मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. मला माहितीये, फारच वापरून वापरून गुळगुळीत झालेलं वाक्य आहे हे, पण खरं आहे. आणि या समाजप्रियतेतूनच संपर्काची वेगवेगळी साधने विकसित झाली. कालौघात या साधनांचे स्वरूपही बदलत गेले. हा वेग इतका प्रचंड आहे की पत्रे, फोन आणि मोबाईल एकत्र पाहिलेली पिढी अजूनही अस्तित्वात आहे. परंतु गेल्या दशकभरात या संपर्काच्या क्षेत्राने त्याच्या मूळच्याच अतिप्रचंड वेगालाही चक्कर यावी असे वळण घेतले आणि उभा ठाकला सोशल-मिडिया! सोशल मिडिया म्हणजे काय? फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॅप, इन्स्टाग्राम, युट्यूब, स्नॅपचॅट वगैरे वगैरे? ही तर सोशल मिडियाची उदाहरणं झाली! या उदाहरणांना सोशल मिडिया का म्हणायचं, याच्या ४ मुख्य कसोट्या आहेत. १) वेब २.० : …Read more »
Blog Archives
अपेक्षाभंग करणारा : मणिकर्णिका
१८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील झाशीच्या राणीचे स्थान केवळ मराठीजनांसाठीच नव्हे, तर सबंध भारतीयांसाठीदेखील कायमच गौरवाचे राहिले आहे. राणीवर आजपर्यंत खूप सारे साहित्य लिहिले गेले, मालिका बनल्या, चित्रपटही बनले. परंतु जेव्हा के. व्ही. विजयेंद्र प्रसाद, प्रसून जोशी, राधाकृष्ण जगर्लामुडी आणि कंगना राणावतसारखे दिग्गज या विषयासाठी एकत्र आले तेव्हा बनणारी कलाकृती निश्चितच वेगळ्या दर्जाची असणार होती. पण बुद्धीमंतांचा एक दोषच असतो की, बरेचदा ते एकत्र आल्यावर त्यांच्या बुद्धीच्या बेरजा होण्याऐवजी एकमेकांना छेद देऊन भागाकार तेवढा होऊन बसतो. माझ्या दृष्टीने ‘मणिकर्णिका’मध्येही तेच झाले. सुरुवातीपासूनच कंगना आणि क्रिशमध्ये दिग्दर्शनावरून वाद होते, हे सर्वश्रृत आहे. कोण चित्रपटाची माती करत होतं आणि कुणी कोणते प्रसंग दिग्दर्शित केले …Read more »
रुणुझुणू वारा
२०१६ मध्ये माझ्याकडे एक मराठी चित्रपट-दिग्दर्शक आला होता, ‘मी एक रोमँटिक चित्रपट करतोय त्यासाठी गाणं लिहून द्याल का’ विचारत. मी त्याला चालीबद्दल विचारले. तो म्हणाला की, ‘तुम्ही लिहा आपले संगीतकार चाल लावतील’. असे म्हणून त्याने मराठीतल्या एका बरे नाव असलेल्या संगीतकाराचे नाव घेतले. म्हणजे गाणं आधी लिहून मग चाल लावली जाणार होती. प्रासंगिक गीत असल्यामुळे मी दिग्दर्शकाकडून संहिता मागवून घेतली. त्या तथाकथित रोमँटिक प्रसंगावर गाणे लिहिले आणि संगीतकाराला पाठवून दिले. दुसऱ्या दिवशी सकाळीच मला संगीतकाराचा फोन आला. “हे काय लिहिलेय तुम्ही”? “गाणे”, मी. “हे असं नकोय आपल्याला”. “असं नकोय, मग कसं हवंय”? त्यावर त्याने वापरलेले वाक्य अक्षरशः असे होते – …Read more »
नव्या भारताचा नवा चित्रपट : उरी – द सर्जिकल स्ट्राईक
१८ सप्टेंबर २०१६ यादिवशी पाकिस्तानच्या चार आतंकवाद्यांनी काश्मिरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील आपल्या सैन्यतळावर हल्ला केला. आपण त्या चारही आतंकवाद्यांना नरकात धाडले परंतु हे होईपर्यंत आपले सुमारे एकोणावीस जवान हुतात्मा झाले होते तर सुमारे ऐंशी ते शंभर जखमी. युद्धाची दाहकता ही अशी असते आणि ती कधीच एकतर्फी शांतता राखून कमी होत नाही. आपण जर याचे काही उत्तर दिले नसते, तर उलट त्या अतिरेक्यांच्या मालकांची हिंमत अजूनच वाढली असती. आणि म्हणूनच भारत सरकारने आणि आपल्या भारतीय सैन्याने निर्णय घेतला सर्जिकल स्ट्राईक करण्याचा! शरीरावर शल्यकर्म करताना जसे फक्त त्या रोगग्रस्त भागापुरतेच केले जाते, तसाच हा हल्लादेखील सर्जिकल अर्थातच लक्ष्यांपुरता मर्यादित असतो. यात …Read more »
बऱ्याच गोष्टींनी मारलेला पण अभिनयाने तारलेला : द अॅक्सिडेंटल प्राईममिनिस्टर
‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ सुरू होतो तो काँग्रेसप्रणित संपुआने २००४ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यापासून. त्यानंतर उभ्या राहिलेल्या पेचप्रसंगांतून मनमोहनसिंह (अनुपम खेर) यांना पंतप्रधानपदी निवडले जाते आणि चित्रपटात आरंभ होतो दोन सत्तास्थानांमधील अघोषित संघर्ष. याला मी लिहिण्याच्या सोयीसाठी संघर्ष म्हणतोय कारण, चित्रपटात एक सत्तास्थान खूपच सौम्य चितारलेय तर दुसरे जवळजवळ अप्रत्यक्ष. नेमके हेच सगळ्यांत मोठे कारण आहे की, यावर्षीच्या सगळ्यांत स्फोटक चित्रपटांपैकी एक मानला जाणारा ‘टिएपीएम’ फारसा रंगत नाही. मनमोहनसिंह हे मुळातच मितभाषी नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. चित्रपटातही त्यांची प्रतिमा तिच ठेवण्यात आलीये. असा परोक्ष नायक कसा काय चालेल? म्हणून मग त्यांचा आवाज बनतात संजय बारू (अक्षय खन्ना), सांकेतिक अर्थानेच नव्हे …Read more »
गावाकडचे जॅझ – महेशिण्टे प्रतिकारम
तुमच्याकडे नोकरी, व्यवसाय, शिक्षण वगैरेपैकी काहीतरी एक असतं. चार लोकांत तुमचं काहीतरी अस्तित्व असतं. तुमची लव्हलाईफ फार भारी नसते, पण जे आहे ते आपलं म्हणून तुम्ही त्याचा मनापासून स्वीकार केलेला असतो. थोडक्यात सारं काही छान चाललेलं असतं. संथ वाहाणाऱ्या कृष्णामाईसारखं. पण एक दिवस असा येतो की तुमची प्रतिष्ठा, अब्रू, तुमचं प्रेम सारं सारं काही एका क्षणात हिरावून घेतलं जातं. होत्याचं नव्हतं होतं. बरं झालेली गोष्टदेखील इतकी सहजपणे झालेली असते की, आपल्यावर फार मोठा अन्याय झालाय असं बोंबलायला जागाच नसते. गेलेली अब्रू परत मिळवण्यासाठी आपण जीवतोड प्रयत्न करतो. कारण, तेवढंच आपल्या हातात असतं. पण हरवलेलं प्रेम कुठून परत मिळणार? तुम्ही गेलाय …Read more »
क्रिएटिविटी की बूँदें
परेशानियाँ बो के जब उधेड़ोगे नीन्दें, तब जा कर बरसती है दो-चार क्रिएटिविटी की बूँदें! टप्प कर के गिरती है कुछ, और कुछ कँकर सी सटाक लगती है, अाधे जल रहे दिल से लग के भाँप भी बन जाती है कोई! एक-आध बच भी जाती है कुछ, तो वह भी हम मोबाईल, लैपटाप या टिवी के पराश्राव्य शोर से मार देते है! और फिरते रहते है भौकाल बन के बाकी बचा कुछ-एक हज़ारवाँ भाग सहलाते हुए! कि देखो, मैं ने कितना ऑफबीट कर दिया यह! अरे भाई, देने वाले ने क्या दिया था, तू ने कितना लिया है! छप्पर तो …Read more »
नाव राखणारा अद्वितीय थरारपट : राक्षसन (रात्ससन)
अरुणकुमार (विष्णु विशाल) हा एक होतकरू चित्रपटकार आहे. अतिशय चिकाटीने, खूप सारं संशोधन करून त्याने एक संहितासुद्धा लिहिली आहे. अनेक निर्मात्यांना तो ती ऐकवतो. हाती काय लागतं? कोणत्याही स्ट्रगलरच्या हाती जे सुरुवातीची अनेक वर्षं लागतं तेच, बिनपैश्यांचा तरीही अमूल्य असा अनुभव! कुणीच त्याच्या कथेवर पैसा लावायला तयार होत नाही. हा दुसरे काहीच काम करत नाही, काहीच कमवत नाही त्यामुळे त्याची बहिण (विनोदिनी) आणि भावोजींची (रामदास) सतत भुणभुण चाललेली. अरुणचे वडील पोलिसांत होते. भावोजीही पोलिसच. त्यामुळे साहजिकच अरुणनेही पोलिस व्हावे हा सगळ्यांचा लकडा. शेवटी स्ट्रगल करून करून थकलेला अरुण त्याच्या मनाविरुद्ध पोलिस भरतीच्या परीक्षा देतो आणि उत्तीर्ण होऊन पोलिस खात्यात रुजूसुद्धा …Read more »
रुचकर तरीही अपुरा – सीताकाती
जयन्ति ते सुकृतिना: रससिद्धा: कवीश्वरा: । नास्ति येषां यश:काये जरामरणजं भयम् ।। कला म्हातारी होत नाही, किंबहूना कला कधीच मरत नाही. ती अजर असते, अमर असते. हे आपण नेहमीच तात्त्विक रूपाने आसपास पाहातो, अनुभवतो. असेच अय्या आदिमूलम (विजय सेतुपती) हे रंगमंचावरील निष्णात अभिनेते आणि दिग्दर्शक. वयाच्या दहाव्या वर्षापासून हा माणूस रंगमंचालाच सर्वस्व मानून वावरतोय. त्यांच्या अभिनयपटूतेला पाहून अनेक नावाजलेल्या चित्रपट दिग्दर्शकांनी त्यांना सिनेमाची ऑफर दिली, परंतु त्या साऱ्या धुडकावून त्यांनी फक्त आणि फक्त रंगभूमीची सेवा केली आजवर. आता काळ बदललाय. लोकांना जिवंत रंगभूमीपेक्षा रंगीबेरंगी चित्रपट जास्त भुरळ घालू लागलेयत. रंगमंच ओस पडू लागलेयत. तरुणाई त्याकडे पाठ फिरवू लागलीये. जसजसा जनप्रवाह …Read more »
अॅक्वामॅन – समतोलाच्या दिशेने
२००८ साली एमसीयू सुरू झाल्यापासून मार्व्हलने जी एक थीम जशीच्या तशी राखलीये, ती ही की ते त्यांच्या पात्रांना एका मर्यादेपलिकडे अजिबात गंभीरपणे घेत नाहीत. त्यामुळे त्यांचे चित्रपटदेखील हलकेफुलके, सगळे मिळून आनंद लुटू शकतील असे रंगीबेरंगी असतात. एकाचवेळी कॉमिकनर्ड्स आणि सामान्य प्रेक्षक यांना खुश करण्याचे समतोल सूत्रच जणू त्यांनी शोधलेय. याउलट डिसीने त्यांच्या अतिमानवी पात्रांची मानवी बाजू शोधण्यावर जास्त भर दिला. परिणामतः त्यांची पात्रे अधिकाधिक गंभीर, आयुष्यातील कटकटींनी सतावल्यामुळे सतत ओढलेल्या चेहऱ्यांची होत गेली. त्यांच्या रुक्ष जीवनात विनोद मृगजळासारखा झाला. त्यांचे चित्रपटही तितकेच भेसूर होत गेले. एकीकडे मार्व्हलच्या अतरंगी चित्रपटांनी प्रचंड यश पाहिले, तर दुसरीकडे डिसी जास्तीत जास्त श्यामरंगी व टीकेचे …Read more »
Categories
- A R Rahman (17)
- Bajirao (5)
- Bhagavad Geeta (5)
- Books (5)
- Cinema (59)
- Comics (3)
- Hindutva (42)
- History (53)
- Music (11)
- Poetry (55)
- Politics (52)
- Pravaas Chitre (3)
- Ramayana (9)
- Reviews (64)
- Savarkar Katha (3)
- Sawarkar (7)
- TV (27)
- Uncategorized (18)
- Vaidik Knowledge (18)
- कथा (12)
- स्फुट लेख (29)
Menu
Recent Posts
- A Masterclass In Paradox July 25, 2023
- दक्षिणपंथी – यातिसई June 17, 2023
- अर्धवट शिजलेली थाळी – पोन्नियिन सेल्वन २ May 4, 2023
- गेमसारखाच – टेट्रिस! April 9, 2023
- रावणाचं फर्स्ट इम्प्रेशन! October 3, 2022
- मर्यादांमध्ये अडकून पडलेला – पोन्नियिन सेल्वन: १ October 1, 2022
- टबू – असंतांची गोष्ट September 10, 2022
- मार्मिक भाष्याने समृद्ध – बिफॉरेनर्स May 10, 2022
- आरआरआर — भारताची कथा भारताच्या भाषेत जगाला सप्रेम! March 28, 2022