Category Archives: Cinema

रुचकर तरीही अपुरा – सीताकाती

जयन्ति ते सुकृतिना: रससिद्धा: कवीश्वरा: । नास्ति येषां यश:काये जरामरणजं भयम् ।। कला म्हातारी होत नाही, किंबहूना कला कधीच मरत नाही. ती अजर असते, अमर असते. हे आपण नेहमीच तात्त्विक रूपाने आसपास पाहातो, अनुभवतो. असेच अय्या आदिमूलम (विजय सेतुपती) हे रंगमंचावरील निष्णात अभिनेते आणि दिग्दर्शक. वयाच्या दहाव्या वर्षापासून हा माणूस रंगमंचालाच सर्वस्व मानून वावरतोय. त्यांच्या अभिनयपटूतेला पाहून अनेक नावाजलेल्या चित्रपट दिग्दर्शकांनी त्यांना सिनेमाची ऑफर दिली, परंतु त्या साऱ्या धुडकावून त्यांनी फक्त आणि फक्त रंगभूमीची सेवा केली आजवर. आता काळ बदललाय. लोकांना जिवंत रंगभूमीपेक्षा रंगीबेरंगी चित्रपट जास्त भुरळ घालू लागलेयत. रंगमंच ओस पडू लागलेयत. तरुणाई त्याकडे पाठ फिरवू लागलीये. जसजसा जनप्रवाह …Read more »

2.0 नव्हे, ‘शंकर 2.0’

मी परवाच एका व्याख्यानात बोललो होतो की, दिवसेंदिवस आपण सारेच तंत्रज्ञानावर नको तितके अवलंबून राहू लागलोय. याचे शारीरिक, मानसिक परिणाम कल्पनातीत आहेत. जणू काही एखाद्या टाईमबॉम्बचं टायमर सुरू करून त्यावर बसलो आहोत आपण. तो फुटेल तेव्हा काय होईल? भयंकर कल्पना आहे ही! भारतीय चित्रपटसृष्टीतील खऱ्या अर्थाने शो-मन म्हणावा अश्या दिग्दर्शक शंकरचं सगळ्यांत मोठं वैशिष्ट्य काय आहे माहितीये? तो अश्याच रोजच्या आयुष्यातल्या कल्पना घेतो. सत्य हे कल्पनेहून भंयकर असतं म्हणतात, परंतू शंकर त्या कल्पनेला सत्याहूनही भयंकर कल्पनेचा तडका देतो. त्यातून साकारतो तो शंकरचा कोणताही अतिप्रचंड सिनेमा! “2.0”ची कल्पनाही अशीच साधी. मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे पक्ष्यांना विकिरणांचा होणारा त्रास सबंध मानवजातीला (जशी हॉलिवूडच्या …Read more »

वृत्तावर्त

सुरज ढलता है तो, और जग में जलता है वह, अस्त-उदय खेल है यह भेद बुद्धी का! मृत्यू ध्रुव है तो, जन्म भी तो ध्रुव होगा, जनन-मरण चक्र है यह भेद दृष्टी का! अमावस के पीछे पौर्णिमा, कालिमा के आगे रक्तिमा, वृत्तावर्त से बना है भवसमुद्र सारा! धानानानानानाना..!! अधर्म के मार्ग पुष्प उगते, धर्ममार्गपर है शूल चुभते! पाप को चाहे यदि तजना, पुण्य की भी रस्सी क्यूँ ना छोडे! पाप क्या क्या धर्म (मुद्रा), पुण्य क्या अधर्म (के आयाम), एक को हम जो दे (मिटा किंतु), मुद्रा तो तब भी घूमेगी ना! धानानानानानाना..!! — © विक्रम श्रीराम एडके । ========================= …Read more »

मुकम्मल ग़ज़ल : ९६

रात्रीचे जवळजवळ साडेअकरा वाजलेयत आणि मी एका पंक्चरवाल्याच्या दुकानात बसून हे लिहितोय. घरी जायला अजून एखादा तास लागेल. एखादा तास मी थांबू शकत नाही का? मी थांबू शकतो. अंतर्मनात उसळणारा समुद्र नाही थांबू शकत. अर्ध्या तासापूर्वी सी. प्रेमकुमारचा “९६” बघून बाहेर पडलोय. तेव्हापासून सैरभैर झालोय मी. बऱ्याच वर्षांनंतर पडद्यावरच्या प्रेमकहाणीसाठी, त्या पात्रांसाठी, ते कुणीतरी जवळचे, सगे-सोयरे असल्यासारखी काळजी वाटली मला. आणि आता मी इथे डोकं खाजवत बसलोय की, मी या चित्रपटाबद्दल निष्पक्ष लिहू शकेन का? की पुरात वाहावत जाईन मी? कधीकधी बाजू घेणंच खरी निष्पक्षता असते! प्रेमाची स्वतःची एक भाषा असते, भावनेची! आणि या भावनेला जेव्हा शब्दांचा स्पर्श होतो, तेव्हा …Read more »

गॉडफादरचे महाभारत : चेक्का चिवंता वानम

रामायण-महाभारत यांची आजवर जगात इतक्या वेगवेगळ्या चित्रपटकारांनी वेगवेगळ्या पद्धतींनी मांडणी केलीये की विचारता सोय नाही. पण एखाद्या चित्रपटाच्या बाबतीत मात्र हा मान जर कुणाला मिळाला असेल तर तो फक्त आणि फक्त फ्रान्सिस फोर्ड कपोलाच्या “गॉडफादर”लाच (१९७२)! मुळचीच सशक्त कथा आणि तिची पडद्यावरील तितकीच ताकदवान मांडणी. “गॉडफादर”ने सिनेमाच्या मांडणीच्या क्षेत्रात इतकी वेगवेगळी दालने खुली केली की, तेव्हापासून आत्तापर्यंत माफियांवर जेवढे म्हणून काही सिनेमे बनले असतील त्यांच्यावर कुठे ना कुठे “गॉडफादर”चा प्रभाव हा दिसतोच. कधी अजाणतेपणी तर कधी जाणून-बुजून. वर मी रामायण आणि महाभारताचं उदाहरण दिलं ना, अगदी तसंच वेगवेगळ्या चित्रपटकारांनी आपापल्या दृष्टिकोनांप्रमाणे आणि अर्थातच वकूबांप्रमाणे “गॉडफादर”ची पुनर्मांडणी करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. …Read more »

ईसईज्ञानी

सिम्फनी लिहायला किती वेळ लागतो? मोठमोठे संगीतकार त्यासाठी ६ महिने ते १ वर्षसुद्धा घेतात. पण एक भारतीय कलाकार आहे ज्याने आजपासून पाव शतकापूर्वी सिम्फनी लिहिलीये. सिम्फनी लिहिणारा तो भारतातलाच नव्हे, तर आशिया खंडातला पहिलाच संगीतकार आहे. त्याला किती काळ लागला माहितीये? ६ महिने? एखादं वर्षं? १९९३ साली लंडनच्या रॉयल फिलहार्मनिक ऑर्केस्ट्राला घेऊन त्याने ही सिम्फनी अवघ्या १३ दिवसांत लिहिलीये! आणि तिचा दर्जा ऐकून इंग्लंडमधील त्या प्राचीन वाद्यवृंदाने आश्चर्याने तोंडात बोटे घातली होती. सांगायची गरजच नाही की, हा पराक्रम करण्याची ताकद असलेला केवळ एकच संगीतकार सबंध जगात आहे, ‘ईसईज्ञानी’ इलयराजा!! राजा प्रसंग ऐकतो. जागच्या जागी चाल लिहितो. आणि अवघ्या ५ मिनिटांत …Read more »

आठवणींच्या गल्लीबोळांतून

नव्वदचं दशक हे अनेक अर्थांनी नॉस्टॅल्जियाचं दशक आहे. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या अनेकांसाठी ते नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद, जतिन-ललित अश्या जोड्यांनी, अन्नू मलिक वगैरेंसारख्या सफाईदार “बाजीगरां”नी व विजू शाहसारख्या अनेकानेक अंडररेटेड माणकांनी बनवलेल्या आणि कुमार, अलका, उदित वगैरेंनी बेभान होऊन गायलेल्या दिलतोड गीतांचं दशक आहे; तर नव्वदच्याच दशकात जन्मलेल्या आजच्या तरुणांसाठी ते इंडीपॉप गाण्यांमधील नव्या प्रवाहांत केलेल्या सचैल स्नानांचं दशक आहे. दोन्हीही प्रकारच्या मंडळींसाठी ते एकत्रितपणे समीरचंदेखील दशक आहे. आणि दोन्हीही प्रकारची मंडळी त्या दिवसांबद्दल बोलताना जरादेखील थकत नाहीत. याच दशकाने सोनू निगम, शान, केके, शंकर असे हिरेसुद्धा दिले! याच दशकाने शंकर-अहसान-लॉय दिले आणि याच दिवसांनी रहमान दिला!! त्यामुळे “आशिकी” (१९९०) …Read more »

मनोव्यापारांचा गूढ खेळ – जेराल्ड्स गेम

जेसी (कार्ला गुगिनो) आणि जेराल्ड (ब्रुस ग्रीनवूड) सप्ताहांत साजरा करण्यासाठी त्यांच्या अलाबामातील नदीकाठच्या घरी जातात. एकत्र वेळ घालवणं, मजा करणं आणि त्यायोगे आपलं रुक्ष होत चाललेलं वैवाहिक जीवन वाचवणं, हा त्यांचा हेतू असतो. परंतु जेराल्डची मजेची कल्पना जरा वेगळीच असते. प्रवासाला निघतानाच त्याने सोबत खरोखरीच्या हातकड्या घेतलेल्या असतात. तो जेसीला त्या हातकड्यांनी पलंगाला जखडून ठेवतो. आणि त्याची रेप फँटसी पूर्ण करण्यात तिला भाग घ्यायला लावतो. जेसीला ही कल्पना मनापासून आवडलेली नाहीये. परंतु ती तरीही प्रयत्न करते. तिला त्या प्रकाराची क्षणोक्षणी शिसारी येऊ लागते. ती जेराल्डला सोड म्हणते. आणि मी नाही सोडलं तर, जेराल्ड उत्तरतो. जेसी घाबरते. जेसी आणि जेराल्डच्या वयात …Read more »

इन नोलान वुई ट्रस्ट

अवघा ८ वर्षांचा होता तो, जेव्हा ‘नासा’त काम करणाऱ्या एका नातेवाईकाने त्याला ‘अपोलो’ मोहिमेच्या प्रक्षेपणाचे फुटेज पाठवले होते. पठ्ठ्याने ते आपल्या पद्धतीने संपादित केले आणि ‘स्टॉप मोशन अॅनिमेशन’ तंत्रज्ञान वापरुन आपली पहिलीवहिली फिल्म बनवली, “स्पेस वॉर्स” (१९७८)! त्याचे नाव ख्रिस्तोफर नोलान!! पुढे भविष्यात तो बनवणार असलेल्या “इंटरस्टेलर”सारख्या (२०१४) महागाथेची चुणूक ही अशी होती. पुढे ९०च्या दशकात त्याने खूप साऱ्या कॉर्पोरेट फिल्म्स आणि शॉर्टफिल्म्स बनवल्या. यातल्या बहुतांश त्याची तेव्हाची प्रेयसी व सध्याची पत्नी एमा थॉमसने प्रोड्युस केल्या होत्या. सिनेमा बनवण्याचे त्याचे प्रयत्न मात्र काडीमात्रही यशस्वी होत नव्हते. मोठाच निराशाजनक काळ होता तो. परंतु याच काळात त्याने आता जिला लोक शोधून शोधून …Read more »