Category Archives: History

होळी – विदेशी कापडांची आणि विदेशी अहंकाराचीही!

वंगभंगाच्या चळवळीने देश ढवळून निघाला होता. स्वदेशीची चळवळही फोफावू लागली होती. लो. टिळक आणि त्यांचे सहकारी सर्वत्र फिरून या विषयावर जागृती करत होते. दि. १ ऑक्टोबर १९०५ या दिवशी पुण्यातील सार्वजनिक सभेच्या दिवाणखान्यात साहित्यसम्राट न. चिं. केळकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. त्यात एका तरुण विद्यार्थ्याने विदेशी मालावरील बहिष्काराला ठसठशीत स्वरूप यावे म्हणून विदेशी कापडांची होळी करण्यात यावी (स्वा. सावरकर चरित्र, शि. ल. करंदीकर, आ. २०११, पृ. १०६) अशी कल्पना मांडली. तो तरुण म्हणजेच स्वा. विनायक दामोदर सावरकर! केळकरांना काही ही कल्पना पसंत पडली नाही. ते विदेशी कपडे जाळून फुकट घालवण्यापेक्षा अंध, पंग, रोगग्रस्त अशा बांधवांना वाटून टाकणे योग्य, असे त्यांचे मत …Read more »

सावरकरकृत अस्पृश्यता निवारण और सामाजिक एकता

वीर सावरकर जी की जीवनी अद्भुत, अदम्य साहसों से लबालब भरी हुई है । नेता, संगठक, क्रांतिकारी, इतिहासकार, राजनीतीज्ञ, युद्धनीतीज्ञ, वक्ता, समाज सुधारक, लेखक, लेखक के रूप में भी नाटककार, उपन्यासकार, कथाकार, कवि, कवि के रूप में भी खंडकाव्यकार, दीर्घकाव्यकार, महाकवि, शाहीर; और न जाने कितने ही पहलू मात्र एक ही व्यक्ति के है, इस पर कदाचित आने वाली पीढियाँ विश्वास भी न करें । सरल तरह से देखें तो उन के जीवन के जन्म से ले कर लंडन जाने तक का काल विद्यार्थिदशा, लंडन में क्रांतिकारी, अंदमान से ले कर रत्नागिरी तक बंदी, रत्नागिरी से ले कर बिनाशर्त मुक्तता …Read more »

दोन भेटी

बाजीराव ८ ऑक्टोबर १७३५ ला (Bajirao I – An Outstanding Cavalry General. Author Col. R. D. Palsokar. Pp 183) उदयपूरकडे निघाले. त्यांच्यासोबत सुमारे ८ ते १० सहस्र सैन्य होते. त्याशिवाय इतर मराठी फौजा मेवाड ते बुंदेलखंडदरम्यान (Palsokar. Pp 183) पसरलेल्या होत्या. जानेवारी १७३६ च्या अखेरीस त्यांनी तापी ओलांडली (Selections of Peshwa Daftar. Author G. S. Sardesai. Vol. 14.42 quoted at The Era of Bajirao. Author Uday S. Kulkarni. Pp 205). पुढे उदय कुलकर्णी (Pp 206-07) वंशभास्करच्या (Vol. 6) हवाल्याने एक घटना देतात. अशीच घटना ई. जयवंत पॉल (Bajirao The Warrior Peshwa. Pp 145) सर जदुनाथ सरकारांच्या हवाल्याने देतात. घडले असे …Read more »

अपेक्षाभंग करणारा : मणिकर्णिका

१८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील झाशीच्या राणीचे स्थान केवळ मराठीजनांसाठीच नव्हे, तर सबंध भारतीयांसाठीदेखील कायमच गौरवाचे राहिले आहे. राणीवर आजपर्यंत खूप सारे साहित्य लिहिले गेले, मालिका बनल्या, चित्रपटही बनले. परंतु जेव्हा के. व्ही. विजयेंद्र प्रसाद, प्रसून जोशी, राधाकृष्ण जगर्लामुडी आणि कंगना राणावतसारखे दिग्गज या विषयासाठी एकत्र आले तेव्हा बनणारी कलाकृती निश्चितच वेगळ्या दर्जाची असणार होती. पण बुद्धीमंतांचा एक दोषच असतो की, बरेचदा ते एकत्र आल्यावर त्यांच्या बुद्धीच्या बेरजा होण्याऐवजी एकमेकांना छेद देऊन भागाकार तेवढा होऊन बसतो. माझ्या दृष्टीने ‘मणिकर्णिका’मध्येही तेच झाले. सुरुवातीपासूनच कंगना आणि क्रिशमध्ये दिग्दर्शनावरून वाद होते, हे सर्वश्रृत आहे. कोण चित्रपटाची माती करत होतं आणि कुणी कोणते प्रसंग दिग्दर्शित केले …Read more »

नव्या भारताचा नवा चित्रपट : उरी – द सर्जिकल स्ट्राईक

१८ सप्टेंबर २०१६ यादिवशी पाकिस्तानच्या चार आतंकवाद्यांनी काश्मिरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील आपल्या सैन्यतळावर हल्ला केला. आपण त्या चारही आतंकवाद्यांना नरकात धाडले परंतु हे होईपर्यंत आपले सुमारे एकोणावीस जवान हुतात्मा झाले होते तर सुमारे ऐंशी ते शंभर जखमी. युद्धाची दाहकता ही अशी असते आणि ती कधीच एकतर्फी शांतता राखून कमी होत नाही. आपण जर याचे काही उत्तर दिले नसते, तर उलट त्या अतिरेक्यांच्या मालकांची हिंमत अजूनच वाढली असती. आणि म्हणूनच भारत सरकारने आणि आपल्या भारतीय सैन्याने निर्णय घेतला सर्जिकल स्ट्राईक करण्याचा! शरीरावर शल्यकर्म करताना जसे फक्त त्या रोगग्रस्त भागापुरतेच केले जाते, तसाच हा हल्लादेखील सर्जिकल अर्थातच लक्ष्यांपुरता मर्यादित असतो. यात …Read more »

कॉमिक्सच्या विश्वातले रामायण : नागायण

कलियुग हे आसुरी शक्तींचं युग आहे. त्रेता आणि द्वापारातच आसुरी शक्तींनी प्रचंड उच्छाद मांडलेला असताना, कलीत त्या शक्ती चरमसीमेवर नसतील तरच नवल! अशीच एक प्राचीन कृष्णशक्ती पृथ्वीवर आलीये. मागच्या अनेक युगांतरी तिचा ब्रह्मांडावर नियंत्रण मिळवण्याचा डाव फसला होता. परंतु हे युग काळीम्याला पोषक आहे. यावेळी चूक होणेच शक्य नाही. सबंध विश्वावरच नव्हे तर सगळ्यांच मितींमध्ये आपलं काळं साम्राज्य पसरायचं असेल, तर एका चेहऱ्याची गरज आहे. कुठे मिळणार तो चेहरा? दुसरीकडे नागराजचा काका असलेला सैतानी नागपाशा अमृतप्राशन केल्यामुळे अमर आहे, परंतु तरीदेखील तो नागराजपुढे वारंवार हरतच आलाय. तो का प्रत्येकवेळी हरतो, याचे कारण शोधून त्याच्या कुटील गुरूंनी एक आगळाच प्रयोग आखलाय …Read more »

आत्मार्पण

या माणसाने देशासाठी घर सोडले, पदवी सोडली, सनद सोडली, नोकरी-व्यवसायाची संधी सोडली, पैसा सोडला, आरोग्य सोडले, ज्ञातिगत अस्मिता सोडली, संसारावर उदक सोडले आणि वेळ आली तेव्हा कर्तव्यतृप्तीने क्लांत देहदेखील सोडला. मी बोलतोय सावरकरांबद्दल. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांबद्दल. मी कधीच आजच्या दिवसाचा उल्लेख पुण्यतिथी म्हणून करत नाही, तर आत्मार्पणदिन म्हणून करतो ते यासाठीच. सावरकरांचे प्राण काळाने हरले नाहीत. किंबहूना तितकी काळामध्ये हिंमत तरी होती की नाही, हाच प्रश्न आहे. सावरकरांनी केलेय ते आत्मार्पण! होय, हिंदूधर्मातील शाश्वत सन्यासपरंपरेतील अनेकांनी गेली सहस्रावधी वर्षे केले तेच सहर्ष आत्मार्पण. ज्यावेळी सावरकरांना जाणीव झाली की, मातृभूमीच्या विमोचनार्थ आपण हाती घेतलेल्या व्रताचे उद्यापन झाले आहे, हिंदू समाजासाठी …Read more »

सावरकरांचे सामाजिक कार्य : एक वस्तुनिष्ठ आकलन

सावरकरांच्या आयुष्याचे ढोबळमानाने ५ कालखंड पडतात. पहिला जन्मापासून ते अटकेपर्यंत. दुसरा अंदमानपर्व. तिसरा रत्नागिरीपर्व. चौथा सुटकेपासून ते स्वातंत्र्यापर्यंत. आणि पाचवा स्वातंत्र्यापासून ते आत्मार्पणापर्यंत. ह्या कालखंडांपैकी रत्नागिरीपर्वात सावरकरांनी अतुल्य समाजकार्य केलेले दिसते. इतके की, डॉ. आंबेडकरांच्या “जनता”ने (एप्रिल, १९३३; संदर्भ: सावरकर-चरित्र, कीर, आ. २००८, पृ. २०८) सावरकरांच्या कार्याची तुलना थेट भगवान बुद्धांशी केली आहे. परंतु सावरकरांवर जे अनेक आक्षेप घेतले जातात, त्यात प्रमुख आक्षेप हादेखील असतो की, सावरकरांनी रत्नागिरीतून सुटल्यानंतर अथवा रत्नागिरीत स्थलबद्ध होण्याआधी कोणतेही सामाजिक कार्य केलेच नाही. सदर आक्षेपाला सावरकरद्वेषाचे, जातीद्वेषाचे आणि राजकारणाचे अनेक कंगोरे आहेत. आपण त्यामध्ये न पडता केवळ ह्या आक्षेपात कितपत तथ्य आहे याचा वस्तुनिष्ठपणे विचार …Read more »

हिंदू चैतन्याचे अवतार!!

बाजीराव सरकारांचे सार्वजनिक व्यक्तीमत्त्व कसे होते? चिमाजी अप्पा एका पत्रात लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३०), “वाटेस घोड्यावर बसोन चालले होते. तेव्हा एके गावचा पाटील भेटीस आला. तेव्हा असावध होते. त्यामुळे पाटलासी सहजात बोलले, जे कोंबड्यांचे प्रयोजन आहे. घेऊन येणे”. इथे चिमाजी खरे तर रागावून लिहितायत की, राऊंनी उघडउघड पाटलाकडे कोंबड्या मागितल्या. परंतु बाजीराव असेच होते. राजकारणात कुटील, मात्र त्याव्यतिरिक्त जे मनात असेल तेच ओठांवर ठेवणारे शिपाईगडी. ते उघडपणे मांसाहार करीत. मद्यप्राशन करीत. त्याकाळी पाहायला गेलं तर दोन्हीही ब्राह्मण्याला न शोभणाऱ्या गोष्टी. परंतु तसंच पाहायचं झालं तर, हिंदुपदपातशाही हे एकच उद्दीष्ट मनी बाळगून पायाला भिंगरी बांधल्यागत देशभर ससैन्य संचार …Read more »

सावरकर नावाचा ब्रॅण्ड!!

नव्याने विमानात बसणाऱ्यांची एक बेक्कार गंमत होते. उद्धरिणीने (लिफ्ट हो!) जाताना कसं वजनरहित वाटतं आणि डोकं पिसाहून हलकं होतं, तसं वाटतं. आणि त्या अवस्थेत प्रतितास शेकडो किलोमीटर वेगाने आपण हवेत तिरके भिरकावलो जात असतो!! बाऽबोऽऽ!! शब्दातीत अवस्था असते उड्डाण म्हणजे!! यात एक वेगळाच त्रास होतो. कान भयानक दुखतात. हवेचा दाब सतत बदलत असतो. त्यामुळे कानांवर प्रचंड ताण येतो. जरा कुठं वर-खाली झालं की, “पुटूक पुटूक” आवाज करत कानात लहानसे स्फोट होतात की “सुंईईईऽऽ..” आवाज करत अडकून राहिलेली हवा निघून जाते. परत नव्याने दाब. तात्पुरता बहिरेपणा येतो. उतरल्यावरही कित्येक तास कान दुखत राहातात. यासगळ्यात नाक व तोंड दाबायचं आणि प्रयत्नपूर्वक कानावाटे …Read more »