उजळून ये.. उजळून ये..

स्त्री म्हटलं की माझ्या डोळ्यांसमोर आगीची विविध रुपे येतात. कधी देवघरात तेवणारं निरांजन, कधी साक्षात वडवानल, समयीसारखी शांत तर कधी सूर्यासम दाहक. कधी चुलीवरची आच, कधी मायेची ऊब, कधी टळटळीत दुपारची प्रखरता तर कधी पहाटेची हलकी शीतलता. मुण्डकोपनिषदाचा अभ्यास करताना वाचलं होतं की, अग्निच्या सात जिह्वा असतात. काळावर सत्ता चालवणारी ‘काली’, विक्राळ ‘कराली’, मनाच्या गतिची ‘मनोजवा’, इन्फ्रारेड म्हणता येईल अशी ‘सुलोहिता’, अल्ट्राव्हायलेट वर्णन करता येईल अशी ‘सुधूम्रवर्णा’, ठिणगीसारखी ‘स्फुल्लिंगिनी’ आणि समस्त विश्वालाच आवडीने गिळंकृत करणारी ‘विश्वरुची’, या सातही अग्निजिह्वा मला स्त्रीचीच विविध रूपे वाटतात. रूप कोणतेही असो, स्त्री ही ज्योत आहे. स्त्री ही मशालीचा पोत आहे. अविनाशी धग आहे. आणि …Read more »

स्त्रीकेंद्री प्रहेलिका – द ब्लेच्ली सर्कल

युद्धं केवळ सीमेवरच लढली जातात, ही अंधश्रद्धा आहे. सीमेवर असते ती केवळ दृश्य आघाडी. पण खरी युद्धं लढली जातात ती, राष्ट्राच्या नागरिकांच्या मनात. ज्या राष्ट्राच्या नागरिकांचं मनोबल अतूट असतं आणि राष्ट्रासाठी आपापल्या अश्रू, रुधिर, स्वेद यांची हवि देण्याची ज्या राष्ट्राच्या नागरिकांची तयारी असते, त्या राष्ट्राचं सैन्यबळ काही का असेना पण ते राष्ट्र युद्धं जिंकतंच. किंबहूना हरले तरीही ते पराभव पचवून अंतिम विजयासाठी पुन्हा उभे राहातात. दुसरं महायुद्ध ही अशाच मनोबलाच्या जोरावर जिंकलेल्या युद्धांची गाथा आहे. त्या काळी इंग्लंडमधील स्त्रियांना सीमेवर लढण्याची अनुज्ञा नव्हती. पण म्हणून काही तत्कालीन ब्रिटिश स्त्रिया शांत नाही बसल्या. त्यांनी दुसऱ्या मार्गांनी आपलं योगदान दिलं. किंबहूना त्यांचं …Read more »

शुद्धतम, श्रेष्ठतम रत्न – लाईफ ऑन मार्स

वर्ष २००६. ग्रेटर मँचेस्टर पोलिस विभागातील चीफ इन्स्पेक्टर सॅम टायलर (जॉन सिम) हा एका अपराधाचा माग काढतोय. त्यासाठी तो घाईघाईने एके ठिकाणी निघालाय. तेवढ्यात मागून एक कार येते.. धाड..! सॅम रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त पडतो. हळूहळू त्याला शुद्ध येते. तो डोळे उघडतो. उभा राहातो. पण पाहातो तर काय, सॅम थेट १९७३ सालात जाऊन पोहोचलाय! सॅम वेडा झालाय का? की सॅम कोमात आहे? की सॅम खरोखरच काळात मागे गेलाय? या तिन्ही शक्यतांच्या लाटांवर अखेरच्या भागातील अखेरच्या प्रसंगापर्यंत एखाद्या नौकेसारखी हिंदकळणारी व सोबतच आपल्यालाही त्या नौकानयनाचा एकमेवाद्वितीय, अभूतपूर्व अनुभव देणारी ब्रिटिश मालिका म्हणजे “लाईफ ऑन मार्स”. ‘लाईफ ऑन मार्स’चं सगळ्यांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे, …Read more »

चित्रपटांच्या उत्क्रांतीमार्गातील धातुस्तंभ : २००१ – अ स्पेस ओडिसी

उत्क्रांतीच्या पहिल्या पायरीवर, जेव्हा माणसाचा अद्याप माणूस व्हायचा होता, तेव्हा एका मानवसदृश वानरांच्या कळपापुढे अचानकपणे एक धातुस्तंभ येऊन उभा राहातो. ही वानरं टोळ्या करून राहाणारी आणि पाण्याच्या डबक्यांवरून दुसऱ्या कळपांशी भांडणारी, एकमेकांना घाबरून राहाणारी आहेत. काही वानरं त्या स्तंभाला स्पर्श करतात. स्पर्श केलेल्या वानरांचा कळप नवनवीन युक्त्या वापरून दुसऱ्या कळपांवर सहजी विजय मिळवू लागतो. लक्षावधी वर्षांनंतर चंद्रावर एका अवकाशयानाला तसाच पण आधीच्यापेक्षा मोठा स्तंभ सापडतो. त्या स्तंभाच्या खुणेवरून मानवांचे अजून एक अंतराळयान गुरूच्या दिशेने झेपावते. त्यांना तिकडे काय आढळते, याचा आध्यात्मिक, तात्त्विक, भौतिक आणि वैज्ञानिक पातळीवर घेतलेला रूपकात्मक शोध म्हणजे स्टॅन्ली कुब्रिकची १९६८ सालची श्रेष्ठतम कलाकृती, ‘२००१ – अ स्पेस …Read more »

सोलफुल जॅझ — सोल

रहमानने मला ज्या अनेक गोष्टी दिल्या आहेत त्यांच्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जॅझ. त्याने गेल्या तीन दशकांतील त्याच्या अनपेक्षित रचनांमधून वेळोवेळी जॅझशी ओळख करून दिली आणि माझ्यासाठी जणू एक नवंच दालन खुलं झालं. जे योगदान राजाचं मला व माझ्यासारख्या अनेकांना सिम्फनिक संगीताची गोडी लावण्यात आहे, तेच योगदान रहमानचं आम्हाला जॅझचं वेड लावण्यात आहे. पुढे या वाटेवर हर्बी हॅन्कॉक, सोनी रॉलिन्स, माईल्स डेव्हिस, डायना क्राल वगैरे गंधर्व भेटत गेले आणि सगळा प्रवासच जॅझसारखा उन्मुक्त, उत्फुल्ल होऊन गेला. रहमानला कदाचित कल्पनाही नसेल की, त्याने पेटवलेले हे स्फुल्लिंग २०२० साली अवचितपणे एका चित्रपटाशी वेगळ्याच सुरावटीवर जोडले जाण्यात मदत करेल. मी बोलतोय पिट …Read more »

अर्जुनाचे काऊन्सिलिंग

पांडवांच्या शक्तीचा अत्यंत मोठा भाग असलेला अर्जुन ऐन युद्ध सुरू होण्याच्या काही तास आधी ‘सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति’ म्हणत हातपाय गाळून बसलाय. हे समोर उभे असलेले माझे भाऊ आहेत, आजोबा आहेत, काका आहेत, सासरे आहेत, नातू आहेत, गुरू आहेत, या स्वजनांशी मी कसा काय लढू असं म्हणत निवृत्तीची भाषा करतोय. श्रीकृष्णाचं देवत्व ज्या अनेक गोष्टींमध्ये सामावलंय, त्यांच्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे परिस्थितीचं सर्वंकष आकलन करून चटकन निर्णय घेणे. कृष्णाकडे दोनच उपाय होते, एक तर या ‘अर्जुनविषादयोगा’पुढे मान तुकवायची नाहीतर त्याला त्या अवसादातून बाहेर खेचून आणायचे! पहिला मार्ग सोपा होता, उपनिषदांच्या भाषेत प्रेयस होता पण निवडणारा साक्षात भगवंत …Read more »

नील

Spoiler_Alert स्पॉयलर_अलर्ट [‘टेनेट’ पाहिलेला नसल्यास लेख वाचू नये, रसभंग होण्याची शक्यता आहे. चित्रपट पाहिल्यावरच लेख वाचावा.] ‘टेनेट‘मधील माझं सध्याचं सगळ्यांत आवडतं पात्र नील आहे. एक तर रॉबर्ट पॅटिन्सनने जॉन डेव्हिड वॉशिंग्टनपेक्षा जास्त चांगलं काम केलंय. आणि दुसरं कारण असं की, त्याचं पात्र हे भविष्यातून भूतकाळात आलेलं असल्यामुळे सुरुवातीपासूनच सर्वानुभवी व परिपक्व आहे. त्या मानाने नायकाचे पात्र आत्ता कुठे शिकू लागलेय. या अनुभवाच्याच आधारे नीलने त्याच्या आयुष्याचे तत्त्वज्ञान उभारलेय, “What’s happened, happened”. या तीनच शब्दांमध्ये भौतिकशास्त्रीय आणि तात्त्विक अशा दोन्ही पातळ्यांवर अतिशय सारगर्भ चिंतन आहे. गणित आणि भौतिकशास्त्रात एक सिद्धांत आहे, त्याला ‘केऑस थियरी‘, अर्थात ‘कोलाहल सिद्धांत’ असे म्हणतात. हा सिद्धांत …Read more »

‘टेनेट’ – उलट्या काळाचा सुलटा भविष्यवेध!

चलचित्र बनवणं आणि चित्रपट बनवणं, यात एक मूलभूत फरक असतो. एक उदाहरण देतो. समजा की, चलचित्र म्हणजे कविता आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत काहीतरी एक विधान करणारी. चित्रपट मात्र कवितेसारखा नसतो. चित्रपट म्हणजे सूक्त असते. त्याची प्रत्येक चौकट ही एखाद्या ऋचेसारखी असते, स्वयमेव काही कथा सांगणारी. आणि या चौकटी जेव्हा एकत्र येतात तेव्हा अनेक ऋचा मिळून जसे एक परिपूर्ण आणि काहीतरी गूढ उलगडून सांगावे तसा अर्थ सांगणारे सूक्त बनते, तसा चित्रपट सबंध पाहिला तर चौकटींनी बनलेली परंतु चौकटींपेक्षा भिन्न अशी कथा उलगडते. हा निकष लावला तर मला सांगा, जगात खरोखर किती ‘चित्रपट’ बनतात! इतकी कठोर परीक्षा घेतली तर जगातील काही भलेभले आणि …Read more »

किंचित फुगलेला, पण आवडलेला – सुपरमॅन : रेड सन

‘एमसीयू’ आणि ‘डिसीइयू’ मध्ये दोन मूलभूत फरक होते. मार्टिन स्कॉर्सेसीच्या दृष्टीने मार्व्हलचे चित्रपट हे चित्रपटच नसले, तरीही त्यांनी बॉक्स ऑफिसवर गेल्या दशकभरात अब्जावधी डॉलर्सचा धुमाकूळ घालत चाहत्यांची जवळजवळ एक आख्खी पिढी आपल्या बाजूला वळवली. त्याच आसपास सुरू झालेल्या ‘डिसीइयू’ला मात्र ना समीक्षकांची फारशी दाद मिळवता आलीये ना रसिकप्रियता. अर्थात ‘वंडर वुमन’च्या (२०१६) प्रचंड यशानंतर आणि ‘अक्वामॅन’ (२०१९), ‘शझॅम’ (२०१९) यांच्या निमित्ताने रोख बदलण्यात यशस्वी झाल्यावर हा फरकही हळूहळू पुसट होत चाललाय. परंतु एक फरक मात्र अद्यापही कायम आहे, तो म्हणजे डिसीच्या मालिका आणि विशेषतः त्यांचे अनिमेटेड चित्रपट हे मार्व्हलच्या मालिका व अनिमेटेड चित्रपटांपेक्षा अनेक पटींनी सखोल आणि श्रेष्ठ असतात. (अपवाद …Read more »

कर्तव्य के पथ पर

उत्कर्ष मिलेगा, अपकर्ष भी!कर्तव्य के पथ पर,वेदनाएं मिलेंगी, हर्ष भी! कंकर छेदेंगे पग तुम्हारे,जिह्वाएं ह्रदय भेदेंगी!पंक उछलेगा चरित्र पर,धैर्य कि अंगुली छूटेगी!किंतु रे धीर, तुम चलते रहना,तुम चलते रहना अविचल,जब तक कि गंतव्य ना मिले,चाहे मार्ग में यश मिले संघर्ष भी!! तुम चलते रहना निरलस, पथ में शत-शत मोड आएंगे,आप्त तुम्हारे, साथ तुम्हारा, क्षण में छोड जाएंगे!न ढलेगी कोई रात्रि जब होगी नयनों से वृष्टि नहीं,सम्भव है, कि तुम्हें लगे, भगवान की तुम पर दृष्टि नहीं!तब सोच समझ के करना दोनों, क्रोध भी, मर्ष भी,और अथक चलते रहना धीर,जब तक कि गंतव्य ना मिले,चाहे मार्ग में यश मिले, संघर्ष भी!! …Read more »

Vikram Edke’s Lyrics in ‘Rotaract CHANGE Anthem’

"खलाओंको छाना हैं, हमने सुरजको थामा हैं!

हैं पता के जल जायेंगे, लेकिन सवेरा लाना हैं!!

खुदपे पूरा भरोसा करके, पावोंपे खड़े हम डटके,

अब भले चाहे तूफाँ आये, हम हैं तैय्यार!

हम तो हैं 'नचिकेता'की तरहा, हर 'प्रेयस'को आग लगाते,

और 'श्रेयस'की राहपे चलके, देते फूल लेते हैं कांटे!!

खलाओंको छाना हैं, हमने सुरजको थामा हैं!

हैं पता के जल जायेंगे, लेकिन सवेरा लाना हैं!!"

- विक्रम एडके ( हिंदी गीतांकन )