
रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी एकटाच जागताना तुला मागतो मी मला त्यागताना मोडतो डाव चांदण्यांचा अन् भान होते मंद्र रात्रीच्या कुपीत भरतो मी तेव्हा, तुकडा तुकडा चंद्र! डोकावले असतेस तू जर आसवांच्या विहारी भेटलो असतो मी पापण्यांच्या किनारी विसरतेस तू ही जेव्हा हासण्याचे तंत्र रात्रीच्या कुपीत भरतो मी तेव्हा, तुकडा तुकडा चंद्र! वाट ही अंधारयुगाची एकट्यानेच चालण्याची कोमेजलेली विरहफुले तव वेणीत माळण्याची विश्रब्ध नेणीवेत भानू आळवतो प्रात:मंत्र रात्रीच्या कुपीत भरतो मी तेव्हा, तुकडा तुकडा चंद्र! – © विक्रम श्रीराम एडके. (www.vikramedke.com)