Category Archives: Poetry

तुकडा तुकडा चंद्र..

रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी एकटाच जागताना तुला मागतो मी मला त्यागताना मोडतो डाव चांदण्यांचा अन् भान होते मंद्र रात्रीच्या कुपीत भरतो मी तेव्हा, तुकडा तुकडा चंद्र! डोकावले असतेस तू जर आसवांच्या विहारी भेटलो असतो मी पापण्यांच्या किनारी विसरतेस तू ही जेव्हा हासण्याचे तंत्र रात्रीच्या कुपीत भरतो मी तेव्हा, तुकडा तुकडा चंद्र! वाट ही अंधारयुगाची एकट्यानेच चालण्याची कोमेजलेली विरहफुले तव वेणीत माळण्याची विश्रब्ध नेणीवेत भानू आळवतो प्रात:मंत्र रात्रीच्या कुपीत भरतो मी तेव्हा, तुकडा तुकडा चंद्र! – © विक्रम श्रीराम एडके. (www.vikramedke.com)

‘ति’ची गोष्ट

दिवसभर ऍटिट्यूड सांभाळून वावरणारी ती आपल्याच तोऱ्यात असते, दिवाणे जग हे सारे तिच्या बोटाच्या टोकावर नाचते! वाऱ्याच्या नादावर धरलेला असतो तिने ताल — अन् अस्मानावर ती उधळते अधरांचा रंग लाल! भीती कश्याची? पर्वा कुणाची? मला कोण रोखेल? हसविणे, फसविणे, उंच उडविणे — माझा रोजचाच खेळ! “‘त्या’नेही नव्हते का मला फसविले असेच, टाकले नव्हते का ‘त्या’ने बंधनात? उसळला होता आगडोंब कसा त्याक्षणी मना-कणांत”! सांगत होती — “कसे उतरले होते गालावर आसू, अन् निर्मिले होते कसे मी त्यातूनच भेसूर हासू! त्या माझ्या भेसूर हास्यरवात सारे मी विसरते — त्याच खेळाचे नियम वापरून ‘त्या’च्यासारख्यांना खेळवते”! तो शांतपणे ऐकत असतो सारे, एव्हाना उत्तररात्रीचे पडघम …Read more »

मेरे पैगंबर!!

रोना-धोना, सपने बोना, पत्ते काट फिर बाजी खोना! फिर उठना, फिर टूटना, गिरना-पडना, खुदही से लडना! ढेर हो जाए तो – अपनी लाश, अपनी लाश – आपै ढोना! फिर नयी जात, फिर नया वार, कदमबोसी करती नजरें फिर वही इंतजार! बस यहीं चल रहा हैं मुसलसल.. यहीं जिंदगी हैं इन दिनों.. रोना आता हैं तो अपनीही पीठ सहलाकर कह लेते हैं – “ये जो आँसू हैं ना, वो आँसू नहीं है.. आसमाँसे आयतें उतरी हैं तुम्हारे नाम की… मेरे पैगंबर”!! – © विक्रम. (www.vikramedke.com)

स्वयंसूचना

स्वयंसे कोई भाग सके ना कर्मकी गठरी त्याग सके ना चिरनिद्रामें जाग सके ना सुन! मृत्यू तुम्हारे समीप खडी हैं देख आँखोंसे आँखे भिडी हैं नवीन लडाई मनमें छिडी हैं सुन! तू वीर हैं, जियाला हैं तुझसे ही सारा उजियाला हैं तेरा ये काल निवाला हैं ओ वीर रे..! रख धीर रे..! सुन! मन मर्मोंके भेद भुलाकर जीवनको आकाश पिलाकर स्नायूसे स्नायूको मिलाकर सुन! काल कदापि स्तब्ध नहीं हैं उस बिंदूपर शब्द नहीं हैं कोई विनाप्रारब्ध नहीं हैं सुन! गीताका ये अभिज्ञान हैं लडता हैं वोही महान हैं जीवन इसीका प्रमाण हैं ओ वीर रे..! रख धीर रे..! सुन! कुछभी …Read more »

नूर-ए-जहाँ

जब पलकोंके नीले परदे उठे, तो दुनिया रौशन हुई, मेरी राह जैसे, तुझसे कौसर हुई..! जब चाहतमें तेरी राहत मिले, तो चुमूँ परछाईयाँ, ये हसीं खुमारी, मुझको क्योंकर हुई..! तु बेखबर, मैं बेसबर.. फिर कैसे हो, दिलका बसर.. अजनबी झौंकेपे ‘मैं’ उड चला..! नूर-ए-जहाँ, नूर-ए-जहाँ.. तू सामने, दूर हैं जहाँ..! तुझसे शुरू.. तुझपे खतम, इतनाही हैं मेरा जहाँ..! – © विक्रम (www.vikramedke.com)

गूढाचा काठ.. नवांगुळे

नवांगुळेही ह्रदय नुरले तुझ्या ह्रदयापासुनि का परि ते अंतर इतुके वेडावते मज हासुनि सांजबावरे दोन विहंग वाट रोखूनि बसलेले सांग सखे तू जाशील कैसी अंतर त्यांसवे राखुनि मेघसावळ्या भ्रमराला काय खुळा मधुछंद असे मालती तरी उरते कुठे सर्वस्व तया अर्पुनि का वामी जखमा घेऊनि वावरतात बहाद्दर हे रिपू तरी हा कसा टाकेना क्षणात काळीज चिरुनि जळावयाचे आहे भास्करा तुझी परंतू साथ नसे का देशी रे उगा दिलासा तू किरणांची माळ गुंफुनि सूर आठवा फसवा नसे ठाऊक आहे ना हे तुला साद देता येशील धावत तू गूढाच्या काठावरुनि – © विक्रम श्रीराम एडके (www.vikramedke.com)

एक कविता तुझ्यासाठी..!

पापण्यांच्या पाकळ्यांमध्ये, स्वप्नात्तरांचे प्याले रिते! ध्यास उसळी मारताना, मग का कश्याला तू भिते? मेघ छेदूनी किरणांची, मांड रास अवनीवरी! बघ उसासे टाकताना, धरणी काय विनविते! तुज ठाऊक आहे ना ती, घर्मबिंदूंची उष्ण नदी? अपयशांचे जी कराल, क्षणार्धात डोह पिते! भलेतरी नसशील तू, तेजोभास्कर अस्मानीचा! तू बन पणती अशी जी, जळुनी जगां उजळिते! – © विक्रम. (www.vikramedke.com)

देवा..

जिंदगीसे हारके या कोई बाजी मारके जब आता हूँ तुम तक तुम वैसे ही मिलते हो देवा..! वही मुस्कुराहट वही चरणोंमें राहत तुम वैसेही दिखते हो देवा..! शिकंजेमें फडफडाता पंछी तुम दूर खडे हँसते हो मैं हारकर बेबस हो जाऊँ तो पंखोंमें आ बसते हो और टूट जाता हैं शिकंजा तुम खुशी बन चीखते हो देवा..! तुम वैसेही मिलते हो देवा..! वही मुस्कुराहट वही चरणोंमें राहत तुम वैसेही दिखते हो देवा..! जिंदगी अंधेरी सुरंग जब तुम दिलमें जलती मशाल हो बवंडरमें फँस जाता हूँ तुम भरोसेका भोकाल हो तुम हौसलेका बनके दिया इरादोंमें अमूमन जलते हो देवा..! तुम वैसेही मिलते …Read more »

रहमानला सारं काही कळतं!!

नष्ट होती आशा अन् जळू लागती दिशा नैराश्याच्या गर्तेत केवळ अश्रूंचीच भाषा एक लकेर उमटते अन् डोळ्यांतलं पाणी खळतं मनात तेव्हा विश्वास वाटतो – “रहमानला सारं काही कळतं”! तुझा एक-एक सूर आणि एक-एक ताल आपसूकच बनतात ते सारे माझी ढाल अंधाऱ्या अंतरी तेज स्पर्शते अन् गानब्रह्म आकळतं मनात तेव्हा विश्वास वाटतो – “रहमानला सारं काही कळतं”! मी अज्ञाताचा प्रवासी तू दीप घेऊन उभा तिथे तू घेता कवटाळूनी अंतर्मन माझे रिते सारे अहं अर्पिता तुला मन “स्व”कडे वळतं मनात तेव्हा विश्वास वाटतो – “रहमानला सारं काही कळतं”! – © विक्रम. (www.vikramedke.com )

ती कविता…

ती कविता, जी सुचलीच नाही, परि मन गुंतलेले त्या शब्दांवर… तिचा नि माझा लपंडाव, अन राज्य कायमच माझ्यावर ! ती प्रियेसम – प्रसन्नही, अप्रसन्नही… आणि मजकडे – केवळ अधीरे नवखेपण ! थोडी गाफिलता आणि तिचे निघोन जाणे, सहजच होते तिच्यासाठी फिरुनी परत न येणे… रसिकांची तिला काय कमी ? (सहस्र झुरत असतील तिच्यासाठी !) पण मजसाठी मात्र, एकच ती… ती कविता, जी सुचलीच नाही, परि मन गुंतलेले त्या शब्दांवर… अन आजही मी थांबलो आहे, ती निघून गेली त्या वळणावर… – © विक्रम