Category Archives: कथा

खेळ

“Boom Beach मध्ये ना आपल्याला एक आयलंड दिलेलं असतं. त्यावर आपला बेस बनवायचा, रिसोर्सेस प्रोड्युस करायचे. तसेच दुसरे बीचेस शोधून त्यांच्यावर अटॅक करायचा. आणि ते जिंकून घ्यायचे”! पाच वर्षांचा अर्णव बाबांना उत्साहाने सांगत होता. त्याचे बाबा, विख्यात अॅस्ट्रोफिजिसिस्ट डॉ. ज्ञानेश्वर लॅपटॉपवर काम करता करता नुसतेच “हं” म्हणाले! “मी आत्ता लेव्हल 47 ला आहे, माहितीये. हे तर काहीच नाही, पार्थिव तर लेव्हल 61 वर आहे पार!”, बाबा ऐकताहेत म्हणून अर्णवने माहिती पुरवणे चालूच ठेवले. “पण काय रे, ज्या आयलंडवर तुम्ही हल्ला करता, त्यांचेसुद्धा डिफेन्सेस असतीलच ना?”, लॅपटॉपच्या टकटकाटाच्या पार्श्वभूमीवर डॉ. ज्ञानेश्वरांनी विचारले. “असतात ना”, अर्णव सांगू लागला, “आपण अटॅक करायला नेमकं …Read more »

आत्मबोध

‘धप्प’ असा जोरदार आवाज झाला आणि अरुळसामीने आवाजाच्या दिशेने पाहिले. काय घडले, हे लक्षात यायला क्षणभरही नाही लागला त्याला.लागलीच बोंब ठोकली त्याने! त्याचा आवाज ऐकून बघता-बघता इतर नावाडीही आसपास जमा झाले त्याच्या. “काय झालं रं बोंबलायला”, एकाने विचारलं! “त्यो.. त्यो सन्याशी.. त्यो मला दर्यापारच्या फत्तरावर न्हे म्हनत हुता.. त्यानी समिंदरात उडी मारलीन् ना..” कुणाला काहीच लक्षात येईना हा काय सांगतोय ते. मग पुन्हा पुन्हा खोदून विचारल्यावर तुकड्या तुकड्यांनी माहिती हाती लागू लागली ती अशी की, एक कुणीतरी सन्यासी, ‘पलिकडे श्रीपादशिलेवर पोहोचवशील का’, असं विचारत नावाडी अरुळसामीकडे आला होता. हे तर अरुळसामीचे रोजचेच काम! त्याने ताबडतोब नेण्या-आणण्याचा दर सांगितला. सन्याश्याकडे तर …Read more »

जय हो ‘रहमान’भाई!!

रात्रीचे दहा वाजून गेलेले. चेन्नईच्या ‘अपोलो कॅन्सर हॉस्पिटल’मध्ये सर्वत्र निजानीज झालेली. स्पेशल रुम क्र. १३३५ मध्ये लहानग्या निहारिकाचीही झोपायची तयारी चालू होती. अवघी पाच वर्षांची पोर. आजच केमोथेरपीचे एक सत्र संपले होते तिचे. आई — निखिला, बिछाना नीट करून देत होती तिचा. सर्व तयारी मनासारखी झाल्यावर निहारिकाने हळूच आईच्या डोळ्यांत पाहिले. “हो माहितीये मला”, आई निखिला हसून म्हणाली. आणि तिने आपल्या मोबाईलवर मंद आवाजात ‘हायवे’ चित्रपटातले गीत ‘सूहा साहा’ लावले. गेले काही दिवस हा रोजचाच दिनक्रम (की रात्रीक्रम!) झाला होता दोघींचा. रोज झोपताना निहारिकाला ‘सूहा साहा’ ऐकायचेच असायचे. काही दिवसांपूर्वी या गीताची जागा ‘कडल’मधील ‘सिथ्थिरई निला’ कडे होती. त्याआधी निहारिकाला …Read more »

कथा

जुनी गोष्ट आहे. त्याकाळी खूप फळं होते. परंतू सफरचंद सगळ्यांमध्येच सर्वश्रेष्ठ होते. त्याचा रंग, आकार, चव सारे काही दैवी! लोकांनाही इतर फळेही आवडायची, मात्र सफरचंद सगळ्यात जास्त आवडायचे. काळ पुढे पुढे जात राहिला. काही वर्षांनी एक नवीन फळ आले – आंबा! त्याची चव, रंग, आकार, सुवास सारेच निराळे! नुसता जवळ घेतला तरी मन मोहरून जायचे अक्षरशः! साहजिकच कित्येक सफरचंद-रसिक आंब्याकडे वळले. त्यांना आता आंबाच सर्वश्रेष्ठ वाटू लागला. आंबा होताच तेवढा गुणी!! परंतू यासोबतच आणखीही काही घटना घडल्या. ज्यांनी केवळ आणि केवळ सफरचंदालाच आपल्या ह्रदयसिंहासनी बसवले होते, ते केवळ सफरचंदाशीच निष्ठावान राहिले. त्यांच्या दृष्टीने आंबा मुळातच चुकीचा, निकृष्ट ठरला. त्यांनी त्याला …Read more »

सागरा प्राण तळमळला..!

ब्रायटन गावातली ती सायंकाळ तशी नेहमीसारखीच तर होती. तेच वातावरण, तीच पक्ष्यांची किलबिल, तीच फिरायला आलेली कुटूंबे.. क्वचित काही प्रेमी जोडपी.. आणि नित्यनेमाने फिरायला येणारे तेच दोघे. दोन काळे तरुण. त्या वर्तमान खेडेगावाच्या दृष्टीने काहीसे दुर्लक्षित, परंतू इतिहासाच्या आणि भविष्याच्या दृष्टीने मात्र अत्यंत महत्वाचे. त्यांच्यापैकी एकाचे नाव होते निरंजन पाल. आणि कुणाला सांगून खरे वाटले नसते की, जो दुसरा मुळचा अतिशय रुपवान परंतू सध्या आजाराने खंगून गेल्यासारखा वाटणारा पंचविशीतला तरुण होता त्याने आत्ता काही दिवसांपूर्वीच ज्या साम्राज्यावरून म्हणे कधी सूर्य मावळत नाही ते – जगद्व्यापी ब्रिटीश साम्राज्य – पार मुळापासून हादरवून सोडले होते. तो जरी सध्या अतिशय कृश, अक्षरश: मरणप्राय …Read more »

अब ये चने हिंदू हैं..!!

लहानश्या जागेत दाटीवाटीने विद्यार्थी बसले होते. एक एक विद्यार्थी म्हणजे निर्ढावलेला बदमाष. कुणी चोर तर कुणी दरोडेखोर, कुणी बलात्कारी तर कुणी खुनी. प्रत्येकाचे गुन्हे वेगळे आणि त्या गुन्ह्यांमागची कथाही वेगळी. परंतू त्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट मात्र समान होती – काळे पाणी! होय, ते सारेच्या सारे अट्टल गुन्हेगार काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवण्यात आलेले कैदी होते! इथं यायचं, शिक्षा भोगायची, नशीब असलं तर परत जायचं नाहीतर इथेच राम म्हणायचा; अशी अवस्था. ममं बोथट झालेली आणि जाणीवाही! परंतू या अज्ञानतिमिरात अचानकच एक उषेचा, नव्हे नव्हे – आशेचा किरण डोकावू लागला होता – “बडे बाबूं”च्या रुपाने! जगासाठी असतील ते बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर, परंतू …Read more »

बाळा तुझे नाव नाही सांगितलेस?

टाळ्यांच्या कडकडाटातच तो तरुण खाली बसला. तरुण कसला, १५ वर्षांचा मुलगाच तो! तब्बल दोन मिनिटे टाळ्या वाजत होत्या. सलग! पण नुसत्या टाळ्याच नव्हत्या बरं..! त्या कडकडाटातही श्रोत्यांचे आवाज येतच होते. कुणी म्हणत होतं, “काय बोललाय छोकरा.. आजवर एवढी व्याख्यानं ऐकली पण एवढ्या लहान मुलाने असं भाषण दिलेलं..? अंहं! कधीच ऐकलं नव्हतं!!” त्यावर एकजण म्हणाला – “दुसरा लोकमान्य होणार हा, लिहून घ्या!!” तर तिसऱ्याचे, “पण केवढा सुकुमार आहे नाही? देखणा.. राजबिंडा!” यावर चौथा, “हो ना, वाटतंय की आपल्या या छोट्याश्या दहिवली गावात कुणी राजपुत्रच अवतरलाय. देखणा, विद्वान आणि खिळवून ठेवणाऱ्या व्यक्तिमत्वाचा धनी..!” लहानग्यांची आणि किशोरांची वक्तृत्वस्पर्धा होती ती. होता होता स्पर्धा …Read more »

भेट: इतिहासकाराची इतिहासाशी!!

सावरकरांना देशाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर ढकलण्यासाठी इंग्रजांनी त्यांना रत्नागिरीत स्थानबद्ध केले खरे. परंतू सावरकरांच्या व्यक्तिमत्वाची मोहिनीच इतकी काही जबरदस्त होती की, लवकरच आडगावी असलेले रत्नागिरी शहर हिंदुस्थानच्या गुप्त राजकारणाचे महत्वपूर्ण केंद्र बनले. सावरकरांना भेटायला येणाऱ्यांचा, चर्चा-मसलती करणाऱ्यांचा ओघच रत्नागिरीत सुरू झाला. मोहनदास गांधींपासून ते थेट अलीबंधूंपर्यंत सगळ्यांनाच रत्नागिरीत यावे लागले. त्याकाळी सावरकर रत्नागिरीच्या पटवर्धनांकडे मुक्कामी होते. असेच दुपारच्या वेळी दार वाजले म्हणून पाहातात तर काय, दारात एक वयोवृद्ध व्यक्ती उभी. वयोवृद्ध असली तरी चेहऱ्यावरील बुद्धिमत्तेची आभा मात्र चिरतरुण होती. “कोण?”, सावरकरांनी हलकेच विचारले. “मी  बडोद्याचा सरदेसाई. इतिहास लिहितो म्हणून तुम्हाला कदाचित माहिती असेल”. सावरकर चमकलेच, “म्हणजे… तुम्ही.. रियासतकार…”? सावरकरांच्या नजरेसमोरून …Read more »

मानवाधिकारछाप गोष्ट

एकदा काश्मीरातील एका जिहादी आतंकवाद्याने तीन जणांना पकडले – एक पुढारी, एक मानवाधिकारछाप (हा शब्द “कछुआछाप”च्या चालीवर वाचावा) पत्रकार बाई आणि एक भारतीय जवान! आतंकवादी म्हणाला, “तुम्ही तिघंही आता मरणार आहात. काही शेवटची इच्छा असेल तर बोला”. इच्छापूर्ती म्हटली की सर्वात पुढे पळण्याचा पुढार्यांचा स्वभावच असतो! आपले पुढारीबुवाही त्याला अपवाद नव्हते. पण इच्छा पूर्ण झाली की लगेच मरावे लागणार या कल्पनेने ते काहीच बोलले नाहीत. अतिरेक्याच्याच काय मनात आलं कुणास ठाऊक, त्याने पुढार्याकडे बोट दाखवले, “तू बोल”. पुढार्याने क्षणभर विचार केला. म्हणाला, “आयुष्यभर मला कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहायची, त्यांच्याकडून जयजयकार ऐकायची सवय. तुही माझ्या नावाने ‘की जय..!’ असे ओरड आणि हा जयघोष …Read more »

मेरा रंगदे बसंती चोला…

तिघा वीरांना फाशी होणार हे आता नक्की झालं होतं. तीन वीर – भगतसिंह, राजगुरु अन् सुखदेव – भारतमातेच्या उद्धारासाठी जन्माला आलेली त्रिमूर्तीच जणू! अवघ्या विशी-बाविशीतली कोवळी पोरं, परंतू आपलं आयुष्य आता संपणार याचं वैषम्य वाटण्यापेक्षा आपलं जीवन कृतार्थ झालं, याची धन्यताच त्यांच्या चेहर्‍यावर झळकत होती. जन्मठेप न होता फाशी झाली याचं दु:ख होत नाही का, असं कुणीतरी विचारताच राजगुरु सहजपणे म्हणाले, “अहो, जन्मठेपेवर गेलो असतो तर मरायला वेळ लागला असता. त्यापेक्षा फाशीने चटकन् मरु म्हणजे स्वातंत्र्यलक्ष्मीच्या सेवेसाठी पटकन् पुन्हा जन्मासही येता येईल, काय!” आणि मिष्किल हसत टाळीसाठी हात पुढे केला! हे धैर्य!! इकडे सबंध देश या तिघांसाठी आक्रंदत होता. आझादही अस्वस्थ …Read more »