
रात्रीचे दहा वाजून गेलेले. चेन्नईच्या ‘अपोलो कॅन्सर हॉस्पिटल’मध्ये सर्वत्र निजानीज झालेली. स्पेशल रुम क्र. १३३५ मध्ये लहानग्या निहारिकाचीही झोपायची तयारी चालू होती. अवघी पाच वर्षांची पोर. आजच केमोथेरपीचे एक सत्र संपले होते तिचे. आई — निखिला, बिछाना नीट करून देत होती तिचा. सर्व तयारी मनासारखी झाल्यावर निहारिकाने हळूच आईच्या डोळ्यांत पाहिले. “हो माहितीये मला”, आई निखिला हसून म्हणाली. आणि तिने आपल्या मोबाईलवर मंद आवाजात ‘हायवे’ चित्रपटातले गीत ‘सूहा साहा’ लावले. गेले काही दिवस हा रोजचाच दिनक्रम (की रात्रीक्रम!) झाला होता दोघींचा. रोज झोपताना निहारिकाला ‘सूहा साहा’ ऐकायचेच असायचे. काही दिवसांपूर्वी या गीताची जागा ‘कडल’मधील ‘सिथ्थिरई निला’ कडे होती. त्याआधी निहारिकाला …Read more »