का ‘त्या’ने बंधनात? उसळला होता आगडोंब कसा त्याक्षणी मना-कणांत”! सांगत होती — “कसे उतरले होते गालावर आसू, अन् निर्मिले होते कसे मी त्यातूनच भेसूर हासू! त्या माझ्या भेसूर हास्यरवात सारे मी विसरते — त्याच खेळाचे नियम वापरून ‘त्या’च्यासारख्यांना खेळवते”! तो शांतपणे ऐकत असतो सारे, एव्हाना उत्तररात्रीचे पडघम …Read more »
सेक्युलरी गौडबंगाल : एक चिंतन

आपल्या बऱ्याच मित्रांना स्वत:ला ‘सेक्युलर’ म्हणवून घ्यायची खाज असते. कारण काय, तर म्हणे भारत हा एक सेक्युलर देश आहे. या ‘सेक्युलर’ शब्दाचे उपद्रवमूल्य समजल्यामुळे हा शब्द एखाद्या शिवीसारखा वापरणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. पण या सेक्युलर-भक्तांना आणि विरोधकांनाही एक गोष्ट अजिबात ठाऊक नसते की, भारतात हे सेक्युलरी गौडबंगाल आलं कधी? तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल मित्रहो, परंतू हा ‘सेक्युलर’ शब्द भारताच्या संविधानात ४२व्या घटनादुरुस्तीअन्वये घुसडण्यात आला! मी मुद्दामच ‘घुसडण्यात आला’ असे म्हणतोय, कारण भारतात ढोबळमानाने १९७५ ते १९७७ आणीबाणी होती आणि ही उपरोक्त घटनादुरुस्ती झाली आहे १९७६ साली! तेव्हा हा ‘सेक्युलर’ शब्द घटनेत कुणी टाकला असेल, काय हेतूने टाकला असेल, आणि किती …Read more »
सावरकरांची उडी, नव्हे — भारतीय स्वातंत्र्याची गुढी!

आज ८ जुलै. आजच्याच दिवशी स्वा. सावरकरांनी मार्सेल्स बंदरात ती त्रिखंड गाजविणारी जगप्रसिद्ध उडी ठोकली होती. आता काही टिनपाट लोक म्हणतात की, सावरकर ५ मिनिटंही पोहोले नसतील आणि ती उडी गाजलेली नव्हे तर गाजवलेली होती इ. काहीजण तर या उडी मारण्याच्या पराक्रमासाठी सावरकरांना पळपुटे म्हणण्याइतकी मजल मारतात! वास्तविक सावरकर किती वेळ पोहोले, हे महत्वाचं नाहीच आहे. त्या पोहोण्याचे परिणाम काय झाले हे महत्वाचे! आणि सावरकर फक्त पाचच मिनिटं पोहोले हे सांगायला सावरकरांचे जातीयवादी टीकाकारच कश्याला हवेत? सावरकर तुरुंगात असताना एका चीनी बंद्याने सावरकरांना अतिशय भक्तिभावाने विचारले होते, ‘महाराज आपण किती दिवस पोहत होता’? तर सावरकर शांतपणे उत्तरले होते, ‘दिवस कसले, …Read more »
मेरे पैगंबर!!

रोना-धोना, सपने बोना, पत्ते काट फिर बाजी खोना! फिर उठना, फिर टूटना, गिरना-पडना, खुदही से लडना! ढेर हो जाए तो – अपनी लाश, अपनी लाश – आपै ढोना! फिर नयी जात, फिर नया वार, कदमबोसी करती नजरें फिर वही इंतजार! बस यहीं चल रहा हैं मुसलसल.. यहीं जिंदगी हैं इन दिनों.. रोना आता हैं तो अपनीही पीठ सहलाकर कह लेते हैं – “ये जो आँसू हैं ना, वो आँसू नहीं है.. आसमाँसे आयतें उतरी हैं तुम्हारे नाम की… मेरे पैगंबर”!! – © विक्रम. (www.vikramedke.com)
स्वयंसूचना

स्वयंसे कोई भाग सके ना कर्मकी गठरी त्याग सके ना चिरनिद्रामें जाग सके ना सुन! मृत्यू तुम्हारे समीप खडी हैं देख आँखोंसे आँखे भिडी हैं नवीन लडाई मनमें छिडी हैं सुन! तू वीर हैं, जियाला हैं तुझसे ही सारा उजियाला हैं तेरा ये काल निवाला हैं ओ वीर रे..! रख धीर रे..! सुन! मन मर्मोंके भेद भुलाकर जीवनको आकाश पिलाकर स्नायूसे स्नायूको मिलाकर सुन! काल कदापि स्तब्ध नहीं हैं उस बिंदूपर शब्द नहीं हैं कोई विनाप्रारब्ध नहीं हैं सुन! गीताका ये अभिज्ञान हैं लडता हैं वोही महान हैं जीवन इसीका प्रमाण हैं ओ वीर रे..! रख धीर रे..! सुन! कुछभी …Read more »
शाहरुख नाचलाच पाहिजे!

देशाच्या पंतप्रधानाइतकं व्यस्त कुणी असू शकतं का हो? नाही ना! काल कै. मुंडेंच्या निधनाची बातमी समजल्यानंतर ताबडतोब पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदींनी सारे कार्यक्रम रद्द केले व राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. मात्र बहुतेक हिंदी सिनेमातला बोबडा नाच्या शाहरुख खान हा स्वत:ला पंतप्रधानांपेक्षाही मोठा समजत असावा. कारण या राष्ट्रीय दु:खाच्या प्रसंगी कार्यक्रम रद्द करणे तर दूरच, हा घरबुडव्या बंगालात ठुमके लावत होता – ममता बॅनर्जीसोबत! त्याला देशाच्या दु:खापेक्षा स्वत:च्या संघाच्या विजयाचा जास्त आनंद महत्वाचा वाटत होता. इतके दिवस शाहरुखनामक माकडसदृश प्राणी माझ्या भारत देशात राहातो, याची लाज वाटायची. काल मला त्याची लाज नाही, घृणा वाटली – घृणा! एखाद्या सडलेल्या मांसाच्या तुकड्याची …Read more »
आधुनिक महाभारताचे उपाख्यान

महाभारतातली घटना आहे. कर्णाने आपली कवचकुंडले गमावून इंद्राकडून अमोघ अशी ‘वासवी शक्ती’ मिळवली होती. हेतू एकच – अर्जुनाचा वध! परंतू श्रीकृष्ण अतिशय धूर्त राजकारणी होता. त्याने युद्ध ऐन भरात असतानाच भीमपुत्र घटोत्कचाला मैदानात उतरवले. घटोत्कच हा तर मायावी राक्षस. त्यातून साक्षात भीमाचा मुलगा! त्यामुळे त्याच्या अतुल्य पराक्रमाची केवळ कल्पनाच केलेली बरी. असा हा घटोत्कच इतक्या वेगाने कौरवांचा विनाश करत सुटला की, जणू एकाच दिवसात संपूर्ण कौरवसेना संपवून टाकेल! ही परिस्थिती पाहून दुर्योधन घाबरला. त्याने घटोत्कचाला रोखण्यासाठी आपली वासवी शक्ती वापरण्याची कर्णाला विनंती केली. कर्ण पेचात पडला! शक्ती तर खास अर्जुनासाठी राखून ठेवलेली. ती कशी वापरायची? आणि दुसरीकडे ज्याने आपल्याला माणसात …Read more »
Categories
- A R Rahman (17)
- Bajirao (5)
- Bhagavad Geeta (5)
- Books (5)
- Cinema (59)
- Comics (3)
- Hindutva (42)
- History (53)
- Music (11)
- Poetry (55)
- Politics (52)
- Pravaas Chitre (3)
- Ramayana (9)
- Reviews (64)
- Savarkar Katha (3)
- Sawarkar (7)
- TV (27)
- Uncategorized (18)
- Vaidik Knowledge (18)
- कथा (12)
- स्फुट लेख (29)
Vikram Edke’s Lyrics in ‘Rotaract CHANGE Anthem’
Menu
Recent Posts
- A Masterclass In Paradox July 25, 2023
- दक्षिणपंथी – यातिसई June 17, 2023
- अर्धवट शिजलेली थाळी – पोन्नियिन सेल्वन २ May 4, 2023
- गेमसारखाच – टेट्रिस! April 9, 2023
- रावणाचं फर्स्ट इम्प्रेशन! October 3, 2022
- मर्यादांमध्ये अडकून पडलेला – पोन्नियिन सेल्वन: १ October 1, 2022
- टबू – असंतांची गोष्ट September 10, 2022
- मार्मिक भाष्याने समृद्ध – बिफॉरेनर्स May 10, 2022
- आरआरआर — भारताची कथा भारताच्या भाषेत जगाला सप्रेम! March 28, 2022