Blog Archives

पानिपत: पराभवाचा नव्हे, विजयाचा इतिहास

डोक्यात पराभव पक्का बसलेला असेल, तर सगळ्या गोष्टींत पराभवच दिसतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पानिपतचे युद्ध! अर्थातच या युद्धात मराठ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र सगळेच म्हणतात त्याप्रमाणे हा मराठी साम्राज्याचा पराभव होता असे काही मला वाटत नाही. पानिपताने मराठ्यांची दिल्ली आणि उत्तर भारतावरील सत्ता धुवून टाकली हे खरे. अहमदशहा अब्दाली हा विजेता ठरला हेही खरे. मात्र या युद्धात अफगाणांचे एवढे काही प्रचंड नुकसान झाले की, त्यांना भविष्यात ‘कधीच’ हिंदुस्थानकडे नजर वाकडी करून पाहाण्याची दुर्बुद्धी झाली नाही. याउलट १७६१ साली सुटलेली उत्तर हिंदुस्थानवरील पकड मराठ्यांनी १७७१ पर्यंत परत एकवार प्रस्थापित केली, तीही दुप्पट जोमाने! थोडक्यात, अहमदशहाचा विजय तात्कालिक होता आणि मराठ्यांचा …Read more »

रहमानला सारं काही कळतं!!

नष्ट होती आशा अन् जळू लागती दिशा नैराश्याच्या गर्तेत केवळ अश्रूंचीच भाषा एक लकेर उमटते अन् डोळ्यांतलं पाणी खळतं मनात तेव्हा विश्वास वाटतो – “रहमानला सारं काही कळतं”! तुझा एक-एक सूर आणि एक-एक ताल आपसूकच बनतात ते सारे माझी ढाल अंधाऱ्या अंतरी तेज स्पर्शते अन् गानब्रह्म आकळतं मनात तेव्हा विश्वास वाटतो – “रहमानला सारं काही कळतं”! मी अज्ञाताचा प्रवासी तू दीप घेऊन उभा तिथे तू घेता कवटाळूनी अंतर्मन माझे रिते सारे अहं अर्पिता तुला मन “स्व”कडे वळतं मनात तेव्हा विश्वास वाटतो – “रहमानला सारं काही कळतं”! – © विक्रम. (www.vikramedke.com )

..तर मज बालबुद्धीला जाणवणारा खेळ हा असा आहे!

तर मज बालबुद्धीला जाणवणारा खेळ असा आहे की.. मायला.. त्या धर्मांध मोदींनी सगळीकडेच दणका उडवून दिलाय. सोशल मिडिया तर सोशल मिडिया, पण वास्तवातही ते लक्षावधीच्या सभा खेचताहेत. बरं तर बरं.. ज्या कोणत्या निवडणुकीत हात घालतात तिथे विजयश्रीच खेचून आणतात (नुसतंच जिंकणं सोप्पं असतं हो, पण हारके जीतने वाले को ही बाजीगर कहते हैं – जय राऊलबाबा!!). आणि यावर कडी म्हणून ती दुष्ट दुष्ट दुष्टातिदुष्ट न्यायालये.. खटाखट एकेका केसमधून मोदींना क्लिनचिट देत सुटलीयेत. वर त्या साध्वी आणि असीमानंदांनाही सोडणारेत अशी चर्चा चालूये! अरेरे.. अश्याने देशात धर्मनिरपेक्षता कशी उरेल? काल सन्माननीय आणि स्वत:ची मते गेली १० वर्षे निडरपणे मांडणारे (!) बोलके बाहुले …Read more »

..सत्यधर्माय दृष्टये!!

मोहनदास गांधी अत्यंत साधेपणाने राहायचे. उदा. – रेल्वेच्या तिसऱ्या वर्गातून प्रवास करणे, शेळीचे दूध पिणे, साध्या आसनावर बसणे वगैरे.. मात्र असे म्हटले जाते की – गांधींना देशात कुठेही रेल्वेप्रवास मोफत असायचा. ज्या रेल्वेतून त्यांना प्रवास करायचा असेल, त्या रेल्वेचा तिसऱ्या वर्गाचा एक डबा आसने काढून रिकामा केला जाई, तिथे साधी आसने टाकली जात. जरी तिसऱ्या वर्गाचा डबा असला, तरीही कार्यकर्ते सबंध डबा ताब्यात घेत – त्याअर्थी डबा ‘खाजगी’ होऊन जाई! तिथेच एका कोपऱ्यात गांधींची शेळी ठेवत. तिचीही चारा-पाण्याची व्यवस्था केली जाई. यात खरं-खोटं देवच जाणे. पण असं म्हणतात की, या सगळ्या संदर्भात सरोजिनी नायडू एकदा म्हणाल्या होत्या – “बापूंना गरीब …Read more »

सागरा प्राण तळमळला..!

ब्रायटन गावातली ती सायंकाळ तशी नेहमीसारखीच तर होती. तेच वातावरण, तीच पक्ष्यांची किलबिल, तीच फिरायला आलेली कुटूंबे.. क्वचित काही प्रेमी जोडपी.. आणि नित्यनेमाने फिरायला येणारे तेच दोघे. दोन काळे तरुण. त्या वर्तमान खेडेगावाच्या दृष्टीने काहीसे दुर्लक्षित, परंतू इतिहासाच्या आणि भविष्याच्या दृष्टीने मात्र अत्यंत महत्वाचे. त्यांच्यापैकी एकाचे नाव होते निरंजन पाल. आणि कुणाला सांगून खरे वाटले नसते की, जो दुसरा मुळचा अतिशय रुपवान परंतू सध्या आजाराने खंगून गेल्यासारखा वाटणारा पंचविशीतला तरुण होता त्याने आत्ता काही दिवसांपूर्वीच ज्या साम्राज्यावरून म्हणे कधी सूर्य मावळत नाही ते – जगद्व्यापी ब्रिटीश साम्राज्य – पार मुळापासून हादरवून सोडले होते. तो जरी सध्या अतिशय कृश, अक्षरश: मरणप्राय …Read more »

विस्मृतीत गेलेली त्रिमूर्ती

आज १९ डिसेंबर. १९२७ साली याच दिवशी पं. रामप्रसाद “बिस्मिल”, अशफाकउल्लाह खान “हसरत” आणि ठाकूर रोशनसिंह यांना फाशी देण्यात आली होती. तीन जीव हुतात्मा झाले होते. दुर्दैवाने क्रमिक पुस्तकांतून राजकीय हेतूंनी प्रेरित इतिहास शिकलेल्या आम्हाला, चार-दोन अहिंसक राजकारणी सोडल्यास, मातृभूमीसाठी प्राणांचीही बाजी लावणारे अन्य हुतात्मे माहितीदेखील नसतात. त्यामुळे उपरोक्त तिघांबद्दल थोडक्यात सांगतो, जेणेकरून वाचकांना त्यांची माहिती व्हावी व या देशभक्तांचा अधिक अभ्यास करण्याची प्रेरणा मिळावी.. १) आर्यसमाजी असलेले पं. रामप्रसाद बिस्मिल हे कट्टर हिंदुत्ववादी. शुद्धीकार्यात अग्रेसर. बाणेदारपणा तर असा की, फाशीपूर्व खटला चालू असताना एकदा त्यांचा उल्लेख “मुलजिम” (आरोपी) ऐवजी चुकून “मुलाजिम” (नोकर) असा झाला तर या पठ्ठ्याने थेट न्यायाधिशाला …Read more »

काफिर हैं वो..

आपल्यापैकी बहुतेकांना पंडित द्वारकानाथ कौल हे नाव ऐकूनही माहिती नसेल. “नसिम” या फारसी टोपणनावाने लिहिणारे १९व्या शतकातील अतिशय महान शायर पंडित दयाशंकर कौल यांचा हा मुलगा. पंडित द्वारकानाथांना अतिशय कमी – अवघ्या २८ वर्षांचंच आयुष्य लाभलं, परंतू आपल्या अमर कृतींच्या रुपाने ते आजही जिवंत आहेत. कौल घराणं काश्मिरी पंडितांचं. द्वारकानाथजीही फारसीतून लिहित असले तरीही हिंदू धर्माचे अतिशय अभिमानी. त्यांचा हाच अभिमान तत्कालीन काही मुसलमान शायरांना खटकत असे. एकदा एका नवाबाने आपल्या संस्थानात मुशायरा (कविसंमेलन) आयोजित केला होता. द्वारकानाथजींनाही निमंत्रण होतं. द्वारकानाथजींचा द्वेष करणारे काही शायर नवाबाच्या कानाशी लागले आणि नवाबासकट सगळ्यांनी मिळून पंडितजींचा पाणउतारा करण्याची एक योजना आखली. आधीच ठरल्याप्रमाणे …Read more »

भेट: इतिहासकाराची इतिहासाशी!!

सावरकरांना देशाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर ढकलण्यासाठी इंग्रजांनी त्यांना रत्नागिरीत स्थानबद्ध केले खरे. परंतू सावरकरांच्या व्यक्तिमत्वाची मोहिनीच इतकी काही जबरदस्त होती की, लवकरच आडगावी असलेले रत्नागिरी शहर हिंदुस्थानच्या गुप्त राजकारणाचे महत्वपूर्ण केंद्र बनले. सावरकरांना भेटायला येणाऱ्यांचा, चर्चा-मसलती करणाऱ्यांचा ओघच रत्नागिरीत सुरू झाला. मोहनदास गांधींपासून ते थेट अलीबंधूंपर्यंत सगळ्यांनाच रत्नागिरीत यावे लागले. त्याकाळी सावरकर रत्नागिरीच्या पटवर्धनांकडे मुक्कामी होते. असेच दुपारच्या वेळी दार वाजले म्हणून पाहातात तर काय, दारात एक वयोवृद्ध व्यक्ती उभी. वयोवृद्ध असली तरी चेहऱ्यावरील बुद्धिमत्तेची आभा मात्र चिरतरुण होती. “कोण?”, सावरकरांनी हलकेच विचारले. “मी  बडोद्याचा सरदेसाई. इतिहास लिहितो म्हणून तुम्हाला कदाचित माहिती असेल”. सावरकर चमकलेच, “म्हणजे… तुम्ही.. रियासतकार…”? सावरकरांच्या नजरेसमोरून …Read more »

अभिव्यक्तीस्वातंत्र्य असेही..!

गिरीश कर्नाड ही व्यक्ती तर आपणा सर्वांना माहितीच असेल. ते लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत. अभिनेतेही आहेत. परंतू एवढीच एक ओळख नाहीये त्यांची. या सगळ्यासोबतच श्री. कर्नाड हे सेक्युलॅरिझमच्या भारतीय आवृत्तीचे मूर्तीमंत प्रतीकही आहेत! मग त्यासाठी ते विविध मंचांवरून हिंदूत्वविरोधी वक्तव्ये (बऱ्याचदा प्रसंग सोडून!! आठवा काही महिन्यांपूर्वी व्हि. एस. नायपॉल यांच्यावर त्यांनी केलेली टिका!) करीत असतात. मराठा साम्राज्याच्या शूर पेशव्यांना कित्येकदा पाठ दाखवून पळालेल्या जिहादी टिपूचे समर्थन करत असतात. त्यांना तुघलकही आवडतो म्हणे! मागील वर्षी तर या महानुभावांनी कमालच केली. जयपूरच्या साहित्य महोत्सवात त्यांनी भारतरत्न रवींद्रनाथ ठाकूरांचा उल्लेख “एक थर्डक्लास नाटककार” असा केला. त्यावरून बरेच वादळही उठले होते. कर्नाडांनी त्यावेळी स्वत:च्या …Read more »

सौंदर्यदृष्टीची सद्गुणविकृती: राम-लीला

स्वा. सावरकरांनी मानवी स्वभाव स्पष्ट करणारी एक जबरदस्त संकल्पना मांडलीय – सद्गुणविकृती! अर्थात सद्गुणांचाही जर एका मर्यादेपलिकडे अतिरेक झाला तर ते वाईटच. त्यातून विकृतताच उभी राहाते. सिनेमा क्षेत्रात या संकल्पनेचे चपखल उदाहरण आहे – संजय लीला भन्साळी! कमालीच्या सौंदर्यदृष्टीने चित्रीकरण करणारा हा माणूस केव्हा त्या सौंदर्यदृष्टीच्या अतिरेकात आणि अट्टाहासात हरवून जातो, त्याचे त्यालाही कळत नाही. एरव्ही व्यवस्थित ठिकाणी घडणारी कथा त्याला भव्यातिभव्य सेट्सवरच (तेही चित्रविचित्र रंगांच्या!) का घडायला हवी असते तेच कळत नाही. मोठमोठे सेट्स आणि पात्रांच्या साध्यासाध्या प्रसंगांतही प्रमाणबद्ध हालचाली कथेला मारून टाकतात आणि उरतो फक्त एक मोठ्ठा डोलारा! सद्गुणविकृती, दुसरं काय! अगदी हेच “राम-लीला”च्याही बाबतीत घडलंय. मुळात “रोमिओ-ज्युलिएट” …Read more »