Category Archives: History

आनंदवनभुवनी

जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशावर, विशेषतः परधर्मीय देशावर आपला राजनैतिक आणि भौगोलिक अधिकार प्रस्थापित करतो; तेव्हा सगळ्यात आधी कोणते काम करत असेल, तर ते म्हणजे आपली जी कोणती संस्कृती असेल ती तिथे रुजवायचा प्रयत्न करतो. यातून काय साधतं? एकतर यामुळे तेथील लोकांना कमतर लेखून त्यांच्यावर राज्य करणं सोपं जातं. आणि दुसरा व सर्वांत महत्वाचा फायदा म्हणजे कालांतराने तेथील जनतेला आक्रमकांची संस्कृती (मग ती कदाचित पाशवी असली तरीही!) हीच आपली संस्कृती वाटू लागते, जेणेकरुन भविष्यात आक्रमकांचं त्या भूभागावरील राजकीय वर्चस्व जरी संपलं तरीदेखील संस्कृती प्रदुषित करुन ठेवल्यामुळे पिढ्यानपिढ्या तो भूभाग आक्रमकांचा सांस्कृतिकदृष्ट्या दासच बनून राहातो! याचं सर्वांत सोपं उदाहरण म्हणजे इंग्रजी …Read more »

उडी, नव्हे भारतीय स्वातंत्र्याची गुढी : भाग २

सावरकरांनी मार्सेल्स बंदरात उडी ठोकून जो ‘भूतो न भविष्यति’ पराक्रम केला आणि त्यांच्या ह्या कुटील डावाला बळी पडून मूर्ख इंग्रज पहारेकऱ्यांनीही त्यांना तसेच नौकेवर नेण्याचा गाढवपणा केला, त्याचे पडसाद अवघ्या जगभर उमटल्याचे आपण मागील लेखांकात पाहिलेच. ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की, दोन देशांतील वादांचा निकाल ज्या हेगस्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयात दिला जातो, त्या न्यायालयात सावरकरांपायी इंग्लंडला आणि सावरकरांच्या डावात ओढल्या गेलेल्या फ्रान्सलाही जावे लागले. तसा करारच दोन्हीही देशांत ४ आणि ५ ऑक्टोबरदिनी झालेल्या पत्रव्यवहारान्वये झाला. न्यायालयासमोर एकच विषय होता – Ought Vinayak Damodar Sawarkar, in conformity with the rules of International Law to be or not to be surrenderred by …Read more »

उडी, नव्हे भारतीय स्वातंत्र्याची गुढी!!

८ जुलै १९१० दिनी स्वा. सावरकरांनी त्रिखंडात गाजलेली उडी मारली. म्हणजे नेमकं काय केलं? गुडघ्यात मेंदू आणि त्या मेंदूलाही मूळव्याध झालेले बिग्रेडी सोडले, तर का त्या उडीला जगभरचे इतिहासकार एवढं महत्त्व देतात? सावरकरांनी उडी मारली ती ‘मोरिया’ नौका मार्सेल्स (फ्रान्स) येथील धक्क्यावर उभी असताना पोर्टहोलमधून! लक्षात घ्या, जहाज ते धक्क्याची भिंत हे अंतर आहे सुमारे ८.५ फूट. सावरकरांचा देह ५-५.५ फुटाचा. म्हणजे उडी मारताना सावरकरांना मोकळी जागा किती मिळतेय? अवघी २.५-३ फूट!! जरादेखील इकडेतिकडे झालं, तरी एकतर कपाळमोक्ष तरी होणार वा हातपाय तरी तुटणार! कारण पुन्हा पोर्टहोल ते समुद्रसपाटी ही उंची आहे सुमारे २७ फूट! एवढ्या उंचीवरुन सावरकर समुद्रात पडले. …Read more »

असल उत्तर

१९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धातली घटना आहे. पाकिस्तान आधीपासूनच जिहादी मनोवृत्तीचे राष्ट्र, त्यामुळे ते युद्धखोरीसाठी सातत्याने तयारच असायचे. त्यातच अमेरिकेने त्यांना एम-४७ आणि एम-४८ पॅटन रणगाडे पुरवल्यामुळे तर त्यांची ताकद काहीच्या काहीच वाढली होती. याउलट भारताकडे मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या वेळचे काही जुने एम-४ शेरमन रणगाडे, काही सेंच्युरियन रणगाडे आणि काही हलके एएमएक्स-१३ रणगाडे असे अत्यंत जुनाट आणि तुटपुंजे असे शस्त्रबळ होते. पाकिस्तानला ही गोष्ट पक्की ठाऊक होती. त्यामुळे त्यांनी एक योजना आखली. पंजाबच्या खेमकरण क्षेत्रात त्यांनी १-२ नव्हे तर चक्क २२० पॅटन रणगाडे उतरवले. त्यांच्यापुढे आपल्या मोजक्या युद्धसामग्रीचा टिकाव लागणे कदापिही शक्य नव्हते. एवढे प्रचंड बळ उतरवून खेमकरण क्षेत्र झटक्यात जिंकून घ्यायचे …Read more »

एका पेटंटची गोष्ट

आज आपण अगदी सहजपणे मोबाईल, रेडिओ इ. साधने वापरतो. परंतु या सर्व ‘बिनतारी संदेशवहना’चा (Wireless Telecommunication) शोध कुणी लावलाय माहितीये का? हा शोध लावणारी व्यक्ती एक भारतीय आहे, नव्हे आपल्या सर्वांच्या परिचयाचीदेखील आहे! त्यांचं नाव आहे, आचार्य जगदिशचंद्र बसू (१८५८-१९३७)!! होय, ‘वनस्पतींनाही जीव असतो’ ही हिंदूधर्मातील संकल्पना वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करणारे व त्या तत्त्वावर आधारित ‘क्रेसोग्राफ’ या यंत्राची निर्मिती करणारे प्रा. जगदिशचंद्र बसू!! ते नुसते वनस्पतीशास्त्रज्ञच नव्हते, तर भौतिकशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, पुरातत्त्वविद, आणि विज्ञानकथालेखकदेखील होते! एवढेच कश्याला, आज वापरात असलेल्या ‘रेडिओ’च्या निर्मितीचेही श्रेय प्रा. बसू यांनाच दिले जाते, हे सर्वच वैज्ञानिक प्रगतीसाठी पाश्चिमात्यांकडे आस लावून पाहाणाऱ्या भारतीयांच्या गावीही नसेल! मग चंद्रावरील एका …Read more »

आत्मबोध

‘धप्प’ असा जोरदार आवाज झाला आणि अरुळसामीने आवाजाच्या दिशेने पाहिले. काय घडले, हे लक्षात यायला क्षणभरही नाही लागला त्याला.लागलीच बोंब ठोकली त्याने! त्याचा आवाज ऐकून बघता-बघता इतर नावाडीही आसपास जमा झाले त्याच्या. “काय झालं रं बोंबलायला”, एकाने विचारलं! “त्यो.. त्यो सन्याशी.. त्यो मला दर्यापारच्या फत्तरावर न्हे म्हनत हुता.. त्यानी समिंदरात उडी मारलीन् ना..” कुणाला काहीच लक्षात येईना हा काय सांगतोय ते. मग पुन्हा पुन्हा खोदून विचारल्यावर तुकड्या तुकड्यांनी माहिती हाती लागू लागली ती अशी की, एक कुणीतरी सन्यासी, ‘पलिकडे श्रीपादशिलेवर पोहोचवशील का’, असं विचारत नावाडी अरुळसामीकडे आला होता. हे तर अरुळसामीचे रोजचेच काम! त्याने ताबडतोब नेण्या-आणण्याचा दर सांगितला. सन्याश्याकडे तर …Read more »

व्यासांची विज्ञानकथा

भगवान परशुरामांवर जाहीर व्याख्याने देणारा मी महाराष्ट्रातील बहुतेक एकमेव वक्ता असेन. ही व्याख्यानेदेखील मी पारंपरिक भक्तिचरित्रात्मक ढंगाने देत नाही; उलट परशुरामांच्या चरित्राचे सामाजिक क्रांतिकारक, मुत्सद्दी राजकारणी इ. आजवर फारसे कुणाला माहिती नसलेले पैलू उलगडून विस्ताराने सांगत असतो. त्या ओघात खूप साऱ्या राजवंशांचे व ऋषिवंशांचे सविस्तर वर्णन येते. विशेषतः परशुरामांच्या भार्गववंशीय पूर्वजांच्या कथा येतात. त्यादेखील मी विस्ताराने सांगतो. हेतू हा की, लोकांना समजावे – ज्याकाळात इतर तथाकथित संस्कृतींना लज्जारक्षणासाठी वल्कले गुंडाळण्याचीदेखील अक्कल नव्हती आली, त्याकाळापासून भारत देश हा नुसता प्रगतच नव्हता तर आपल्याकडील थोर पुरुषांच्या व्यवस्थित वंशावळी राखण्याइतका काटेकोरदेखील होता. बायबलमध्येही अश्या वंशावळी येतात, मात्र काही अपवाद वगळता त्यांच्यामध्ये सर्वत्र परस्परविसंगतीच …Read more »

डोवालसाहेबांच्या भाषणातले कटू तात्पर्य

हिंदुस्थानचे राष्ट्रीयसुरक्षा-सुमंत (‘सल्लागार’ या अरबी-उद्भव शब्दासाठी मी योजलेला संस्कृतनिष्ठ मराठी शब्द. एकतर शिवकालीन इतिहासामुळे ‘सुमंत’ सर्वांना माहिती आहे आणि शिवाय तो उपयोजण्यास सोपाही आहे! मूळ रामायणकालीन संस्कृत शब्द आहे ‘सुमंत्र’ अर्थात ‘चांगले सुचविणारा’!) श्री. अजित डोवाल यांनी तब्बल ७ वर्षे पाकिस्तानात हेरगिरी करत काढली आहेत. काही दिवसांपूर्वी ‘विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशन’च्या कार्यक्रमात सहभागी झाले असताना श्री. डोवाल यांनी स्वतःच एक अनुभव सांगितला होता. मला तो मोठा अर्थपूर्ण वाटल्यामुळे येथे सांगतोय. डोवालसाहेब पाकिस्तानात असताना मुसलमानवेष करून राहायचे. लाहौरला (प्रभू श्रीरामांचे सुपुत्र ‘लव’ यांच्या नावावरून असलेले मूळ हिंदू नाव ‘लवपूर’) एक मोठी ‘मज़ार’ आहे. तिथे ते एकदा गेले. धार्मिक विधी करीत असताना त्यांना …Read more »

नरकचतुर्दशीच्या निमित्ताने

व्याख्यानांच्या निमित्ताने प्रवास करताना मनुष्यस्वभावाचे अनेक नमुने पाहावयास मिळतात. वाईट कुणीच नसतं. केवळ व्यक्ती तितक्या प्रकृती एवढंच! असाच एके ठिकाणी गेलो असता, एक बाई भेटल्या. प्रचंड स्त्रीवादी! पितृसत्ताक पद्धती झुगारून समानता मागता मागता हल्लीच्या बहुतांश स्त्रीवादी बायका जश्या नकळत ‘स्त्रीवर्चस्वाचा’ टोकाचा आग्रह धरतात ना, अगदी तश्या! बोलताना त्यांच्या तोंडी एका दमात तस्लिमा नसरीनपासून ते शोभा देपर्यंत एकाहून एक नावे येत होती. स्त्रीवर किती अत्याचार होतात आणि तिने त्यापासून कशी सुटका करून घेतली पाहिजे, हाच एक धोशा. बाईंचा नवरा अजून या जगात तग धरून आहे का आणि असल्यास अश्या प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची जिद्द त्या महानुभावाने कशी कमावली, हे विचारण्याचा मला वारंवार …Read more »

लोकमान्यांना शंभर वर्षांनंतर लाभलेला शिष्य!!

मोहनदास गांधी जेव्हा आफ्रिकेतून भारतात परतले होते आणि येथील विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते, तेव्हा आपल्या या प्रवासात ते लोकमान्य टिळकांनाही भेटले होते. भेट संपली. गांधी निघून गेले. ते जाताच लोकमान्य आपल्या सहकाऱ्यांकडे वळून म्हणाले, “हा माणूस पक्का बनिया दिसतोय. बोट दिलं तर हातच ताब्यात घेईल. याला दूर लोटू नका, पण फार जवळदेखील करू नका. नाहीतर हा विकून खाईल सगळ्यांना”. अर्थातच टिळकयुगाच्या अस्तानंतर लोकमान्यांचा हा मुत्सद्दी सल्ला कुणीच मानला नाही. हळूहळू सारी काँग्रेसच गांधींच्या कह्यात गेली. त्यातून पुढे काय काय रामायणे घडली आणि देशाला त्याचे काय काय परिणाम भोगावे लागले, हा एक वेगळाच विषय आहे. मात्र मला आज एक असा …Read more »