गुलज़ार
नज़्म पूरे जोबन पे थीनूर के कोहरे बहते थेइश्क़ तो तब भी था मगरवह और जगह रहते थे चलते-बहते एक रातसय्यार टकराया चाँद सेनूर मिला नज़्म को जा करअब्रों की दिवार फाँद के सागर डोल गया था उस दमतारे सारे उफनने लगे थेदूर कहीं कोहसारों मेंख़्वाब पकने बनने लगे थे वक़्त थम गया था उस वक़्तनज़्म-ओ-नूर का दीदार हुआइक हलचल सी हुई उजालों मेंइक नाम उठा ‘गुलज़ार’ हुआ — © विक्रम श्रीराम एडकेGulzar #HBDGulzarSaab
मनोव्यापारांचा गूढ खेळ – जेराल्ड्स गेम
जेसी (कार्ला गुगिनो) आणि जेराल्ड (ब्रुस ग्रीनवूड) सप्ताहांत साजरा करण्यासाठी त्यांच्या अलाबामातील नदीकाठच्या घरी जातात. एकत्र वेळ घालवणं, मजा करणं आणि त्यायोगे आपलं रुक्ष होत चाललेलं वैवाहिक जीवन वाचवणं, हा त्यांचा हेतू असतो. परंतु जेराल्डची मजेची कल्पना जरा वेगळीच असते. प्रवासाला निघतानाच त्याने सोबत खरोखरीच्या हातकड्या घेतलेल्या असतात. तो जेसीला त्या हातकड्यांनी पलंगाला जखडून ठेवतो. आणि त्याची रेप फँटसी पूर्ण करण्यात तिला भाग घ्यायला लावतो. जेसीला ही कल्पना मनापासून आवडलेली नाहीये. परंतु ती तरीही प्रयत्न करते. तिला त्या प्रकाराची क्षणोक्षणी शिसारी येऊ लागते. ती जेराल्डला सोड म्हणते. आणि मी नाही सोडलं तर, जेराल्ड उत्तरतो. जेसी घाबरते. जेसी आणि जेराल्डच्या वयात …Read more »
खेळ
“Boom Beach मध्ये ना आपल्याला एक आयलंड दिलेलं असतं. त्यावर आपला बेस बनवायचा, रिसोर्सेस प्रोड्युस करायचे. तसेच दुसरे बीचेस शोधून त्यांच्यावर अटॅक करायचा. आणि ते जिंकून घ्यायचे”! पाच वर्षांचा अर्णव बाबांना उत्साहाने सांगत होता. त्याचे बाबा, विख्यात अॅस्ट्रोफिजिसिस्ट डॉ. ज्ञानेश्वर लॅपटॉपवर काम करता करता नुसतेच “हं” म्हणाले! “मी आत्ता लेव्हल 47 ला आहे, माहितीये. हे तर काहीच नाही, पार्थिव तर लेव्हल 61 वर आहे पार!”, बाबा ऐकताहेत म्हणून अर्णवने माहिती पुरवणे चालूच ठेवले. “पण काय रे, ज्या आयलंडवर तुम्ही हल्ला करता, त्यांचेसुद्धा डिफेन्सेस असतीलच ना?”, लॅपटॉपच्या टकटकाटाच्या पार्श्वभूमीवर डॉ. ज्ञानेश्वरांनी विचारले. “असतात ना”, अर्णव सांगू लागला, “आपण अटॅक करायला नेमकं …Read more »
इन नोलान वुई ट्रस्ट
अवघा ८ वर्षांचा होता तो, जेव्हा ‘नासा’त काम करणाऱ्या एका नातेवाईकाने त्याला ‘अपोलो’ मोहिमेच्या प्रक्षेपणाचे फुटेज पाठवले होते. पठ्ठ्याने ते आपल्या पद्धतीने संपादित केले आणि ‘स्टॉप मोशन अॅनिमेशन’ तंत्रज्ञान वापरुन आपली पहिलीवहिली फिल्म बनवली, “स्पेस वॉर्स” (१९७८)! त्याचे नाव ख्रिस्तोफर नोलान!! पुढे भविष्यात तो बनवणार असलेल्या “इंटरस्टेलर”सारख्या (२०१४) महागाथेची चुणूक ही अशी होती. पुढे ९०च्या दशकात त्याने खूप साऱ्या कॉर्पोरेट फिल्म्स आणि शॉर्टफिल्म्स बनवल्या. यातल्या बहुतांश त्याची तेव्हाची प्रेयसी व सध्याची पत्नी एमा थॉमसने प्रोड्युस केल्या होत्या. सिनेमा बनवण्याचे त्याचे प्रयत्न मात्र काडीमात्रही यशस्वी होत नव्हते. मोठाच निराशाजनक काळ होता तो. परंतु याच काळात त्याने आता जिला लोक शोधून शोधून …Read more »
इंटेलिजंट, मनोरंजक, परिपूर्ण — विक्रम-वेधा
सम्राट विक्रमावर एक अवघड जबाबदारी येऊन पडते. दूर जंगलातल्या झाडावरून वेताळाला घेऊन येण्याची. तो पराक्रमी राजा जरादेखील न कचरता जंगलात शिरतो. वेताळाशी दोन हात करून त्याला पकडतो व खांद्यावर टाकतो. तो जायला निघतो तेवढ्यात खांद्यावर लादलेला वेताळ विचारतो, “ओरऽ कधा सोल्टऽ”? (एक गोष्ट सांगू?)!! ही सुरुवात आहे पुष्कर-गायत्री यांच्या “विक्रम-वेधा”ची. अॅनिमेटेड सिक्वेन्समध्ये दिसणारा हा दृश्यक्रम त्या वाक्यासोबतच लाईव्ह-अॅक्शनमध्ये परिवर्तित होतो आणि काही समजायच्या आतच प्रेक्षकांना एका भरीव कथानकात शोषून घेतो. चित्रपट संपल्यावरही तुम्ही त्यातून बाहेर पडू शकत नाहीत. एन्काऊंटर स्पेशालिस्ट विक्रम (आर. माधवन) हा उत्तर मद्रासमधील डॉन वेधाला (विजय सेतुपती) शोधतोय. वेधा, ज्याच्या भयकारितेच्या नुसत्या कथाच सांगितल्या जातात, जो अपराध …Read more »
जीओटी आणि भारतीय प्रतिभा
“गेम ऑफ थ्रोन्स” ही जगभरात पाहिली जाणारी, कदाचित जगातली आजघडीची सर्वाधिक प्रसिद्ध मालिका आहे. पण या मालिकेच्या न भूतो न भविष्यति यशात भारताचा सिंहाचा वाटा आहे, हे आपणापैकी किती जणांना ठाऊक आहे? या मालिकेच्या एकूणएक सूक्ष्मातिसूक्ष्म तपशीलांवर बारीकसारीक काम केलेले दिसते. अगदी प्रत्येक संस्कृतीच्या पोषाखांमध्ये आणि विविध ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या वस्त्रप्रावरणांमध्येदेखील अनेक अर्थ लपलेले आहेत. हे कपडे, तंबू वगैरे कुठे तयार होतात माहितीये? आपल्या दिल्लीतल्या लाजपतनगरमध्ये! अगदी पहिल्या पर्वापासून लाजपतनगरमधील “रंगारसन्स” ही कंपनी मालिकेतील सर्व वस्त्रप्रावरणे पुरवते. आणि सांगतो! ड्रॅगन्स!! अतिशय तपशीलवार तयार केलेले हे घातक परंतु आपल्या लाडक्या आईसाठी जीवाची बाजी लावणारे प्राणी कुठे तयार होतात माहितीये? आपल्या मुंबईतल्या …Read more »
बुद्धिमतां वरिष्ठम्
सुग्रीवाने फक्त सीता कुठे आहे, याचाच शोध लावायला सांगितले होते (किष्किंधा. सर्ग ४१). त्याप्रमाणे हनुमानाने सीतेचा शोध लावलादेखील (सुंदर १५). वास्तविक सुग्रीवाने सांगितलेले काम इथेच संपले होते. आता कुणी प्रश्न विचारेल, मग लंका जाळण्याची काय गरज होती, काम तर झाले होते ना? पण लक्षात घ्या, सांगितले तेवढेच काम करतो तो असतो सांगकाम्या! हनुमान काय सांगकाम्या होता का? वाल्मिकींनी जागोजागी हनुमानाचे वर्णन केलेले आहे. किष्किंधाकांड सर्ग २ येथे तो सुग्रीवाचा मंत्री आणि सचिव (श्लो. ५, १२) असल्याचे सांगितले आहे. त्याच सर्गात हनुमानाला उद्देशून वाक्यकोविद (श्लो. १३) अर्थात चर्चा आणि वाटाघाटी करण्यात कुशल, असे विशेषण वापरले आहे. पुढे सर्ग ३ येथे तर …Read more »
आत्मार्पण
या माणसाने देशासाठी घर सोडले, पदवी सोडली, सनद सोडली, नोकरी-व्यवसायाची संधी सोडली, पैसा सोडला, आरोग्य सोडले, ज्ञातिगत अस्मिता सोडली, संसारावर उदक सोडले आणि वेळ आली तेव्हा कर्तव्यतृप्तीने क्लांत देहदेखील सोडला. मी बोलतोय सावरकरांबद्दल. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांबद्दल. मी कधीच आजच्या दिवसाचा उल्लेख पुण्यतिथी म्हणून करत नाही, तर आत्मार्पणदिन म्हणून करतो ते यासाठीच. सावरकरांचे प्राण काळाने हरले नाहीत. किंबहूना तितकी काळामध्ये हिंमत तरी होती की नाही, हाच प्रश्न आहे. सावरकरांनी केलेय ते आत्मार्पण! होय, हिंदूधर्मातील शाश्वत सन्यासपरंपरेतील अनेकांनी गेली सहस्रावधी वर्षे केले तेच सहर्ष आत्मार्पण. ज्यावेळी सावरकरांना जाणीव झाली की, मातृभूमीच्या विमोचनार्थ आपण हाती घेतलेल्या व्रताचे उद्यापन झाले आहे, हिंदू समाजासाठी …Read more »
येणें वाग्यज्ञें तोषावें

२००४ चा सुमार होता. नुकताच कॉलेजला प्रवेश केलेला तो, आजूबाजूचं मोकळं वातावरण पाहून जरासा बुजला होता. शिकायला जायचं, पण गणवेषाची सक्ती नाही; अश्या छोट्याछोट्या गोष्टीदेखील त्याला अचंबित करायला पुरेश्या होत्या. त्या कॉलेजमध्ये अनेक दशकांपासून चालत आलेली एक नावाजलेली वादविवाद स्पर्धा व्हायची. सूचना पाहून त्यानेसुद्धा नाव दिलं. आयुष्यात कधी स्टेजवर जाऊन काही बोललेला नाही. पण वाचायचा भरपूर. भरपूर म्हणजे, पुस्तकं खायचा तो अक्षरशः! कुठेकुठे थोडंफार लिहायचादेखील. या शिदोरीच्या जोरावर, त्याने स्पर्धेत नाव दिलं. मुद्देसूद विषय तयार केला. आठ अधिक दोन मिनिटे वेळसुद्धा कदाचित पुरणार नाही, इतके मुद्दे निघाले. स्पर्धेआधी पात्रता फेरी होती. कॉलेजच्याच एक कला विभागाच्या प्राध्यापिका ती फेरी घेणार होत्या. …Read more »
ख़याल
कई दफ़ा खयाल, बयाँसे ज्यादा खुबसुरत होते हैं, और हर इक बयाँ के पीछे होते हैं सैकडों मुर्दा ख़याल! नज़्मोंकी तआरीफ करते हैं लोग, ख़यालोंके नआले कौन सुनता हैं? फूटे अल्फ़ाज़, चीखते ख़यालोंसे ज्यादा भाते हैं शायद!! ऐ मेरे ख़याल, ऐ मेरी कल्पना.. इक तुम्हींपे तो लिखता हूँ मैं नज़्में, बयाँ करता हूँ तुम्हारा हुस्न, जो पकडमें नहीं आता, फिसल जाता हैं.. सच कहता हूँ.. मेरी नज़्मोंसे कहीं ज्यादा खुबसूरत हो तुम, जँचती हैं वह तुमसे! इक तुम्हाराही तो आसरा हैं उन्हें.. वरना नज़्मोंका क्या हैं.. उडते परीन्दे हैं महज, ना कोई ठिकाना – ना कोई आशियाँ..! — © विक्रम.
Categories
- A R Rahman (17)
- Bajirao (5)
- Bhagavad Geeta (5)
- Books (5)
- Cinema (59)
- Comics (3)
- Hindutva (42)
- History (53)
- Music (11)
- Poetry (55)
- Politics (52)
- Pravaas Chitre (3)
- Ramayana (9)
- Reviews (64)
- Savarkar Katha (3)
- Sawarkar (7)
- TV (27)
- Uncategorized (18)
- Vaidik Knowledge (18)
- कथा (12)
- स्फुट लेख (29)
Vikram Edke’s Lyrics in ‘Rotaract CHANGE Anthem’
Menu
Recent Posts
- A Masterclass In Paradox July 25, 2023
- दक्षिणपंथी – यातिसई June 17, 2023
- अर्धवट शिजलेली थाळी – पोन्नियिन सेल्वन २ May 4, 2023
- गेमसारखाच – टेट्रिस! April 9, 2023
- रावणाचं फर्स्ट इम्प्रेशन! October 3, 2022
- मर्यादांमध्ये अडकून पडलेला – पोन्नियिन सेल्वन: १ October 1, 2022
- टबू – असंतांची गोष्ट September 10, 2022
- मार्मिक भाष्याने समृद्ध – बिफॉरेनर्स May 10, 2022
- आरआरआर — भारताची कथा भारताच्या भाषेत जगाला सप्रेम! March 28, 2022