Blog Archives

भिक

   मी शक्यतो रेल्वेनेच प्रवास करतो. याचं कारण म्हणजे एकतर हा प्रवास थोडा मोठा होत असल्याने यात एकप्रकारचा निवांतपणा असतो. त्यामुळे प्रवास माझ्या व्याख्यानाच्या निमित्ताने असेल तर मला शांत मनाने मी मांडणार असलेल्या मुद्द्यांवर विचार करायला पुरेसा वेळ मिळतो. नवीन लोकांशी ओळखी होतात, नवनवे अनुभव येतात. आणि तितकंच महत्वाचं म्हणजे, मोठ्या प्रवासात मला माझ्या आवडीचे संगीत भरपूर वेळ ऐकता येते.   असाच एक नगर-पुणे रेल्वेप्रवास. मी माझ्या आवडीची “युवराज” चित्रपटातील गाणी ऐकत होतो. दौंडच्या आसपास काही हिजडे गाडीत शिरले. ओंगळ लाडिकपणा करत ते प्रत्येकाकडून पैसे मागत होते. १० रुपयांच्या खाली एक पैही घेत तर नव्हतेच, पण कमी पैसे देणार्याला अथवा द्यावयास टाळाटाळ …Read more »

Burning For Freedom

     इंटरनेट आणि सोशल मिडीयाच्या आभासी जगताने कुणाला काय दिलं माहिती नाही. पण मला मात्र अनेक जिवाभावाचे मित्र-मैत्रिणी दिले आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे पुष्कराज खेडेकर! आमची ओळख कधी आणि कुठे झाली मला खरोखरच आठवत नाही, पण २ वेगवेगळ्या देशांत राहत असूनही आमचा संवाद निरंतर सुरु आहे. याचे कारण म्हणजे आम्हाला जोडणारा समान धागा – स्वातंत्र्यवीर सावरकर! मला आठवतं कि पुण्यात मी दिलेल्या पहिल्याच व्याख्यानालाही त्यांनी भारतातील त्यांच्या सुट्टीचा कालावधी अडजस्ट करून हजेरी लावली होती!     पुष्कराजमुळेच माझी ओळख श्रीमती अनुरूपा सिनार यांच्याशी झाली. खरंच सांगतो, झपाटलेपण काय असतं ना, ते या जिद्दी विदुषीकडून शिकावं! मराठीचा फारसा गंध नसताना, दूरदेशी …Read more »

हिंदुत्व हे मोठे अजब रसायन आहे

हिंदुत्व हे मोठे अजब रसायन आहे. ते संपले म्हणून कुणी पोत खाली करू गेले तर त्याची ज्वाळा दुप्पट त्वेषाने वर वरच उफाळते.   जगज्जेत्या शिकन्दराला भ्रम होता की हा हा म्हणता म्हणता हिंदुस्थान काबीज करेल. तो शिकंदर हिंदुस्थानचे साधे अंगणही बघू शकला नाही! कालौघात चाणक्यही गेले आणि चंद्रगुप्तही, केवळ हिंदुत्व तेवढे टिकून राहिले. म्लेन्छांनी या भूमीला उणीपुरी ६०० वर्षे गुलाम करून ठेवले. आता हिंदुत्व औषधालाही उरणार नाही असे वाटत असताना ते नुसते तगलेच नाही तर या भूमीत त्याने शिवप्रभून्सारखा संजीवन योद्धाही जन्मास घालून दाखवला. शिवप्रभूही गेले आणि शंभूछ्त्रपतीही पण तोवर हिंदुत्वाची धुरा बाजीराव बल्लाळ नावाच्या महायोद्ध्याने केव्हाच पेलली होती!   इंग्रजी अंमलातही हे दैवी रसायन आपले अस्तित्व …Read more »

" ते…. "

जेव्हा तुम्ही-आम्ही घालत असतो आपल्या कुजलेल्या दु:खाचे लोणचे, तेव्हा ‘ते’ आशेचे अंकुर पेरत असतात.. जेव्हा तुम्ही-आम्ही ढाळत असतो वांझोटे अश्रू, तेव्हा ते कष्टाच्या जमिनीवर घामाचं सिंचन करत असतात..! आपल्याला अंधारात दिसतो बागुलबुवा, अन् ‘ते’ आशेच्या किरणांना खेचत असतात.. दिवस सरतात, काळ जातो, तुम्ही-आम्ही उचलत राहातो आयुष्याचे तेच जुने ओझे, अन् तेव्हा ‘ते’ यशोशिखरावर स्वार झालेले असतात.. आपण बुजगावण्यासारखं जगतो, मरून जातो, तेव्हा ‘ते’ अमर झालेले असतात.. असे कसे? कारण… जेव्हा तुम्ही-आम्ही बडवत असतो परिस्थितीचा पोकळ ऊर, तेव्हा ‘ते’ स्वप्नांची धारदार शस्त्रे करून मैदानात उतरलेले असतात.. आणि कदाचित म्हणूनच ‘ते’ सामान्य असूनही असामान्य ठरत असतात.. – © विक्रम.

याद हैं वोह हमारी पहली मुलाक़ात की रात..?

याद हैं वोह हमारी पहली मुलाक़ात की रात? हमारी दोस्तीका मोती तुमने अपनी नर्म पल्कोंपे तोला था.. शायद धनकमें कुछ और रंग जुड़ गए होंगे उस रात, या फिर यूँ कहो की ज़िन्दगी के रेगिस्तांमें बरसात हुई थी पहली बार.. एक रात वोह भी तो थी, जब हमने सारी दुनियादारीको लात मारके कहकहे लगाए थे! लगा था जैसे वक़्त के पन्नोंपे किसीने पेपरवेट रख दिया हो! ‘यारी-दोस्ती और बात हैं, तो दुनियादारी कुछ और’ बात ये समझके भी नहीं समझना चाहते थे उस रात हम तीनों.. कल को एक रात वो भी तो आएगी.. की जब तुम चली जाओगी.. हम …Read more »

जी करता हैं…

जी करता हैं, गुलाल बन जाऊँ.. चीखता-चिल्लाता बवाल बन जाऊँ..! दूरीयों, मजबूरीयोंसे अलग.. उन रेशमी हाथोंका रुमाल बन जाऊँ..! जिंदगी क्यूँ सिखाए मुझे उसके मायने.. आज खुद जवाब, खुद सवाल बन जाऊँ..! पीछे घनी धुंध, आगे गहरा कुऑं.. डर को डरानेवाली मिसाल बन जाऊँ..! कभी किशन बन बन्सी बजाऊं.. कभी गाय, तो कभी गोपाल बन जाऊँ..! हो जाऊँ आज मैं परोंसे भी हलका.. मस्तीमें उडता खयाल बन जाऊँ..! आखिर कब तक उठाए गैरोंके बोझ.. आज खुद के बोझ का हमाल बन जाऊँ..! जी करता हैं.. जी करता हैं..! – © विक्रम.

जब तक है जान (संगीत-समीक्षण) : भाग – १

चित्रपटागणिक प्रगती करत करत कायम स्वतःची शैली बदलत राहणारा माझ्या माहितीतील एकमेव संगीतकार म्हणजे ए. आर. रहमान! १९९५ च रहमान २००५ साली आढळत नाही आणि २००५ चा रहमान २०१२ साली आढळणार नाही!    परंतु मला सर्वाधिक आकर्षित करणारी गोष्ट हि नव्हे! मला कळतं तेव्हापासून मी रहमानचं सर्व संगीत ऐकत आलोय. सुरुवातीच्या काळात त्याने लता मंगेशकर, आशा भोसले, एस. पी. बालासुब्रह्मण्यम, येसुदास, एस. जानकी, के. एस. चित्रा आदी दिग्गजांसोबत खूप सुरेख गाणी दिली. आजही तो, गीताची तशी गरजच असेल तर या महानुभावांकडून गाऊन घेतोच. पण त्याने लवकरच बहुधा विचार सुरु केला असावा की, ‘ही मंडळी गेल्यानंतर काय‘? म्हणूनच त्याने जाणीवपूर्वक या …Read more »

भाषाभिमान – एक स्फुट चिंतन.

   लॉर्ड मेकोले आपल्या २ फेब्रु. १८३५ रोजी ब्रिटीश संसदेत केलेल्या भाषणात म्हणतो,“I have traveled across the length and breadth of India and I have not seen one person who is a beggar, who is a thief. Such wealth I have seen in this country, such high moral values, people of such caliber, that I do not think we would ever conquer this country, unless we break the very backbone of this nation, which is her spiritual and cultural heritage, and, therefore, I propose that we replace her old and ancient education system, her culture, for if the Indians think …Read more »

" जब तक हैं जान "

” जब तक हैं जान “ बरखा की छींटें तेरे रुखसारोंपर, जैसे ओस आ थमी हो गुलजारोंपर.. देखके धडकने कुछ यूँ तेज हुई हैं, के सुन नहीं पा रहा तेरे लब्जोंके गुलफामोंको.. मानो जैसे सुर्ख होठोंसे खामोशी ही खामोशी छलक रही हो..!पूछा तुमने, चुपचाप हो क्यूँ.. कैसे समझाऊ मैं तुम्हे, बस इतना समझ लो.. आगोशमें भरके सुनना चाहता हूँ मैं ये मस्तानी खामोशी तेरी..  जब तक हैं जान, जब तक हैं जान..!!

शांती नव्हे, "सद्गती"

कुणीही महत्वाची व्यक्ती गेली की मी फेसबूकवर पोस्ट्स वाचतो किंवा मला भ्रमणध्वनीवर संदेश येतात, “त्यांच्या आत्म्याला शांती लाभो” अथवा “Rest In Peace”. वास्तविक ही इंग्रजांनी रूढ केलेली पद्धत, आपली नव्हे. पण आपल्यातले बहुतांशी लोक कळत-नकळत हीच पद्धत पुढे चालवतायत. यालाच साध्या भाषेत मानसिक-पारतंत्र्य म्हणतात. ख्रिशचन धर्मात अशी समजूत प्रचलित आहे की, व्यक्तीचा आत्मा त्याच्यासह कबरीत अंतिम निवाड्याचा दिवस येईपर्यंत पडून राहणार आहे. मग इतकी हजारो वर्षे पडून राहण्याचे त्या आत्म्याच्या नशिबात आहेच तर ते किमान शांततेने होवो, म्हणून म्हणतात, “शांती लाभो”. याउलट भारतीय संस्कृतीत मृत्यूला एक मंगल-सोहळा मानतात. आपण ज्याप्रमाणे जुने कपडे टाकून देत नवीन कपडे घालतो, त्याप्रमाणेच आत्माही जुने …Read more »