
डॉक्युमेंटरी अथवा माहितीपट हा प्रकार आपल्याला ऐकून आणि पाहून चांगलाच परिचित आहे. जेव्हा डॉक्युमेंटरी हा प्रकार कथाकथनाचे साधन म्हणून मांडला जातो, तेव्हा मात्र त्यातून फिल्ममेकिंगची एक वेगळीच शैली निर्माण होते, त्या प्रकाराला म्हणतात मॉक्युमेंटरी, अर्थातच मॉक-डॉक्युमेंटरी! तसं बघायला गेलं तर डॉक्युमेंटरी आणि मॉक्युमेंटरी यांच्यात फारसा फरक नसतोच. बऱ्याचशा डॉक्युमेंटरीज या एखाद्या विशिष्ट विचारसरणीला वाहून घेतलेल्या, काय निष्कर्ष काढायचाय हे आधीपासूनच पक्के ठरवून असलेल्या आणि त्याच दृष्टीने सबंध मांडणी करणाऱ्या असतात, हे उघड गुपित आहे. फक्त त्या आपल्या झुकावाला निष्पक्षतेचा बेमालूम मुखवटा चढवतात. तर मॉक्युमेंटरीमध्ये कथावस्तूपासून पात्रांपर्यंत सगळेच नकली असते. त्या अनुषंगाने बघायला गेलं तर बऱ्याचशा मॉक्युमेंटरीज या डॉक्युमेंटरीजपेक्षा जास्त प्रामाणिक …Read more »